पाटील वा वरिष्ठ सरकारी अधिकारी शेतजमीन कौलाने एखाद्यास कसण्यासाठी देऊ शकत, पण तीही कुणबी जातीय व्यक्तीच कौलाने घेऊ शकत असे

माणसासच विकावी लागे (Fukazawa १९९१: १५३), पाटील वा वरिष्ठ सरकारी अधिकारी शेतजमीन कौलाने एखाद्यास कसण्यासाठी देऊ शकत, पण तीही कुणबी जातीय व्यक्तीच कौलाने घेऊ शकत असे (पाटील २००३). इनाम जमिनी ह्या मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणांच्या मालकीच्या होत्या. त्या अतिशय सुपीक असून त्यांच्यावर शेतसारा वा कर आकारला जात नसे (Charlesworth १९८५: २८). पण हळूहळू ब्राह्मणांच्या ताब्यातील इनाम जमिनीचे प्रमाण कमी होत गेले.
मराठा नेत्यांनी मराठ्यांची संख्या वाढण्यासाठी कुणब्यांना मराठ्यांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. कारण, प्रतिनिधीत्वावर आधारलेल्या निवडणूक पद्धतीत संख्याबळ महत्वाचे वा निर्णायक ठरत असल्याने स्वतःच्या जातीची व्होट बैंक वाढवणे आवश्यक असल्याची समज तत्कालिन मराठा नेत्यांना झालेली होती. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी कुणब्यांना आपली जनगणनेत आपली नोंद मराठा म्हणून करण्याचे आवाहन केले. तिरळे-पाटील ह्यांचे उदाहरण बरेच प्रसिद्ध आहे.
विशेषतः गांधींची नथुराम गोडसेने हत्या केल्यानंतर ब्राह्मणांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर मराठ्यांकडे आल्या. काही ठिकाणी त्या विकत घेतल्या गेल्या तर काही ठिकाणी गाव सोडून पळालेल्या वा शहराकडे गेलेल्या ब्राह्मणांच्या जमिनींवर मराठ्यांनी कब्जा करून त्या ताब्यात घेतल्या.” अशाप्रकारे महाराष्ट्रातील शेतजमीन मोठ्या प्रमाणावर मराठा जातीच्या मालकीची आहे. अनेक महार वतनाच्या जमिनीही मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या आढळून येतात. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी श्रीमंत शेतकऱ्यांचा वर्ग उदयाला येण्यास
वासाहतिक कालखंडात कुणबी-मराठा अभिसरण वाढून मराठ्यांची संख्या वाढली असली तरी ब्रिटीशपूर्व काळातही मराठा जातीची संख्या गावाच्या रचनेत इतर जातींच्या तुलनेत बरीच जास्त आहे. मराठा जातीच्या ह्या संख्याबहुलतेमुळे त्यांना एक समुदायशक्ती प्राप्त होत असे (Kumar १९६८), ही समुदायशक्तीही त्यांना इतर जातींवर धाक ठेवण्यासाठी कामी येत येई. त्यामुळे बलुतेदार व दलित जातींच्या श्रमातला वरकडाचा भाग हिरावून घेणे शक्य होत असे. बलुत्याच्या बाबतीत कितीही नाराजी असली तरी बलुतेदार जाती व दलित जाती त्याच्या विरोधात आवाज उठवू शकत नसत (बगाडे २०११: ११). त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे गावातील दलित जातींची संख्या कमी होती. तसेच उपजीविकेच्या दृष्टीने पूर्णपणे मराठ्यांवर अवलंबून असल्याने त्यांची धारणपोषणाची क्षमताच नव्हती (आंबेडकर १९९०:९९), राजकीयदृष्ट्याही मराठ्यांनी संख्याबहुलतेचा बराच फायदा घेतला आहे. राजकीय सत्ता सोपानातील सर्व ठिकाणी आपल्या संख्या बहुलतेमुळे त्यांनी अधिक जागा पदरात पाडून घेणे शक्य झाले आहे.
सुरुवात झाली. हा वर्ग उदयास येण्यास अनेक घटक कारणीभूत ठरले. रेल्वेचा विस्तार, सिंचनाच्या सोयींचा विस्तार, इतर देशांमधून येथील शेत मालाला वाढती मागणी आदि घटक त्यात महत्वाचे होते. भारतीय अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय अर्थकारणाशी जोडली गेल्याने भारतीय शेतीचे वेगाने व्यापारीकरण घडून येऊन नगदी पिके घेण्याचे प्रमाण वाढले होते. ज्यांच्याकडे पाण्याच्या म्हणजे सिंचनाच्या सुविधा होत्या, बाजाराचे ज्ञान होते, आपला माल योग्यवेळी बाजारात नेण्याचे साधन होते तसेच नगदी पिके घेण्यासाठी आवश्यक भांडवल, बियाणे व सुपीक जमिनी होत्या, अशा शेतकऱ्यांनी खाद्यान्नाऐवजी नगदी पिके घेण्याला प्राथमिकता देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ घडून आली (Charlesworth १९८५). १८७५ ला महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी सावकारांच्या विरोधात उठाव केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा असंतोष लक्षात घेऊन ब्रिटीश सरकारने शेतकऱ्यांना सावकारांच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी ‘डेक्कन अॅग्रीकल्चारिस्टस रिलीफ अॅक्ट’ संमत केला. ह्या कायद्यानेही श्रीमंत शेतकऱ्यांच्या १) काही ठिकाणी ब्राम्हणांनी गाव सोडल्याने पाटील किवा गावातील श्रीमंत, दांडगट माराठ्यांनी ताब्यात घेतल्या माझ्या गावचे (एकबाता, बसवकल्याण जि. विदर) उदाहरण हे त्याचे मासचेवाईक नमुना म्हणता येईल. माझे गाव महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषीक बहुल गाव आहे. गावात देशपांडे नावाचे एक ब्राम्हण कुटूंब होते. असे माझी आई सांगायची त्यांनी गाव सोडल्यानंतर त्याची १८ एक्कर जमीन एका गुंडाई करणाऱ्या मराठ्याने बळकावली असे ती सांगते.
२) रयतवारी महसूल पद्धतीमुळे शेतीच्या व्यापारीकरणासाठी व नगदी पिके घेण्याला आधीच सुरुवात झाली होती.
*मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण*
वरचढ शेतकरी जात ठरण्याच्या दृष्टीकोनातून आर्थिक घटक अतिशय कळीचा असल्याचे वरील अभ्यासकांनी मांडले आहे. मराठ्यांच्या आर्थिक ताकदीचा विचार केला तर जमिनीवरील मालकी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रावरील प्रभुत्व ह्या तीन बाबी सर्वाधिक महत्वाच्या भूमिका बजावत आल्या आहेत. मिरासी, उपरी व इनाम जमीन असे शेतजमिनींचे तीन मुख्य प्रकार अस्तित्वात होते. मिरास जमिनी ह्या मोठ्या प्रमाणावर कुणब्यांकडून कसल्या जात. त्यांना थलकरी वा थलवाहिक संबोधले जाई. मिरासदार शेतकऱ्याला जमीन विकण्याची मुभा नव्हती. विकावयाचीच झाल्यास आधी त्यास जातीच्या सदस्यांची परवानगी घ्यावी लागत असे. परजातीच्या व्यक्तीस जमीन विकता येत नसे, ती स्वजातीच्या
*मराठा विरुद्ध प्रस्थापितांचे राजकारण* क्रमशः भाग 15
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*




