🔥 “नायगावला सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जन्म उत्सवाचा इतिहास घडणार! सावित्रीबाईंच्या विचारांचा महासंग्राम – चलो नायगाव!” 🔥

🔥 “नायगावला सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जन्म उत्सवाचा इतिहास घडणार! सावित्रीबाईंच्या विचारांचा महासंग्राम – चलो नायगाव!” 🔥
नायगावला सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जन्म उत्सवाचा इतिहास घडणार! सावित्रीबाईंच्या विचारांचा महासंग्राम – चलो नायगाव!
चलो नायगाव! चलो नायगाव!!r चलो नायगाव!!!
सावित्रीबाई फुले स्मारक उद्घाटनासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार
सोलापूर | दिनांक २२ डिसेंबर
सोलापूर येथे बालाजी सरोवर हॉटेलमध्ये आज सखल माळी समाजातील सर्व संघटनांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या ऐतिहासिक बैठकीचे अध्यक्षस्थान राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी भूषवले. मंचकावर अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे सावता वसेकर महाराज माजी जिल्हा परिषद देवकर साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य रघुनाथ कोल्हे साहेब अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ गाउन्दरे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब भंडारे माढा लोकसभा मतदारसंघाचे समता परिषद अध्यक्ष आबासाहेब खारे इत्यादी मान्यवरासह शेकडो सोलापूर जिल्ह्यातील माळी महासंघाचे प्रमुख नेते कार्यकर्ते फुले प्रेमी उपस्थित होते
या बैठकीत ३ जानेवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे होणाऱ्या भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नायगाव येथे दहा एकर जागेमध्ये महिला ट्रेनिंग सेंटर, शिक्षिका शिक्षण संकुल तसेच सावित्रीबाई फुले सृष्टी स्मारकाच्या भव्य उद्घाटनाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
हा ऐतिहासिक क्षण गडचिरोलीपासून बांदापर्यंत, सिंधुदुर्गापासून विदर्भापर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पोहोचला पाहिजे. यासाठी ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक समाजासह सर्व फुलेप्रेमींनी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी व विचारवंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून किमान १० हजार फुलेप्रेमींना नायगाव येथे सकाळी १० वाजेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या बैठकीत एकमताने करण्यात आला. प्रत्येक तालुक्यातून किमान १० बसेस, तसेच खासगी वाहने, कार, जीपद्वारे फुलेप्रेमींना नायगावला घेऊन जाण्याचा ठराव करण्यात आला.
पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब म्हणाले की,
संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण याचा विकास, अरणला माळी समाज सावता प्रेमींचा दरवर्षी महामेळावा आयोजित करणे महात्मा फुले वाडा स्मारकाचे विस्तारीकरण खानवडी येथील महात्मा फुले कुलभूमी येथे भव्य स्मारक महात्मा फुले यांची कुलभूमी कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा येथील स्मारक विस्तारीकरण उभारणी ही सर्व कामे येत्या तीन ते चार वर्षांत माझ्या कार्यकाळात पूर्ण करणारच, असा ठाम शब्द त्यांनी दिला.
या बैठकीस अखिल भारतीय माळी महासंघ, महात्मा फुले समता परिषद यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख नेते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.
🔶 राज्यव्यापी आवाहन – सत्यशोधक शंकरराव लिंगे
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी महाराष्ट्रातील अखिल भारतीय माळी महासंघाचे सर्व नेते, कार्यकर्ते, सखल माळी समाज, तसेच सर्व फुलेप्रेमींना जाहीर आवाहन केले आहे की,
👉 सावित्रीबाई फुले यांच्या 195 या जन्म उत्सवानिमित्त ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे.
👉 आपापल्या वाहनांवर पिवळे झेंडे, संघटनांचे फलक व ‘चलो नायगाव’ पोस्टर्स लावून हा संदेश घराघरात पोहोचवावा.
👉 हा कार्यक्रम केवळ उद्घाटन नसून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा राज्यव्यापी जागर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जय ज्योती! जय क्रांती!!
📌 सोशल मीडिया हॅशटॅग्स
#चलो_नायगाव
#SavitribaiPhule195
#PhuleVichar
#महिला_शिक्षण_क्रांती
#MaliSamaj
#OBCUnity
#जयज्योती_जयक्रांती
#PhuleMovement
#Naigaon2026
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 ७३ ८७ ३७ ७८ ०१
👉 हा नंबर आपल्या व्हॉट्सअॅप व सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
👉 बातमी लाईक करा | शेअर करा | फॉरवर्ड करा
👉 कमेंट करा | बेल आयकॉन दाबा – विसरू नका
चलो नायगाव! चलो नायगाव!!




