सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 74

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
74
घोडके
दादाराव बाबूराव (१९४१-२७नोव्हेंबर १९९९)
दादाराव बाबूराव घोडके हे गेवराई, जिल्हा बीड येथील सत्यशोधक असून, त्यांचा जन्म १९४१ साली गेवराई येथे झाला. दादाराव घोडके हे निरक्षर होते; परंतु चिकित्सक बुद्धी आणि कर्तृत्वावर त्यांचा ठाम विश्वास असल्याने त्यांनी आपल्या तीन मुलांना पदव्युत्तर शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. आयुष्यभर ते अंधश्रद्धेच्या विरोधात संघर्ष करते झाले. अशा या सत्यशोधकाचे २७ नोव्हेंबर १९९९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने गेवराई येथे निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी सत्यशोधकमते करण्यात आला.
घोडके
मुरलीधर दादाराव
बोलणे आणि बोलण्याबरहुकूम वागणारे मुरलीधर दादाराव घोडके हे गेवराई, जिल्हा बीड येथील पदवीधर सत्यशोधक आहेत. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९६० रोजी झाला. ते पुरोगामी विचारसरणी अंगीकारून गेल्या २५ वर्षांपासून महात्मा फुले यांची जयंती साजरी करतात.
या प्रसंगी पुरोगामी लेखकांचे आणि महापुरुषांचे चरित्र ग्रंथ वाटप करतात. प्रसिद्धीच्या मागे न धावता ते गेवराई परिसरात सत्यशोधकी कार्य करत असतात. त्यांनी गेवराई गावात लग्नानंतर निघणारी वरात पद्धत बंद केली. वडिलांचा दशक्रियाविधी सत्यशोधक मते केला. रोहितक येथील राजकुमार गायकवाड यांचा दशक्रियाविधी सत्यशोधक मते व्हावा म्हणून ते प्रयत्नशील राहिले. मुलगा अमर यांचे लग्न सत्यशोधक मते केले. व्यसनमुक्तीसाठी ते आजही प्रयत्नशील आहेत. सत्यनारायण पूजाही त्यांनी बंद केली आहे.
घोडके प्रभाकर दादाराव (२ मार्च १९६१)
प्रभाकर दादाराव घोडके हे गेवराई, जिल्हा बीड येथील तरुण उमदे, उच्चशिक्षित सत्यशोधक असून, त्यांचा जन्म २ मार्च १९६१ रोजी गेवराई येथे झाला. पेशाने शिक्षक असलेले घोडके हे ‘सत्यशोधक जलसे’ या विषयावर संशोधन करीत असून, त्या विषयावर पीएच.डी. प्रबंधासाठी लेखन करीत आहेत. प्रभाकर घोडके हे सातत्याने सत्यशोधकी बैठकांना आणि अधिवेशन, साहित्य संमेलनांना आवर्जून उपस्थित राहतात.
घोडे
अशोक गोविंदराव
(जन्म २७-९-१९६६)
अशोक गोविंदराव घोडे हे जालना येथील दहावीपर्यंत शिकलेले सत्यशोधक
असून, त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९६६ रोजी जालना येथे झाला. अशोक घोडे यांचा पिंड कवीचा असल्याने त्यांचा ‘आग’ शीर्षकाचा प्रबोधनपर कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
जालना जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीत ते सातत्याने कार्यरत असतात. जालना जिल्ह्यात विशेषतः मातंग समाजात त्यांनी अनेक सत्यशोधकी विवाह लावले आहेत.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




