लोकसभेत ना सही, विधानसभेत ओबीसी बहुजनांची मतशक्ती दाखवू

🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡लोकसभेत ना सही, विधानसभेत ओबीसी बहुजनांची मतशक्ती दाखवू.*
*ओबीसींवरील मारहाणीचा/अवमानाचा बदला लोकसभेत ओबीसी मतदारांनी घेतला नाही, पण विधानसभेत हा बदला जरुर घेवून फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी मारुन राजसत्ता संपादित करुन आरक्षण वाचवूच. तुम्हास चोहो बाजुंनी पुरुन उरु.*💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आमचा जन्मच लढण्यासाठी झाला आहे.
नाउमेद न होता नव्या जोमाने कामाला लागू.
ओबीसींचे घर ना घर पिंजून काढू. तामिळणाडूत रामास्वामी पेरियार यांचा ओबीसी सत्तासंपादनाचा विचार आणि संघर्ष गेली कित्येक वर्ष ओबीसींची सत्ता अबादित राखण्यात यशस्वी ठरला. तिथे सत्ताधारी व विरोधक दोघेही ओबीसीच असतात.
तिथल्या सत्तेत प्रस्थापित वर्गास निवदालाही शिल्लक ठेवले नाही.
त्याच ओबीसी धर्तीवर महाराष्ट्र सत्तासंपाधनासाठी मा. प्रकाशआण्णा शेंडगे आणि सहकारी “ओबीसी बहुजन पार्टी” रुपाने बीजारोपन केले. मा. प्रकाशआण्णा शेंडगे आणि सहकारी यांची ही राजकीय चळवळ आज ना उद्या महाराष्टाराच्या सत्तेचे केंद्र बनण्यासाठी अडगळीतील ओबीसी, स्वाभिमानी ओबीसी, कुणाच्या बांधिलकीत नसलेला ओबीसी, विधानसभेच्या रणांगणाच्या तयारीसाठी आतापासूनच साथसोबत येवू लागला आहे.
आता कुठे सुरुवात झाली. ओबीसी बहुजनांच्या राजकीय परिवर्तनाची सुरुवात झाली आणि लोकसभेसारखे मोठे लोकशाहीचे रणांगण सुरु झिले. अवधी अगदीच अल्प मिळाला. या अल्प काळातही काही भागात स्विकारले काही भागात स्विकारले नाही. ग्रामपंचायतपासून जिल्हापरिषदेपर्यंत लोक बांधले गेले आहेत. त्यांच्या लहानसहान कामाच्या माध्यमाने ते प्रस्थापातांच्या जाळ्यात अडकले आहेत. ते जाळे आता हळुहळु एका एका गाठीने सोडवणूक करुन घेवू.
लोकसभेत काहीही होवो,
विधानसभेची तयारी आजपासून करु.
विधानसभेपाठोपाठ येणार्या जिल्हापरिषदा, पंचायतसमित्या, नगरपालिका, महानगरपालिका निव्वळ ओबीसी बहुजन तत्वावर लढु.
या लढ्यांत आपला उमेदवार ओबीसी बहुजनच असणार. एकही प्रस्थापित नसणार.
आज लोकसभेसाठी उभे असणार्या उमेदवारांच्या प्रचारात अनेक प्रकारे अडथळे आणले.
कुठे ओबीसींना मारहाण झाली. कुठे शिवीगाळ केली गेली. प्रचाराच्या गाड्या गावांत येवू दिल्या नाहीत.
प्रकाशआण्णांच्यावर इतका रोष की त्यांच्या गाडीवर काळे फेकले, चप्पलाचा हार घातला, धमकीचे पत्र लिहिले.
माढ्यात, धाराशिव, बीड, परभणी अशा अनेक मतदारसंघांत हा प्रकार झाला.
प्रस्थापितांची हि अरेरावी, दंडेलशाही ओबीसी किती पिढ्या खपवून घेणार.
आरक्षण हक्क संपविले, पुढील पिढी देशोधडीला लागणार.
ओबीसींनो हा अन्याय थोपविण्यास कोणी ब्रम्हदेव येणार नाही.
तुम्हालाच या अन्यायाच्या बदल्यासाठी मा. प्रकाशआण्णा शेंडगे व सहकारी यांच्या राजकीय चळवळीचा भाग व्हायला हवे.
आपण ज्या जिल्ह्यात राहता, त्या जिल्ह्यात स्वत:हुन पुढाकार घेवून ओबीसी तत्वावरील “ओबीसी बहुजन पार्टी” चा सदस्य व्हा.
हि ओबीसींच्या राजकीय परिवर्तनाची चळवळ प्रत्येक ओबीसीपर्यंत न्या. मा. प्रकाशआण्णांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची/तालुक्याची कार्यकारणी तयार करा. जिल्हापरिषद गट निहाय, पंचायतसमिती गणनिहाय रचना करुन आगामी निवडणीकीसाठी तयारीस सुरुवात करा.
आपणास
लोकसभेत अनेक ठिकाणी झालेल्या मारहाणीचा मतातूनच वचपा काढायचाय.
आपले आरक्षण हक्क हिसकावून नेल्याचा बदला प्रस्थापितांची सत्ता नेस्थनाभुत करुनच घ्यायचाय.
बांधवांनो,
विधानसभेच्या रणधुमाळीसाठी अठरापगड जातजमात समुह अन्याय झाल्याच्या एका मुद्द्यावर एक येवू.
प्रस्थापितवर्गास अंगावर घेवून त्यांच्या राजकीय स्थैर्याला प्रंचड मोठ्या धाडसाने सामोरे जाणार्या नेतृत्व मा. प्रकाशआण्णा शेंडगे, मा. प्रा. टि पी मुंडे, मा. चंद्रकांत बावकर, मा. जे डी तांडेल, मा. लक्ष्मणराव गायकवाड आणि महाराष्ट्रातील तमाम सहकारी यांना तनमनधनाने साथसोबत देवू.
🟡🟡🟡🟡🟡🙏🟡🟡
निवांत कोळेकर सांगली
ओबीसी बहुजन पार्टी.
💐💐💐💐
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




