सोशल

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शत्कोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 50

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शत्कोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
50

धरताना दिसतात. इतकेच नव्हे तर टिळकांची तरफदारी करताना दिसतात. याचवर्षी कोठारीचे ‘शिवचरित्र’ ही प्रसिद्ध झाले. पुढे ९ ऑक्टोबर १९७३ ला आठवणीचा आत्मचरित्रपर बाज असलेले ‘जुन्या
आठवणी’ हा आणखी एक पंच प्रसिद्ध झाला, वयाची ८० वी ओलांडल्यावर त्यांच्या ‘प्रभात’ पत्रातून या आठवणींना क्रमबद्ध पूर्वप्रसिद्धी मिळाली आहे. या आठवणींचा केंद्रबिंदू सत्यशोधक समाज, आयुष्यातील सहकारी मित्र, ब्राह्मणेतर चळवळ, अस्पृश्व चळवळ, स्वराज्य पक्ष, लोकमान्य टिळकांच्या आठवणी आदींचा समावेश आहे. सत्यशोधक समाजाच्या इतिहास लेखनासाठी या आठवणी महत्त्वाच्या आहेत. इ. स. १९३१ ला त्यांचे कायदेविषयक तीन ग्रंथ प्रसिद्ध झाले, त्यांचे गोषातील

सुंदर स्त्रिया, निशाचराचा प्रेमविलास, पतिपत्नीप्रेम आदी अनुवादित ग्रंथही आहेत. तसेच नाट्यविषयक व इतर लेख (१९७३), प्राचीन ग्रीस व प्राचीन रोम (१९७४), फ्रेंच राज्यक्रांती (अप्रकाशित) आदी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.

सत्यशोधक मताचा प्रचार करण्याहेतू त्यांनी पुणे येथून १९ जुलै १९१७ रोजी ‘जागरूक’ पत्र सुरू केले, हे पत्र १९२२ साली बंद पडले. १९३६ साली निघालेल्या ‘राष्ट्रमत’ पत्राचे ते काही दिवस संपादक होते. १९३८ साली पां. म. भागवत यांच्याकडून ‘प्रभात’ पत्र त्यांनी घेतले, हयातभर ते या पत्राचे संपादक राहिले. या पत्राच्या आरंभीच्या काळात कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांनी रात्रपाळीचे संपादक म्हणून काम पाहिले, पुढे भारत स्वाधीनतासंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसंदर्भात प्रभातमधून लेखन करून या चळवळीना कोठारींनी पाठिंबा दिला.

वा. रा. कोठारी ब्राह्मणेतर पक्षाच्या स्थापनेपासून या पक्षाचे सदस्य होते. १७ फेब्रुवारी १९३७ साली पार पडलेल्या कायदेमंडळाच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून त्यांचा पराभव झाला. पुणे महानगरपालिकेच्या अनेक निवडणुका त्यांनी नागरी संघटनेच्या वतीने लढविल्या. या निवडणुका संदर्भाने केलेल्या धोरणात्मक बदलाने ते उतारवयात सत्यशोधक मांपासूनच काही अंशी दूर गेलेले दिसतात. वा. रा. कोठारी यांच्या सत्यशोधक समाजाच्या सदस्यत्वासंदर्भात कुठलीही ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र त्यांच्या ‘जुन्या आठवणी’ वरून ते निपाणी (जि. बेळगाव)

येथील सत्यशोधक समाजाच्या सहाव्या अधिवेशनाला (२७ व २८ मे १९१६) महर्षी

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या समवेत उपस्थित होते. या अधिवेशनाच्या आयोजनादरम्यान

महात्मा गांधीचे एक व्याख्यान वा. रा. कोठारी यांनी बेळगाव येथे आयोजित केले होते.

या दरम्यान महात्मा गांधीनी सत्यशोधक समाज चळवळ जाणून घेतली होती.

या चळवळीची काही वैशिष्ट्ये कोठारींनी महात्मा गांधींच्या कानावर घातली असावीत. या अधिवेशनात वा. रा. कोठारी यांची सत्यशोधक समाजाचे प्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली, त्यांच्यासमवेत विठ्ठल विराजी होणे (कोल्हापूरकर) यांचीही प्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली. कोठारी – डोणे यांनी सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी फिरते दौर केले.

सत्यशोधक समाजाचे आठवे अधिवेशन १३ व १४ एप्रिल १९१८ रोजी (शनिवार-रविवार) अकोला येथे भरले, टाऊन हॉल, अकोला येथे भरलेल्या या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सखाराम पाटील होते, तर अधिवेशनाचे अध्यक्ष वा. रा. कोठारी हे होते. वा. रा. कोठारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात १८७३ ते १९१८ पर्यंतच्या सत्यशोधक चळवळीचे सुतोवाच करून एकसंघ समाजाच्या हिताचे विचार मांडले. तसेच जनमानसातील अज्ञान दूर करणे आणि सामाजिक सुधारणांसमवेत आम्हाला (भारताला) स्वातंत्र्य मिळाले तर तेही हवे आहे म्हणून कोठारी यांनी १९१८ ला सत्यशोधक समाजाच्या विचारपीठावरून घोषित केले. अशा या सत्यशोधक वा. रा. कोठारी यांचे १० फेब्रुवारी १९७४ रोजी पुणे येथे निधन झाले.

संदर्भ- १. ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी विचार आणि कार्य-संपादन दैनिक प्रभात, पुणे, २. जुन्या आठवणी-वा. रा. कोठारी, ३. सत्यशोधक समाज अधिवेशने-चिंतन आणि चिंता जी. ए. उगले

कोठेकर
गिरीधर किसनजी
(जन्म-१२-०२-१९६८)

गिरीधर किसनजी कोठेकर हे देऊळगाव, तालुका सेलू, जिल्हा वर्धा येथील सत्यशोधक असून, त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला. व्यवसायाने शिक्षक असलेले कोठेकर हल्ली हिंगणघाट येथे वास्तव्यास आहेत. इ.स. १९८७ मध्ये कोठेकर हे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे व त्यांच्या पत्नी प्रा. नूतन माळवी यांच्या एका शिबिराच्या आयोजनाने संपर्कात आले आणि येथेच ते सत्यशोधक बनले. वर्धा जिल्ह्यात होणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या विविध उपक्रमांत ते सातत्याने सहभागी होत असतात. संदर्भ डॉ. अशोक चोपडे यांच्या टिपणावरून.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button