सर्वांना जय ओबीसी, जय संविधान

सर्वांना जय ओबीसी, जय संविधान
ओबीसीची ताकत खूप मोठी आहे हे सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे पण मान्य करायला कोणी तयार नाहीत. त्यांना असं वाटतं जर आम्ही ओबीसी म्हणून बोललो तर आम्हाला हा मोठा वर्ग राजकारणातून हद्द पार करेल. मात्र त्यांनी हे ही समजून घेतले पाहिजे 58% ओबीसी आहेत. तर कोण कोणाला हद्द पार करेल हे लक्ष्यात घ्या.
सर्व मराठा आमदार मराठा आरक्षणाला पाठींबा देत आहेत, त्यांना आता आपणाला हद्दपार करुन ओबीसी चे सरकार महाराष्ट्रात आणायचे आहे. हे फार अवघड आहे असे नाही, त्यासाठी हवी आहे ओबीसी, दलित, मुस्लिम व इतर बांधवांची एकी !
यासाठी आपण काही नियोजन कारणे गरजेचे आहे असे मला वाटते…
1) स्वतः ला सांगावे लागेल आता मी एका जातीचा नाही तर ओबीसीचा आहे.
2) स्वतः सारखे किमान प्रत्येकानी 10 ओबीसी साठी लढणारे स्वयंसेवक तयार करावे लागतील.
3) आपली विचार धारा कोणत्याही पक्ष्याची असली तरीही आता ओबीसी हिच विचारधारा आम्हांला धरावी लागेल
4) गावामधील आपल्या बांधवाने गावातील ओपन सोडून इतर किती संख्या आहे ही मोजून यादी तयार करावी लागेल.
5) पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्कल नुसार काही आपल्या बांधवांच्या नियुक्त्या कराव्या लागतील.
6) गावा-गावात बैठका घ्याव्या लागतील.
7) आपल्या माता-भगिनी यांना ओबीसी संघर्ष समजावून सांगावा लागेल त्यांनाही सहभागी करुन घ्यावे लागेल.
8) तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात जोडावा लागेल.
9) कोण कोणत्या गावात आपण मायनस जाऊ शकतो तिथे कोणाला पुढे करायचे हे ठरले पाहिजे.
10) प्रत्येकानी जवाबदाऱ्या घ्या, ज्याला बोलता येतय त्यांनी बोला, ज्याला लिहिता येतय त्यांनी लिहा, ज्यांना ज्या पद्धतीने संघटण करता येईल तसं करा.
1) मराठा आरक्षणासाठी कोणी-कोणी पैसे दिले, मुख्यमंत्र्यांना भेटले, निवेदन दिले त्यांना लक्ष्यात ठेवा.
12) ज्या विचार धारेचा उमेदवार आपण शोधत आहोत, तो निष्कलंक असला पाहिजे, त्याचे चळवळीतील कार्य असले पाहिजे असा निष्ठावंत नेता निवडणे गरजेचे आहे. जो कोणत्या ही परिस्थितीत म्यानेज नाही झाला पाहिजे.
13) इथे पैसा महत्वाचा नाही, तर विचार धारा महत्वाची आहे.
14) ओबीसी, दलित, मुस्लिम व इतर हे समीकरण जुळवता आले पाहिजे.
तेही शांत राहणार नाहीत तर….
1) आपल्यामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करतील.
2) आपणाला लालूच, आमिष दाखवतील.
3) पक्ष्यातल्या ओबीसी कार्यकर्त्यांना जवाबदाऱ्या दिल्या जातील.
म्हणून आजच कामाला लागा, आणि इतिहास घडवा, आणि म्हणा, जय ओबीसी, जय संविधान..!




