सोशल

फुरडे ग्रुपची पुढची पिढी आयटी क्षेत्रात…

1) फुरडे ग्रुपची पुढची पिढी आयटी क्षेत्रात…

जन्मभूमीच कर्मभूमी बनविण्याची युवकांना संधी…

सोलापूर : बांधकाम क्षेत्रात गेली तीन दशकाहून अधीक काळ नाव कमावलेल्या फुरडे ग्रुपने बुधवारी आयटी क्षेत्रात पाऊल टाकण्याचे ठरविले आहे. श्री सुनील फुरडे यांचे सुपुत्र रोहन यांनी दमाणीनगर येथील स्वतःच्या जागेत फुरडे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही आयटी कंपनी सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
या नवीन कंपनीच्या निमित्ताने सोलापुरातील युवकांना जन्मभूमीतच कर्मभूमी निवडण्याची संधी मिळत असल्याचे, रोहन फुरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोलापुरात विमानतळ होत असतानाच ही नवीन आयटी कंपनी सुरू होणे म्हणजे सोलापूरकरांनी आमच्या ग्रुप वर वेळोवेळी दाखवलेल्या विश्वासानंतर अल्प प्रमाणात उतराई होण्याचा हा आमचा प्रयत्न असल्याचे फुरडे यांनी स्पष्ट केले. बुधवारी सकाळी दहा वाजता दमाणीनगर येथे शुभारंभ होत असलेल्या या कंपनीच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आहेत, माजी आमदार दिलीप माने आणि लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद ठाकरे या उ‌द्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

1989 मध्ये बांधकाम क्षेत्रात उतरलेल्या फुरडे ग्रुपने 1997 मध्ये अमर कन्स्ट्रक्शन ची स्थापना केली. 2003 मध्ये नाविन्यपूर्ण डिझाईन्स आणि प्रत्येक प्रोजेक्ट गुणवत्तेच्या सर्व पातळ्यांवर शंभर टक्के खरा उतरण्यासाठी फुरडे कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही फर्म स्थापन केली. 2012 मध्ये वेअर हाऊसेस तसेच विविध सेवा देणारा ग्रुप रिअल इस्टेट व कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री म्हणून एक जाणकार खेळाडू म्हणून उदयास आला.

2018 मध्ये रोहित फुरडे यांनी रोहित रिअॅलिटी ही फर्म सुरू करून सोलापूर व पुण्यात प्लॉट्स विक्री तसेच बांधकाम क्षेत्र आणि फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रात कार्य सुरू करण्यात आले.

पुण्याचा सिंहगड रस्ता जलमय आणि सोलापुरातील हवालदिल पालक अशा बातम्या गेल्याच महिन्यात विविध वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आल्या महिन्याभरात पडणारा पाऊस साडेतीन तासात कोसळल्यानंतर असंख्य चिंतित सोलापूरकरांनी त्यावेळी आपापल्या मुलांना व्हिडिओ कॉल लावल्याचेही नंतर स्पष्ट झाले हीच अनिश्चितता दूर करण्यासाठी सोलापुरात आयटी कंपनीचा शुभारंभ करण्याचे फुरडे ग्रुपने फुरडे इन्फोटेक च्या माध्यमातून ठरविले आहे. सोलापुरात रेल्वे पाठोपाठ विमानतळाची कनेक्टिव्हिटी होत असताना फुरडे इन्फोटेक यांच्याप्रमाणेच आणखीही आयटी इंडस्ट्री वाढण्याची नितांत गरज असल्याचे सुनील फुरडे यांनी शेवटी सांगितले.

या पत्रकार परिषदेसाठी कंपनीचे संचालक रोहित सुनिल फुरडे, सीईओ आनंद मार्डीकर, आसिफ बागवान, दिगंबर कोनापुरे व स्टाफ उपस्थित होते.

• रोहन सुनिल फुरडे हे बुधवारी आपल्या सहकारी टीम सोबत फुरडे इन्फोटेक चा शुभारंभ करीत आहेत. अर्थात आयटी इंडस्ट्री मधील ही सुरुवात असून या इंडस्ट्रीचा आणखी विस्तार करण्याचा संकल्प फुरडे ग्रुपने केला आहे.

***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा  

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button