सोशल

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.24

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.24

महात्मा फुले जडणघडण

११

वाचणार कोण ? आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण तर अगदीच कमी होते. म्हणून त्यांनी शक्य तेथे मुलांच्या व मुलींच्याही शाळा काढल्या. पिढ्यानपिढ्या विद्येला वंचित झालेल्या खालच्या जातींतील लोकांना शिक्षणाची गोडी लावण्याची त्यांनी खटपट केली. मुलांना स्वच्छतेचे धडे दिले. त्यांच्या पालकांना भेटून मुलांना न चुकता शाळेत पाठवणे हे कसे त्यांच्या हिताचे आहे ते पटवून दिले. जेथे जेथे लोक जमतात तेथे तेथे जाऊन त्यांच्याशी बोलणे करण्याचा त्यांचा परिपाठ होता. समाजस्थितीचे अवलोकन करण्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी दौरे काढले. देहू, आळंदी, पंढरपूर, जेजुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर इत्यादी क्षेत्रस्थाने समक्ष पाहून त्यांनी त्यांची माहिती करून घेतली. सामाजिक चालीरीती, धार्मिक विधी, सण, उत्सव व समारंभ यांचे बारकाईने निरीक्षण केले. प्राचीन धर्मग्रंथांची छाननी करून त्यावर त्यांनी टीकात्मक लेखन केले. व्याख्याने, संभाषणे व वादविवाद यांच्याद्वारे खिस्ती धर्माचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्याची त्यांनी शिकस्त केली. मुंबई व पुणे येथे त्यांच्या संस्थेत यांची साप्ताहिक व्याख्याने होत. त्यासाठी येणारा श्रोतृसमुदाय बहुतांशी खिस्ती व सरकारी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा असे. मुंबईस स्कॉटिश मिशनच्या सभागृहात डॉ. विल्सन यांची व्याख्यानमाला कित्येक वर्षे नियमितपणे चालू होती. या मालेतील एका व्याख्यानसत्रासंबंधी तत्कालीन मराठी वृत्तपत्रात आलेली खालील माहिती खचितच लक्षणीय आहे. ” पहिल्या व्याख्यानाला पुष्कळ हिंदी लोक हजर होते. मि. विल्सन यांनी सुरू केलेली ही व्याख्यानमाला श्रोत्यांना चित्तवेधक वाटल्याखेरीज राहणार नाही. परंतु त्याचबरोबर त्यांना सतावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आवश्यक असलेले साधन-साहित्य त्यांना या व्याख्यानातून मिळेल. शिवाय जगाच्या सामान्य इतिहासाविषयी आणि त्यात घडून आलेल्या मोठमोठ्या परिवर्तनाविषयी त्यांना बहुमोल माहिती मिळेल. धर्मातर घडवून आणणे हे जरी त्यांचे उघड उद्दिष्ट असले, तरी त्यासाठी बुद्धीला खाद्य पुरवून विचाराला चालना देण्याची व स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची साधने उपलब्ध करून देण्याची त्यांची इच्छा असते.” बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ पत्रातील या व्याख्यानमालेसंबंधीचा हा अभिप्राय आहे. त्यावरून ही व्याख्याने त्याकाळी

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button