सोशल

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशा.25

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशा.25

महात्मा फुले यांच्या या सच्चा शागीर्दासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाही. बहुधा झगडे १९१० सालापूर्वी निवर्तले असावेत. संदर्भ म. फुले समग्र वाङ्मय – संपा. य. दि. फडके

झुंजारराव शंकरराव जयराम (जन्म १८-६-१८८५-मृत्यू १९३४)

सत्यशोधक ब्राह्मणेतर पुढारी झुंजारराव शंकरराव जयराम हे ठाणे जिल्ह्यातील ब्राह्मणेतर पुढारी असून त्यांचे मूळ आडनाव पवार असून झुंजारराव ही त्यांच्या घराण्याला मिळालेली बिरुदावली होय. अशा या शंकरराव झुंजाररावांचा जन्म १८ जून १८८५ रोजी मुरबाड तालुक्यातील तरळगाव-नेवाळवाडा येथे झाला.

शंकररावांचे वडील जयराम शेती व सावकारी करीत असत. पुढे शंकररावांनी मुरबाड लोकल बोर्डाचे सदस्य, कल्याण न. प. चे सदस्य आणि कल्याण न. प. चे अध्यक्षपद भूषविले (१९३२-३४).

दरम्यान १९२८ साली ते मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते (आमदार). त्यांनी ‘जिल्हा शेतकरी विद्याप्रसारक संघ-ठाणे’ या संस्थेची स्थापना केली होती. त्यांचे ‘ब्राह्मणेतर पक्षाची संघटना’ या विषयाच्या अनुषंगाने १२ ऑगस्ट १९२८ रोजी कराड येथे सत्यशोधक शाहीर रामचंद्र घाडगे यांनी रविवार चौकात एक जाहीर व्याख्यान ठेवले होते.

अशा या झुंजार सत्यशोधकाचे निधन १९३४ साली झाले. संदर्भ- डॉ. मा. गो. माळी यांचे टंकलिखित टिपण

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button