सोशल

श्रीकृष्ण जन्मोत्सव २०२४

प्रेस न्यूज

2) श्रीकृष्ण जन्मोत्सव २०२४

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन सोलापूरच्या वतीने, श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव सोमवार, दि. २६ आणि मंगळवार, दि. २७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.

ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण कंसाच्या कारागृहात प्रकट झाले त्यावेळी संपूर्ण कारागृह प्रकाशित झाला आणि अंधकार नष्ट झाला त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्ण जेव्हा या पृथ्वीतलावर, आमच्या हृदयामध्ये प्रकट होतात त्यावेळी अज्ञान रूपी अंधकार नष्ट होऊन आपल्या जीवनात दिव्य ज्ञान आणि आनंद प्रदान करतात

मंदिराच्या वतीने दोन दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे. सोमवारी दि २६ ऑगस्ट २०२४, रोजी पहाटे 4.30 वाजता काकडा आरती पासून कार्यक्रमास प्रारंभ होईल. 8 वा. लक्ष तुलसी अर्चना त्यानंतर सकाळी १० वाजता विष्णू सुदर्शन महायज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे.

सायंकाळी ५ ते १० या वेळेमध्ये भजन, कीर्तन, सर्व यजमानांच्या द्वारे श्री श्री राधा-कृष्णांचा कलश महाअभिषेक करण्यात येईल. तदनंतर कृष्ण-कथा आणि रात्री ठीक १२ वाजता कृष्ण जन्मोत्सव, महाआरती आणि भगवंतांना 56 भोग अर्पण करण्यात येतील.

मंगळवार दि-२७ ऑगस्ट २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापकाचार्य अभय चरणारविंद भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांची 128 वी जयंती म्हणजेच व्यासपूजा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे सकाळी 9 वा. अभिषेक, शब्दांजली पुष्पांजली आणि दुपारी 12.30 वा. महाआरती व १:३० वाजता सर्वासाठी महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

जन्माष्टमीच्या अनुषंगाने मंदिरात संपूर्ण दिवस हरिनाम संकीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे भगवंतांचे विशेष शृंगार दर्शन भगवंतांचा पाळणा, अध्यात्मिक प्रश्नोतरे, गोविंद महाप्रसाद, अध्यात्मिक ग्रंथ भांडार, पूजेचे साहित्य आणि प्रसाद असे आध्यात्मिक आकर्षण असेल.

मंदिराच्या वतीने संपूर्ण सोलापूरतील नागरिकांना या जन्माष्टमीच्या सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष श्रीमान कृष्णभक्त प्रभू यांनी आमंत्रित केलेले आहे.

कार्यक्रमाच्या अधिक माहिती आणि सेवेसाठी 9823920072 किंवा 9326981533 या नंबर वर संपर्क करा.

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे II

***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा  

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button