सोशल

मान देश जिल्ह्याचे ठिकाण सांगोला झाले पाहिजे! शंकरराव लिंगे

मान देश जिल्ह्याचे ठिकाण सांगोला झाले पाहिजे!
शंकरराव लिंगे

सांगोला नगरपालिकेची स्थापना 1856 स*** झाली होती आत्ता लवकरच मान जिल्ह्याचे ठिकाण सांगोला होणार!
..

सांगोला तहसील कचेरी गजबजलेले ठिकाण विस्तारित जागेत स्थलांतरित
करण्याची गरज!!! स्पेशल रिपोर्ट शिवक्रांती टीव्ही दिन बंधूंनी व संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

सांगोला शहर एक ऐतिहासिक शहर आहे हा तालुका पर्जन्य छायेतील तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात सरासरी 15 ते 20 इंच पाऊस पडतो या तालुक्यातील अनेक नागरिक नोकरीच्या शोधासाठी शेजारच्या माळशिरस सांगली सातारा कोल्हापूर कराड साखरपट्ट्यात पुणे मुंबई रत्नागिरी रेडी बंदर गोवा सुरत आमदाबाद संपूर्ण देशात शेजारच्या सारख देशात आखाती देशात पडेल ते काम हमाली दुकानातील कामगार सफाई धुळे भांडी स्वयंपाक घरकाम कामगार गोदी कामगार कापड गिरणी सूतगिरणी कामगार हेल्पर ड्रायव्हर किन्नर सोने चांदी गाळणे भंगार गोळा करणे सेंट्रींग बांधकाम काम मजुरी दगडाच्या लोखंडाच्या खाणीमध्ये दगड फोडणे खडी फोडणे काम करणे ऊस तोडीला लाकड फोडीला देशोधडीला गेला आहे

या तालुक्यात उद्योग व्यवसाय एमआयडीसी नाही भाटघर वीर निरा देवधर उजनी टेंभू ताकारी म्हैसाळ उरमोडी अशा अनेक पाणी योजना आज पर्यंत पूर्ण झालेले नाहीत गेल्या -पंचवीस 30 वर्षांपूर्वी डाळिंब बोर बागांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली कमी पाण्यामध्ये हे पिके येऊ लागले डाळिंबाच्या अनेक जाती शोधून काढल्या गेल्या संशोधित झाल्या सांगोल्याचे डाळिंब जगात प्रसिद्ध झाले त्यामधून शेतकऱ्याला चांगले पैसे मिळू लागले त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर पाण्याचं मंगळवेढा ज्वारीच्या दाण्याचं आणि आता सांगोला सोन्याच झाल आहे कचेरीवर अनेक व्यवहाराची देवाण-घेवाण खरेदी-विक्री होत असते

याच ठिकाणी पूर्वी पोलीस स्टेशन होते ते आता मार्केट यार्ड जवळ गेले आहे आता तलाठी कार्यालय तहसील कार्यालय निवडणूक कार्यालय शेतू कार्यालय रजिस्टर कार्यालय सिटीसर्वे भूमापन कार्यालय वनविभाग कार्यालय सामान्य प्रशासन कार्यालय त्या अनुषंगाने व्यवसाय चहापाणी हॉटेल जेवण खानावळ रसवंती ग्रह कोल्ड्रिंक झेरॉक्स टायपिंग कॅम्पुटर स्टॅम्प होल्डर लेखनिक त्या अनुषंगाने मार्गदर्शक मध्यस्थी यांचे व्यवसाय इत्यादी महत्त्वाची कामे इंग्रज काळापासून याच ठिकाणी होत आहेत आता ही जागा फारच अपुरी पडू लागली आहे रोज एक हजार आठशे मोटरसायकली पाच 50 कार गाड्या इत्यादी वाहने येथे पार्किंग केल्यामुळे जवळच असलेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशाला हायस्कूल कॉलेज शाळेकडे जाणारी येणारी विद्यार्थ्यांची खूपच गर्दी असते येण्या जाण्यासाठी आता रस्ता शिल्लक राहत नाही अनेक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते अत्यंत गजबजलेला हा परिसर आहे म्हणून येथील कार्यालय नवीन विस्तीर्ण मोठ्या जागेमध्ये होण्याची अत्यंत गरज आहे

आत्ता शासनाने काही नवीनजिल्हे घोषित केले आहेत त्यामध्ये मान देश जिल्हा एक आहे मान देश जिल्हा हा मान नदीच्या खोऱ्याचा परिसर आहे आणि हा पर्जन्य छायाचा संपूर्ण भाग आहे या जिल्ह्यामध्ये मान दहिवडी आटपाडी खानापूर कवठेमंकाळ असे सात-आठ महत्त्वाचे तालुके येतात जत सांगोला मंगळवेढा सांगोला हे रत्नागिरी नागपूर हायवे वर असून रेल्वे स्टेशन आणि मध्यवर्ती ठिकाण आहे मंगळवेढा कवठेमंकाळ सांगोला खानापूर आटपाडी या तालुक्यांना येण्या जाण्यासाठी सोयीचे मध्यवर्ती ठिकाण आहे त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी जर प्रयत्न केला तर सांगोला हे जिल्ह्याचे ठिकाण होऊ शकते त्यामुळे भविष्याचा विचार करून सांगोला मध्ये असणारी डाळिंबाची आणि खिलार जनावरां ची बाजारपेठ उर्वरित राहिलेल्या पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर सांगोल्याचा कायापालट होण्यास सुरुवात होईल म्हणून सांगोल्याला जिल्ह्याचे ठिकाण घोषित करून काम चालू करावे अशी लोकप्रतिनिधींना विनंती आहे…

आज पर्यंत वजनदार नेते भाई गणपतराव देशमुख यांचे शासनामध्ये वजन होते त्यांनी अनेक पाणी योजना आणि परिषदा घेऊन यशस्वी केल्या आहेत जवळजवळ साठ वर्षे त्यांनी सांगोल तालुक्याचे नेतृत्व केले आहे सूतगिरणी सारखा यशस्वी प्रोजेक्ट सांगोल्या मध्ये चालू केला होता पांडुरंग भांबुरे आनंदराव बनसोडे यांनी स्थापन केलेला साखर कारखाना दीपक आबा साळुंखे शहाजी बापू पाटील यांना चालवता आला नाही शहाजी बापू पाटील यांनी एक सूतगिरणी दीपक आबा पाटील यांनी एक सूतगिरणी 1980 स*** आणली होती परंतु आज पर्यंत त्याचं काय झालं चालू सुद्धा झाली नाही बहुतेक त्या संस्था अवसानात गेल्या आहेत

याशिवाय मोठे उद्योग सांगोला तालुक्यात आले नाहीत शासनाचे धोरण होते प्रत्येक तालुक्याला एक एमायडिसी सांगोल तालुक्याला एमआयडीसी आली नाही सांगोला तालुक्याचे दोन वेळा नेतृत्व आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे 1995 ला ते 192 मतांनी निवडून आले आणि काँग्रेसची सत्ता गेल्यामुळे ते विरोध पक्षातच राहिले त्यामुळे ज्यादा काम करू शकले नाहीत असे बापू म्हणतात आता मात्र या पंचवार्षिक मध्ये ते सत्तेमध्ये आहेत सांगोला तालुक्यावर पूर्ण लक्ष आहे

त्यामुळे सांगोला तालुक्यामध्ये खूप पैसा आलेला आहे सांगोला तालुक्यातील मान कोरडा अपूर्वका बेलवान नद्या काही ओढे नाले यामधील वाळू संपूर्ण खरडून तस्करी झाली आहे साठ वर्षाची कसं काढली आहे शहाजी बापू चे कायम सांगोला तालुक्यावर लक्ष असते त्यांचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जवळचे वडिलांसारखे आहेत महाराष्ट्रामध्ये शहाजी बापू हा एकच शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा नेता आहे मराठा आरक्षणासाठी जरांगेणि कितीही अट्टा पट्टा केला तरी शहाजी बापूंनी त्यामध्ये लक्ष घातले नाही तसेच सांगोला तालुक्यातील अवैध धंदे वाळू तस्करी यामध्येही त्यांनी लक्ष घातले नाही त्यामुळे कधी नव्हता एवढा पैसा सांगोला तालुक्यातील शहाजी बापू यांच्या कार्यकर्त्याकडे आला आहे तालुक्यामध्ये आला आहे

त्यांची आणि कार्यकर्त्याची कडकी दूर झाली आहे राहिला बंगला नव्हता गाडी नव्हती घरी कपडे किराण्याचे पुढीचे वांदे होते प्रत्येक निवडणुकीत खर्चासाठी बरीच जमीन विकली आहे असं म्हणत होते ती परत मिळण्याचा प्रयत्न चालू आहे आता हे बापूंचे सर्व महत्त्वाचे प्रश्न गोहाटी वरून आल्यानंतर सुटले आहेत त्यामुळे सर्व सांगोला तालुक्यातील जनता खुश आहे शेकडो कोटी रुपयाची कामाची घोषणा झालेली आहे हे काम पूर्ण करायचे असेल तर राजेभाऊ आपणास निवडून दिले पाहिजे असे शहाजी बापूंना वाटते दहा वर्ष आमदारकी भोगली तरी कोणत्याही ठोस काम तरुणांसाठी रोजगार निर्मिती शेती उद्योग व्यवसाय वाढीसाठी ठोस काम शहाजी बापू यांच्याकडून झालं नाही एखादी रेल्वे गाडी गोव्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालू करता आली नाही गोवा दिल्ली सांगोल्या वरन कमी अंतर आहे दररोजकोल्हापूर नागपूर गोंदिया कोल्हापूर हैदराबाद गोवा निजामाबाद या रेल्वे गाड्या चालू करता आल्या असत्या परंतु शहाजी बापू म्हणतात पुन्हा निवडून द्या राहिलेली सर्व काम केल्याशिवाय राहणार नाही

पुन्हा सुरतला जाऊन सांगोल्याला सोन्याची मुरत बनवू गोहाटी ला जाऊन आसामची डोंगर झाडी पाणी सांगोल्याला आणू गोव्याला जाऊन फाईव्ह स्टार हॉटेल सांगोल्याला आणू हे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर ओके करायचं असेल तर मलाच निवडून द्यावे? त्याचप्रमाणे अकरा वेळा निवडून आलेले भाई गणपतरावजी देशमुख सध्या हयात नाहीत त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख हेही या निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक आहेत 2019 च्या निवडणुकीमध्ये अनिकेत देशमुखआणा निसटता सात आठशे मतांनी पराभव झाला होता हाके यांनी पंधराशे मतं खाल्ली होती आज प्राध्यापक लक्ष्मण हाके महाराष्ट्रभर ओबीसी नेते म्हणून वडीगोद्री उपोषण करते म्हणून प्रसिद्ध झाले आहेत तेही सांगोला तालुक्याचे सुपुत्र आहेत त्यांनाही निवडणुकीचे वेध लागले आहे

दीपक आबा साळुंखे पाटील गेल्या 45 वर्षापासून निवडणूक आली की उभा राहायचं म्हणतात कार्यकर्त्यांची मीटिंग घेतात आणि कार्यकर्त्यांची एकच मागणी असते आबांनी आता तरी उभे राहावे परंतु आजपर्यंत ते कधीही उभे राहिले नाहीत विधानसभेला ते उभे राहतात की न राहता त्यावेळी क्लेम करतात की न करता त्याबद्दल शंका वाटते करण सत्ताधारी पक्षांमध्येच अजित दादा यांचा गट आहे आणि ते त्याच गटाचे आहेत विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील शिवसेना शिंदे गडाकडे आहेत त्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता फारच कमी आहे

डॉक्टर देशमुख निवडून आले तर नद्या नाले ओढे यामध्ये पाणी वाळू येड्या बाभळी सुरक्षित राहील जनतेचे संरक्षण होईल विकास होईल का नाही परंतु जनता सुरक्षित राहील सांगोला सुरक्षित राहील पूर कधीही येणार नाही दुष्काळाच्या झळा जास्त बसणार नाहीत मोफत धान्य जनावरांना चारा पिण्याचे पाणी रोजगारहमीचे काम कमी पडणार नाही असे जाणकाराचे मत आहे, सांगोला ची जनता हुशार आहे निश्चितपणे विचार करून योग्य तो उमेदवार निवडतील यात शंका नाही!

दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button