सोशल

मंडलनामा क्रमशः 10.राज्य संघटनेची स्थापना

मंडलनामा क्रमशः 10.राज्य संघटनेची स्थापना

मी ओबीसी चळवळीत का व कसा सहभागी झालो हे यापूर्वीच येथे लिहले आहे. कालांतराने ओबीसी चळवळीचा घटक झालो. मी व ओबीसी चळवळ हे अतुट नाते तयार झाले. या चळवळीतील वेगवेगळ्या जातींची माहिती व नेते-कार्यकत्यांच्या ओळखी यातून माझा परिघ वाढला. राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाच्या स्थापनेत त्यावेळच्या आदरणीय राष्ट्रीय नेत्यांसोबत माझाही खारीचा वाटा राहिला आहे. मी पूर्णवेळ ओबीसी चळवळीला वाहून घेतले. तत्कालीन पत्रकार व आत्ताचे आमदार कपिल पाटील यांनी मला मुस्लिमांतील ओबीसींसाठी संघटना स्थापन करून चळवळ करावी, असे सुचवले होते. आमचे नेते जनार्दन पाटील यांचेही असेच मत होते. त्यांची प्रेरणा व कपिल पाटील यांचा सततचा पाठपुरावा यामुळे मुस्लिमांमधील ओबीसींना संघटित करण्यासाठी १९८१ मध्ये संघटना स्थापन केली. तिचे नाव ठेवले महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटना. हे नाव जनार्दन पाटील यांनी सुचवले.

आपल्यातील काही जण ओबीसी प्रवर्गात सामील होऊ शकतात हेच मुसलमानांना माहीत नव्हते. काका कालेलकर आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला नाही पण मागासवर्गीय जाती शोधून सवलती व आरक्षण द्यावे, असे निर्देश राज्यांना दिले. त्यानुसार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी इतर मागासवर्गीय शोधण्यासाठी बी. डी. देशमुख समिती स्थापन केली. देशमुख समितीने १८० मागास जाती शोधून काढल्या. या मागास जातींना सवलती देण्याचा निर्णय १९६७ मध्ये घेण्यात आला. राज्यातील ओबीसींच्या यादीत समाविष्ट मुस्लिमांतील काही जातींचा शोध
घेत मी चळवळीत दाखल झालो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेच्या स्थापनेला खूप महत्त्व आहे. माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वी संपूर्ण देशात मुस्लिम ओबीसींची संघटना स्थापन झालेली नव्हती. उत्तर भारतात समाजवादी राजकीय पक्ष व चळवळीतील काही मुस्लिमांना गरीब मुसलमांनांबद्दल सहानुभूती होती, पण स्वतंत्र संघटना नव्हती. त्यांच्यापैकी कोणीही मुस्लिमांतील ओबीसींना संघटित केले नव्हते. समता व शांती या दोन तत्वांवर मुस्लिम धर्म उभारलेला आहे. त्यामुळे मुसलमानात जाती नाहीत, मग ओबीसी कसे असणार, असा प्रश्न त्यांना पडला असावा. मलाही हा प्रश्न पडला होता. महाराष्ट्रात मुस्लिम ओबीसींची संघटना स्थापन झाली पण तिचे कार्य

वाढवणे व विस्तार करणे वाटते तेवढे सोपे नव्हते. हिंदू ओबीसींसमोरही तोच गहन प्रश्न असताना माझ्या सारख्या सामान्य मुस्लिम कार्यकर्त्यांसमोर डोंगराएवढे आव्हान होते. ओबीसींच्या नावे जे जे सुरू होते, तेथे आपली हजेरी राहिली पाहिजे, हे तत्त्व मी पाळले व चळवळीच्या प्रवाहात टिकून राहिलो. दरम्यान, राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाची स्थापना झाली व तिच्या माध्यमातून मी सक्रिय राहिलो. महासंघ व महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सामील होत असे. पण मुस्लिम ओबीसी संघटनेला फार कार्यकर्ते मिळाले नाहीत. अगदी सुरुवातीच्या काळात हिंदू ओबीसी, दलित नेते व कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या संपर्कातून राज्यातील काही शहरात महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेची कार्यकारिणी तयार करून शाखा स्थापन केल्या. या शाखांचे कार्य भरीव प्रमाणात झाले नाही. अनेक ठिकाणी कार्यकारिणी नावालाच होती. स्थानिक मंडळी परिस्थिती निर्माण होईल तेवढ्यापुरते सक्रिय होत. मुस्लिमांतील ओबीसी किंवा गरीब मुसलमानांना संघटित करणे त्यांना जमत नव्हते. काही जण प्रयत्न करत, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडत. माझ्या व इतर काही जणांच्या पुढाकाराने काही ठिकाणी मेळावे होत. मी पुढाकार घेऊन ओबीसीच्या वेगवेगळ्या बिरादरींतील काही जणांना मेळाव्याला बोलवायचो, मात्र त्यांचाही सहभाग तेवढ्यापुरताच राहायचा. त्यांच्याकडून नंतर पाठपुरावा केला जात नव्हता किंवा मी पाठपुरावा केला तरी प्रतिसाद मिळत नव्हता. अनेक ठिकाणी मेळावे, बैठका व कार्यक्रमांना प्रखर विरोध होत असे. विरोधाचे मुद्देही तेच होते. एकूणच राज्य संघटनेचा विस्तार

मा.श्र

■ औरंगाबाद येथील मेळाव्यात पी. ए. इनामदार, नसीम महात, शब्बीर अन्सारी, कपिल पाटील, आमदार हाफीज धतुरे व सय्यद फारुख.

करणे फार कठीण होते.

जनता दल सरकारचे पंतप्रधान व्ही. पी सिंह यांनी ७ ऑगस्ट १९९० रोजी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतल्यानंतर काही मुस्लिमांमध्ये उत्सुकता निर्माण होऊन मला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली. पण ही प्रक्रिया अत्यंत संथ होती. सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा जनता दल सरकारचा निर्णय योग्य ठरवला. त्यानंतर १९९३ मध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला गती मिळाली व राज्य संघटनेच्या कामाला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झालो. राज्य संघटनेच्या स्थापनेपासून १९९३ पर्यंत सुमारे तेरा वर्षांच्या काळात मला अनेक सहकारी मिळाले. त्यांच्यामुळे राज्य संघटना टिकून राहिली.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button