आपले मत कोणाला ?

आपले मत कोणाला ? _ ____________________
सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो , 2024 ची सार्वत्रिक निवडणूक म्हणजे देशाची खासदार निवडण्याची आहे.ही निवडणूक इतर निवडणुकीपेक्षा फारच महत्त्वाची असते कारण आपण निवडून पाठवलेले खासदार हे देशाचा पंतप्रधान निवडतात.लोकसभेत बसून जनतेला किती कर लावायचा , कर्ज किती घ्यायचे ,
सरकारी तिजोरीतील पैसा शेती शिक्षण रस्ते वीज पाणी सिंचन उद्योग संरक्षण यावर किती खर्च करायचा, शेतकरी कामकरी विद्यार्थी सुशिक्षित बेकार यासाठी कोणत्या आणि किती योजना आखायच्या ,लोकसंख्येनुसार sc st obc अल्पसंख्य प्रवर्गासाठी संख्येनुसार किती पैसे खर्ची टाकायचे , संशोधनावर किती खर्च करायचा ,इत्यादी विषयाचे धोरण हे खासदार लोकसभेत दिल्लीत संसद भवनात बसून ठरवीत असतात.तसेच महागाई किती वाढवायची की घटवयची ,
बेकारी वाढवायची की कमी करायची , भ्रष्टाचाराला संधी द्यायची की बंदी घालायची ? हे खासदार ठरवितात.तसेच जाती आणि धर्माची भांडणे लावायची की नफरत रोकायची हे पण खासदार च ठरवीत असतात.म्हणूनच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या जीवन मरणाशी संबंधित अशी असते.हे लक्षात घेऊनच मतदान करायचे असते.
मतदान हे एक पवित्र दान असून ते अपवित्र कामास मदत करणारे नसावे,याची जाण असली पाहिजे .तसेच मतदान हे राष्ट्र निर्माण कार्यास उपयोगी ठरावे सामाजिक ऐक्य ,राष्ट्राची अखंडता , देशात अहिंसा शांतता बंधुभाव प्रस्थापित होईल असेच सरकार आणि अशाच पक्षास निवडून दिले पाहिजे.एकंदरीत आपले मत कुणाला? या संबंधी काही प्रस्न मी इथे निर्माण केले आहेत ,या प्रस्नांची आपली उत्तरेच देशहिताचे,रस्त्रहिता चे हे ठरेल.ते प्रस्न खालील प्रमाणे आपले मत कुणाला ?
1 संविधान वाचविण्या साठी की मनुस्मृती लागू करणेसाठी ? . 2 लोकशाहीला की हुकुमशाही ले. 3 देश विकणाऱ्याला की देश वाचविनाऱ्याला ? 4 खाजगीकरण की सार्वजनिक नोकऱ्या ? 5 सार्वजनिक सरकारी मालमत्ता कारखाने जमिनी डोंगरे रस्ते विमान रेल्वे औषधी कारखाने फायद्यात असताना भांडवलदारांना विकणारायाना की न विकणाऱ्यांस?
5 शाळा दवाखाने सरकारी की खाजगी मालकांना? .. 6 सहकारी संस्था सोसायट्या कारखाने लोकांसाठी की खाजगी मालकीची ? करणाऱ्यांना ,? 7 लोकशाही टिकविण्यासाठी विरोधी पक्षाचे आणि मीडिया चे महत्व समजून त्यांना वाचविनाऱ्याना की त्यांना संपविनाऱ्यांस ? 8 धर्माचा राजकारणासाठी वापर करणाऱ्याला की धर्माचे स्वतंत्र स्थान तिकविनाऱ्याना ? 9 बँकांना लुटणाऱ्या लोकांना जेल मध्ये न टाकता त्यांना परदेशात सुरक्षित ठेवणाऱ्या पंतप्रधान यास ?
१० भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात ठेवीन असे जनतेस आश्वासन देऊन निवडून येणाऱ्या आणि त्यांना सत्तेत खुर्च्या देणाऱ्या पक्षास ? 11 अच्छ दिन लाऊंगा म्हणून गगनाला भिडणारी महागाई , बेकरीचा कळस गाठणारा , जगात नव्हे एव्हढा मोठा निवडणूक रोख्यांचा घोटाळा करणाऱ्या पक्षास? 12 आर एस एस ची राजकीय शाखा असलेली बीजेपी पक्ष ,आणि आर एस एस चे दलीत मुस्लिम विरोधी धोरण, त्या संघटनेची वर्णव्यवस्था आणि मनुवाद ची जाती व्यवस्था ,
अस्पृश्यतेचे मान्यता म्हणजे देशाचे सामाजिक ऐक्य आणि देशाची अखंडता यास धोका निर्माण करणारे धोरण ,कार्यक्रम यास मत देणार की भारतीय नागरिक यांचे हक्क अधिकार स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय समाजवाद सर्वधर्म समभाव असे धोरण असणारा पक्ष या दोघा पैकी आपले मत कुणाला देणार ,? या 12 प्रस्नानांचे चुकीची उत्तरे दिलीत तर नक्कीच तुमचे पण 12 वाजल्या शिवाय राहणार नाहीत.गुलामी शिवाय तुमच्या पदरी दुसरे काहीच नाही.हा गंभीर इशारा आज मी आपणास देतो आहे. _. लेखक : दत्ता तुम वाड 9420912209.




