सोशल

ओबीसींच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करा; अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन! – बुलडाणा तालुक्यातून माळी महासंघाचा सरकारला इशारा

🚨 ओबीसींच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करा; अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन! – बुलडाणा तालुक्यातून माळी महासंघाचा सरकारला इशारा

दिनबंधू न्यूज |
बुलडाणा | दि. २० जुलै २०२६ :
अखिल भारतीय माळी महासंघ, बुलडाणा तालुक्याच्या वतीने ओबीसी समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या तातडीने मंजूर करण्यासाठी आज अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाठक यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनाचे नेतृत्व विष्णुभाऊ भोपळे (कोलवड ग्राम शाखा अध्यक्ष), सुभाष गोरे (सागवन ग्राम शाखा अध्यक्ष), अशोक हुडेकर (नांद्राकोळी ग्राम शाखा अध्यक्ष) आणि पांगरी उबहंडे ग्राम शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

📌 निवेदनातील प्रमुख मागण्या

➡️ ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना तातडीने करावी.
➡️ ओबीसी आरक्षणाचे संपूर्ण संरक्षण करण्यात यावे.
➡️ न्यायमूर्ती शुक्रे, शिंदे व भोसले समितीच्या शिफारशींचा पुनर्विचार करून त्या रद्द कराव्यात.
➡️ सन २००४ मधील कुणबी–मराठा/मराठा–कुणबी संदर्भातील शासन निर्णय रद्द करावा.
➡️ बोगस कुणबी व मराठा-कुणबी दाखले रद्द करावेत.
➡️ ओबीसी समाजाच्या सर्व महामंडळांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा.
➡️ महाज्योती संस्थेला पुरेसा निधी व विभागीय कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.
➡️ ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, फेलोशिप व इतर शैक्षणिक योजना वेळेत वितरित कराव्यात.
➡️ परीक्षा रद्द किंवा विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विशेष भरपाई योजना लागू करावी.
➡️ शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा धरून हमीभाव द्यावा.
➡️ शेतकऱ्यांना बिगरव्याजी कर्ज, बियाणे, खते व शेतीसाठी विशेष सवलती द्याव्यात.
➡️ अग्निवीर योजना रद्द करून नियमित सैन्य भरती सुरू करावी.
➡️ जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी.
➡️ सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा किमान ₹१०,००० बेरोजगारी भत्ता द्यावा.
➡️ केजी ते पीजीपर्यंत शिक्षण मोफत करावे.
➡️ सर्व नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

महासंघाने स्पष्ट इशारा दिला की, या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.

निवेदन सादर करताना रमेशभाऊ हिरळकार (विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष), सौ. प्रिती विशाल खंडारे (बुलडाणा जिल्हाध्यक्षा – घाटावरील विभाग), भानुदास हुडेकर (जिल्हा उपाध्यक्ष, कर्मचारी आघाडी), राजेंद्र पवार (तालुका अध्यक्ष), रमेश उबाळे (तालुका उपाध्यक्ष), उद्धव पवार (तालुका सचिव), प्रशांत मोरे (बुलडाणा शहर अध्यक्ष), विष्णुभाऊ भोपळे, सुभाष गोरे, अशोक हुडेकर, अशोक हुळेकर, ज्ञानेश्वर गोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍️ संपादकीय संदेश

ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि घटनात्मक हक्कांशी संबंधित प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून वेळेत निर्णय घेणे आवश्यक आहे. संवाद, न्याय आणि घटनात्मक तत्त्वांच्या आधारे सकारात्मक तोडगा काढणे ही काळाची गरज आ

📲 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📞 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडा.

👍 बातमी लाईक करा
📤 शेअर करा
▶️ सबस्क्राईब करा
📲 फॉरवर्ड करा
💬 कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा
🟢 दिनबंधू न्यूज व्हॉट्सअॅप चॅनल फॉलो करायला विसरू नका.

#हॅशटॅग

#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #OBC #OBCReservation #जातनिहायजनगणना #माळीमहासंघ #बुलडाणा #महाज्योती #शेतकरी #अग्निवीर #जुनीपेन्शन #शिक्षण #आरोग्य #सत्यशोधकशंकररावलिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button