सोलापूर

🔥 “महात्मा फुले यांचा सन्मान म्हणजे सामाजिक न्यायाचा अभिमान – सोलापूरातून उठला आवाज!” 🔥

🔥 “महात्मा फुले यांचा सन्मान म्हणजे सामाजिक न्यायाचा अभिमान – सोलापूरातून उठला आवाज!” 🔥

सोलापूर शहरात 11 एप्रिल 2026 पासून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त व द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त एक भावनिक व जाज्वल्य निवेदन सादर करण्यात आले आहे. ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करत शहरातील अत्यंत गंभीर प्रश्न मांडले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या द्विशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्येही भव्य उपक्रम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
परंतु अत्यंत खेदाची बाब म्हणजे शहरातील महात्मा फुले यांचा पुतळा सध्या दुर्लक्षित अवस्थेत असून यामुळे समाजमनात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. महान समाजसुधारकाचा हा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच सोलापूरमध्ये आजतागायत सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नसणे ही देखील गंभीर बाब असल्याचे नमूद करण्यात आले.
*** पुतळ्याचे तात्काळ सुशोभीकरण व दुरुस्ती करण्यात यावी.
*** आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात यावी.
*** 30 x 100 फूट भव्य मंडप, स्टेज व स्पीकर व्यवस्था उभारण्यात यावी.
*** सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
*** वर्षभर व्याख्यानमाला, रॅली, शिबिरे, कवी संमेलन आयोजित करण्यात यावे.
*** पदनाट्य व समाजजागृती मोहिमा राबविण्यात याव्यात.
*** महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात यावेत.
*** प्रमुख ठिकाणी भव्य स्मारक व सुशोभित परिसर विकसित करण्यात यावा.
महात्मा फुले यांचे कार्य संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा प्रसार करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या निवेदनावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन सोलापूर शहर सामाजिक परिवर्तनाचा आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

📲 ही बातमी लाईक करा 👍 शेअर करा 🔁 कमेंट करा 💬 फॉरवर्ड करा 📤 सबस्क्राईब करा 🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका
📢 WhatsApp ग्रुपमध्ये जोडा: 73 87 37 78 01
📰 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही | संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे

#महात्मा_फुले #फुले_जयंती #सावित्रीबाई_फुले #सोलापूर #ओबीसी #समाजजागृती #द्विशताब्दी_वर्ष

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button