🔥 रानटी हल्ल्याचा संतापजनक प्रकार! ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यावर प्राणघातक हल्ला – न्यायालयात सुनावणी तापली! 🔥

🔥 रानटी हल्ल्याचा संतापजनक प्रकार! ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यावर प्राणघातक हल्ला – न्यायालयात सुनावणी तापली! 🔥\
ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यावर केलेला रानटी मराठा गावगुंडांनी केलेला हल्ला प्रकरणाची जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून चार मे 2018 रोजी सोलापुरातील विश्रामगृहामध्ये गायकवाड कमिशन मराठा समाज मागासवर्गीय असल्याबाबत ओबीसी समाजाच्या सूचना हरकती ऐकण्यासाठी आले असताना अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मराठा समाज हा प्रगत, जमीनदार, जागीरदार, वतनदार, इनामदार असल्याचे ठणकावून सांगत त्यांचे डझनभर मुख्यमंत्री, अर्ध्याहून अधिक मंत्रिमंडळ, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, सहकार क्षेत्रातील 90% साखर कारखाने, दूध संघ, बँका, शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यात असल्याने त्यांना ओबीसी आरक्षण देऊ नये अशी ठाम भूमिका आयोगासमोर मांडली.
याच वेळी रानटी गावगुंडांनी दहशत माजवत झेरॉक्स केमिकलशाही लिंगे यांच्या चेहऱ्यावर चोळून डोळ्यांत टाकली, ज्यामुळे डोळ्यांतील रक्तपुरवठा करणाऱ्या नसांवर गंभीर परिणाम होऊन दोन्ही डोळे रक्तबंबाळ झाले आणि त्यांची दृष्टी गंभीररीत्या बाधित झाली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी माऊली पवार, सोमनाथ राऊत, रवी मोहिते यांच्यावर खटला दाखल असून गेल्या वर्षापासून सुनावणी सुरू आहे मात्र आरोपी व त्यांचे वकील वारंवार गैरहजर राहून तारखा घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
न्यायालयाने मागील दोन-तीन तारखांना साक्षीदार व पंचांची साक्ष घेतली असून आज प्रमुख फिर्यादी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी न्यायालयात थरकाप उडवणारी साक्ष देत सांगितले की त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी फक्त 5% तर दुसऱ्याची 25% उरली असून हा थेट प्राणघातक हल्ला आहे आणि त्यांना अपंग करण्यात आले आहे, त्यामुळे आरोपींवर कठोर कलमे लावून फेरतपासणी करून कडक शिक्षा देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.
मागील सुनावणीवेळी साक्षीदारांच्या उलट तपासणीसाठी तीन संधी देऊनही आरोपी गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांची संधी रद्द करत स्पष्ट आदेश दिला असून त्यांच्या टाळाटाळीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. पुढील सुनावणी 4 एप्रिल 2026 रोजी ठेवण्यात आली आहे.
आजच्या सुनावणीस सरकारी वकील प्रा. राजन दीक्षित, समता परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे, अखिल भारतीय माळी महासंघाचे खजिनदार संजय इनामदार उपस्थित होते.
📢 सोशल मीडिया संदेश:
ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा! अन्यायाविरुद्ध आवाज उठवा!
📲 दिन बंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01 (आपल्या ग्रुपमध्ये जोडा)
👉 बातमी लाईक करा 👍
👉 शेअर करा 🔁
👉 सबस्क्राईब करा 🔔
👉 कमेंट करा 💬
👉 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!
#JusticeForLinge
#OBCVoice
#StopViolence
#SolapurCourt
#ShivkrantiTV
#DinBandhuNews








