“नागपुरमध्ये सकल OBC महामोर्चा — २ सप्टेंबरचा ‘काळा’ GR तुरंत रद्द करा!”

📣 “नागपुरमध्ये सकल OBC महामोर्चा — २ सप्टेंबरचा ‘काळा’ GR तुरंत रद्द करा!”
नेतृत्व : विजय वडेट्टीवार | उपस्थित नेते : उमेश कोराम, रवींद्र दरेकर, विविध जिल्ह्यांतील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जनसामान्य.
10 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी यशवंत स्टेडियम येथून निघालेला हा मोर्चा संविधान चौकापर्यंत निघाला. मार्गात “२ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करा”, “ओबीसी आरक्षण हा आमचा हक्क आहे”, “सरकार होश में आओ” अशा घोषणा देत मोर्चेकरींनी वातावरण दणाणून सोडले.
मोर्चाच्या सुरुवातीस विविध संघटनांचे नेते एकत्र जमले होते. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सर्व ओबीसी समाजाला एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. मोर्चामध्ये उमेश कोराम, रवींद्र दरेकर, संतोष कांबळे, माधवराव इंगळे, शैलेश पवार, राजू गवई, अशोक वाघमारे, कैलास गवळी, तसेच नागपूर आणि विदर्भातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्चाच्या दरम्यान प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. संविधान चौक परिसरात पोहोचल्यावर नेत्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत २ सप्टेंबर 2025 रोजी जारी झालेल्या जीआरचा निषेध नोंदविला. या जीआरमुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असल्याचे नेत्यांचे म्हणणे होते.
मोर्चादरम्यान अनेक महिलांचा सहभागही लक्षणीय होता. “आरक्षण आमचा अधिकार आहे, तो हिरावला जाणार नाही” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला. संविधान चौकावर झालेल्या सभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी भाषण करत सांगितले की, “हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, पण सरकारने ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारे निर्णय घेऊ नयेत. २ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”
दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी या मोर्चावर टीका करत वडेट्टीवार समाजात संभ्रम निर्माण करत असल्याचे म्हटले. तरीही, नागपूर शहरात झालेला हा मोर्चा प्रचंड यशस्वी ठरला असून ओबीसी समाजाची एकजूट आणि ताकद पुन्हा एकदा दिसून आली.
मुख्य मागण्या :
1️⃣ २ सप्टेंबर 2025 चा जीआर त्वरित रद्द करावा.
2️⃣ मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामील करण्याचा निर्णय रद्द करावा.
3️⃣ ओबीसींच्या आरक्षणाचा हिस्सा अबाधित ठेवावा.
4️⃣ जात पडताळणी प्रक्रिया पारदर्शक करावी.
5️⃣ भविष्यकाळात समाजांमध्ये संघर्ष निर्माण करणारे निर्णय घेऊ नयेत.
📰 दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387737801






