सोलापूर : ओबीसी आरक्षण धोक्यात – न्यायालयीन लढाईसोबत रस्त्यावरच्या संघर्षाची तयारी; ओबीसी संघटना अक्रमक, भुजबळांना लवकरच भेटणार प्रतिनिधी

सोलापूर : ओबीसी आरक्षण धोक्यात – न्यायालयीन लढाईसोबत रस्त्यावरच्या संघर्षाची तयारी; ओबीसी संघटना अक्रमक, भुजबळांना लवकरच भेटणार प्रतिनिधी


10 सप्टेंबर 2025 रोजी भागवत चित्रपट ग्रहासमोरील युवराज चुंबळकर यांच्या शितल हॉटेलमध्ये
झालेल्या बैठकीत विविध ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे, युवराज चिंबळकर, अॅड. राजन दीक्षित, बबलू गायकवाड, बापू भंडारे, शेखर बंगाळे, माधुरी उन्हाळे, अॅड. गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ठळक मुद्दे:
सरकारचा जीआर हा “ओबीसी आरक्षण संपवणारा काळा कागद” असल्याचा आरोप.
हा जीआर रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू करण्याचा निर्णय. कुणबी मराठा मराठा कुणबी मागासवर्गीय नाहीत पाच मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाचा जयश्री पाटील एडवोकेट विरुद्ध महाराष्ट्र सरकार लागलेल्या निकालात म्हटले आहे हा जीआर कोर्टाचा अवमान आहे
मराठा समाजाचा कुणबीत घुसण्याचा प्रयत्न – त्याला जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार.
शिंपी, धनगर, माळी, कोळी, सोनार, बंजारा यांसह अनेक ओबीसी संघटनांची रस्त्यावर उतरण्याची तयारी.
ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी लवकरच मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार.
“आरक्षण वाचविण्यासाठी न्यायालयीन लढाईसोबत रस्त्यावरील लढाईलाही आम्ही तयार आहोत” – शंकरराव लिंगे
दिनबंधू न्यूज – 73877 37871
लाईक | शेअर | ✅ सबस्क्राईब | कॉमेंट | बेल आयकॉन दा



