टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव नायगाव (सातारा) येथे राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन सोहळा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव नायगाव (सातारा) येथे राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन सोहळा पार पडला. याप्रसंगी उपस्थित राहून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृ तींना आदरांजली वाहिली. तसेच उपस्थितांशी संवाद साधला.

.याप्रसं.गी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही आपली दैवते असून त्यांच्या विचारांची जोपासना करण्यासाठी त्यांच्या स्मारकांचा विकास करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे

. या प्रेरणास्थळांचा प्राधान्याने विकास करण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळ विकास आराखडा आपण तयार केलेला आहे त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. यावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळ विकास आराखडा व श्री क्षेत्र अरणचा विकास आराखडा लवकरच मंजूर करण्याची ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणातून दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!

या स्मारकाच्या कामात प्रा. हरी नरके यांचे योगदान महत्वाचे असून त्यांनीच मला या ठिकाणी आणले. त्यानंतर सर्वाधिक निधी या ठिकाणी खर्च करून आपण या स्मारकाचा विकास केला. मंत्रालयात फुले दाम्पत्याचे तैलचित्र, महाज्योतीसाठी ४५३ कोटी निधी, केंद्र सरकारचा ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा, स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना, पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामकरण, भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांच्या विस्ताराचा प्रश्न अशा अनेक गोष्टी मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

संत शिरोमणी सावता महाराजांचे गाव आरणला ‘अ’ वर्ग तीर्थस्थळ दर्जा देण्याची घोषणा झालेली आहे. त्याचा शासन निर्णय लवकर निर्गमित व्हावा, येथील विकासासाठीचा १४० कोटी रुपयांचा आराखडा लवकर मंजूर केला जावा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पुन्हा सुरु करण्यात यावा, फुले दाम्पत्याचे समग्र वाड्मय पुन्हा छापण्यात यावे, नायगांवच्या राष्ट्रीय स्मारकात पर्यटन निवास केंद्र विकसित करून येथे २०० मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरु करण्यासाठी जागा देऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी या देखील मागण्या मांडल्या.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार सचिन पाटील,अतूल भोसले, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, मदन भोसले, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाज्योतीचे एमडी राजेश खवले, नायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे, बापु भुजबळ, दिलिप खैरे, ॲड.सुभाष राऊत, समता परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, प्रा.दिवाकर गमे, ईश्वर बाळबुद्धे, उपसरपंच गणेश नेवसे, माजी सरपंच साधना नेवसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Devendra Fadnavis

#SavitribaiPhule #SavitriBaiPhuleJayanti #Naygaon #BirthPlace #Reformer #Education

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button