मंडलनामा क्रमशः 23.राष्ट्रीय संघटना स्थापन

मंडलनामा क्रमशः 23.राष्ट्रीय संघटना स्थापन
महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेचा विस्तार करण्याचे माझे प्रयत्न सुरूच होते. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी झटणारे अनेक कार्यकर्ते त्या काळात होते. तेव्हा आजच्याएवढे विषारी वातावरण नव्हते. मुळात जनार्दन पाटील व कपिल पाटील या जन्माने हिंदू असलेल्या कार्यकर्त्यांमुळे मला मुस्लिम ओबीसींकरिता काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या आग्रहामुळेच महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेची स्थापना झाली. या दोघांशिवाय अनेक इतर धर्मीय कार्यकर्ते, नेते यांच्या मदतीमुळे संघटनेचे काम सुरू केले. मंडल आयोग लागू होईपर्यंत मुस्लिम समाजातून फार प्रतिसाद नव्हता. मुस्लिम ओबीसी म्हणजे ‘जात’ की ‘वर्ग’ याच आघाडीवर मी लढत होतो. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर मला व संघटनेला महाराष्ट्रात प्रतिसाद मिळू लागला.
राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाच्या स्थापनेनंतर माझा राष्ट्रीय पातळीवर वावर वाढला. कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश या दक्षिणेकडील राज्यात ओबीसी चळवळीत हाताच्या बोटावर मोजण्याएवढे तरी मुस्लिम कार्यकर्ते होते. पण मुसलमानांची मोठी लोकसंख्या असलेल्या उत्तर भारतातील ओबीसी चळवळीत मुस्लिम कार्यकर्ते औषधालाही नव्हते. उत्तर भारतात मंडल आयोगाच्या स्थापनेनंतर भलेही समाजवादी राजकीय पक्षाचा संपूर्ण पायाच ओबीसी झाला असला तरी त्यांच्यातही प्रमुख मुस्लिम नेत्याची वानवा होती.
मुस्लिम ओबीसींसाठी काम करणारे कोठून येणार? मी राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाच्या वेगवेगळ्या राज्यात होणाऱ्या परिषदांतून मुस्लिम ओबीसींचा मुद्दा मांडू लागलो. त्याला प्रतिसादही मिळत गेला. हिंदू ओबीसींचा काहीच अडथळा नव्हता. राष्ट्रीय नेत्यांचे प्रोत्साहन मिळाले. महाराष्ट्रात मुस्लिम ओबीसींसाठी काम करण्याची प्रेरणा व आग्रह जसा जनार्दन पाटील व कपिल पाटील यांनी धरला व सतत प्रोत्साहन दिले, मदत केली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाच्या नेत्याकडून राष्ट्रीय पातळीवर मुस्लिम ओबीसींसाठी संघटनात्मक काम करण्याचा आग्रह होऊ लागला. मंडल आयोग लागू झाल्यानंतर ही निकड अधिकच भासू लागली. या प्रचंड पोकळीमुळे देशपातळीवर मुस्लिम ओबीसींसाठी संघटना विस्तार करण्याचे ठरवले. ‘महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटना’ आता ‘ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन’ झाली.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




