मंडलनामा क्रमशः 53.विलासरावांनी दिला अधिकार

मंडलनामा क्रमशः
53.विलासरावांनी दिला अधिकार
मुस्लिमांना जात प्रमाणपत्र मिळण्यातील अडचण दूर करण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनला एक अधिकार दिला. संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी ओबीसी प्रवर्गातील असल्याचे दिलेले शिफारसपत्र एक पुरावा म्हणून ग्राह्य धरावा, असे सर्क्युलर ४ ऑक्टोबर २००१ रोजी काढले. ते सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्रासाठी ■ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व शब्बीर अन्सारी शिफारसपत्र देण्याचा अधिकार असलेला मी एकमेव अशासकीय व्यक्ती असून ही व्यवस्था आजही सुरू आहे. ज्यांच्याकडे कसलाही पुरावा नाही, त्यांना प्रमाणपत्र मिळण्यात या सर्क्युलरमुळे मोठी मदत होत आहे.
शासनाने ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनला ७ मार्च २००० रोजी शासन मान्यता दिली. अनुसूचित जाती प्रवर्गातील काही संघटना शासनमान्य आहेत. या संघटनांना वर्ग ड च्या नोकर भरतीची माहिती शासनाकडून अधिकृतपणे दिली जाते. संघटनांना भरतीचा, हस्तक्षेप करण्याचा किंवा शिफारस करण्याचा अधिकार नाही, हे लक्षात घ्यावे.
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


