ओबीसी आरक्षण बचाव यलगार मोर्चा

ओबीसी आरक्षण बचाव यलगार मोर्चा अंबड सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी प्रत्यक्ष घेतलेला मागोवा! अंबडला गर्दी झाली तुंबड एक कोटी पेक्षा जास्त ओबीसी समाज त्यातही प्रथमच युवकाचे प्रमाण जास्त होते चार तास क** उन्हामध्ये ओबीसी समाज कसलीही गडबड गोंधळ न करता शांतपणाने उत्साहात घोषणा देत नेत्यांचे भाषण ऐकत होता गर्वाने म्हणत होता मी ओबीसी आहे याचा मला अभिमान वाटतो! सत्यशोधक महात्मा फुले शाहीर सचिन माळी, शीतल साठे व सहकारी यांनी दोन तास प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
शाहिरीतून ओबीसीच्या हक्क अधिकार कर्तव्याची संविधानाची आणि समाजाच्या दुर्दशेची कहाणी शाहिरी जलशातून मांडली त्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्रातून गडचिरोलीपासून, सिंधुदुर्ग पर्यंतचे मोठ्या प्रमाणात, महात्मा फुले समता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन, विविध जाती धर्माच्या, माळी, धनगर, वंजारी, तेली, बारा बलुतदार संघटना, त्यांचे पदाधिकारी या ओबीसी आरक्षण बचाव ऐल्गार मेळाव्यास उपस्थित होते. प्रामुख्याने अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शंकरराव लिंगे, कमलाकर दरवाजे, बापूसाहेब भुजबळ मुंबई, मृणाल ढोले पाटील , ॲड. मंगेश ससाणे, दत्ता विसवळे पुणे, प्रदेशाध्यक्ष गौतमजी क्षीरसागर, बीड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण गुंजाळ सर, सत्यशोधक ओबीसी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण ढवळे दादा, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे संस्थापक श्रावण देवरे सर, मुंबई अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नारायण काळेल सर, मराठवाडा समता परिषदेचे अध्यक्ष एडवोकेट सुभाष राऊत, सिंदखेडराजावरून प्रदेश सदस्य जना बापू मेहेत्रे, मुंबईहून डाॅ. डी.एन.महाजन, शंकरराव महाजन सर, पुण्याहून पुणे जिल्हा अध्यक्ष अमर बोराटे सर, सपना माळी, समता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे, सत्यशोधक सुरेश घोडके सर यांच्यासह ओबीसी समाजाचे हजारो पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन ओबीसी आरक्षण बचाव एल्गार विराट महा मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते. राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने सत्यशोधक शंकराव लिंगे आणि त्यांच्या पदाधिकारी यांनी जात निहाय जनगणना झालीच पाहिजे म्हणून चार तासात जातनिहाय जनगणनेचे फायदे काय संकल्प पत्रक 50,000 वाटून 15,000 ओबीसी बांधवांच्या सह्या राष्ट्रपतीला पंतप्रधानाला मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यासाठी घेण्यात आल्या. लवकरच 50,000 सह्याचे निवेदन जातनिहाय जनगणना करा . जनगणना करण्यास जो पक्ष विरोध करेल त्या पक्षांना यापुढे ओबीसी मतदान करणार नाहीत. असे निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे.
प्रत्येक ठिकाणी चोहोबाजूनी जे मुख्य रस्ते हायवे रोड वर, ठीक ठिकाणी ओबीसी समाज बांधवांनी आपापल्या परीने चहा पाणी नाश्त्याची सोय केली होती. काही ठिकाणी राहण्याची सोय केलेली होती. अंबडमध्येही बरेच मंगल कार्यालय बुक करून त्या ठिकाणी राहण्याची सोय केलेली होती. जालना, औरंगाबाद, बीड, माजलगाव, पाथर्डी, शेवगाव, पैठण, अंबड, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, जाफराबाद, जिंतूर, भोकरदन, मंठा, परभणी, पाचोड, गेवराई अशा अनेक ठिकाणी राहण्याची चहापाण्याची जेवणाची व्यवस्था बऱ्याच कार्यकर्त्यांनी केलेली होती. अतिशय शांतताप्रिय असा, कोटीपेक्षा जास्त संख्येने विविध जाती धर्मातील समाज उपस्थित होता. असा समाज कधीही एकत्र आलेला मी माझ्या आयुष्य पाहिला नाही. रस्त्यात कुठेही गडबड गोंधळ नाही. कोणताही एक्सीडेंट नाही अतिशय शांत पद्धतीने 500…500 किलोमीटरच्या अंतरावरुन सुद्धा लोक नियोजित वेळेत पोहोचले होते. सर्व समाज बांधवांनी दिवाळीस केलेला फराळ, घरातील बाजरीच्या भाकरी, ठेचा, कांदा, मटकी, उसळ असे पदार्थ घरून घेऊन आले होते. ते अनेक ठिकाणी गाडी थांबवून खात असलेले चित्र दिसत होते. सभेच्या पटांगणामध्ये चहापाण्याची नाश्त्याची सोय संयोजकाने स्वयंस्फूर्तीने आपल्या पाण्याच्या फॅक्टरी मध्ये पाऊच आणि 200 मिली च्या बाटल्या, पाण्याचे कॅन, पिण्यासाठी ग्लास अशी मोफत व्यवस्था केलेली दिसत होती. एक ही रुपया आयोजकांनी खर्च न करता कोट्यावधी लोकांचा, हा एक विश्वपराक्रम व विक्रमच तालुक्याच्या ठिकाणी आंबडकरांनी नोंदवलेला आहे. पोलिसांनी पार्किंग आणि सभेच्या ठिकाणी आणि रस्त्यावर महामार्गावर अनेक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आणि गस्त ठेवलेली दिसत होती. यामुळे हा मेळावा खऱ्या अर्थाने शांततेत यशस्वी झाला म्हणून आयोजक आणि सर्व स्वयंसेवक यांना राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की पाचशे किलोमीटर वरून सुद्धा महिलांची संख्या बऱ्यापैकी होती. प्रत्येक कार्यकर्ता ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी समाजासाठी तळमळ असलेला कार्यकर्ता स्वयंपूर्ण आलेला दिसत होता. अधून मधून बऱ्याच प्रकारच्या मागण्या बऱ्याच प्रकारच्या घोषणा या ठिकाणी वेगवेगळ्या समूहाच्या वतीने देण्यात येत होत्या. प्रमुख मागणी मात्र जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी असे कोणीही प्रगत समाज मिसळू नका अशी मागणी समाजाची होत होती. काही लोक बोलून दाखवत होते की आमच्या गावात वाणी तेली माळी मराठा ब्राह्मण अनेक व्यापारी सुद्धा यांच्या जातीचे हे कुणबी दाखले निघत आहेत म्हणून कुणबी ही जात नाही. पन्नास वर्षाच्या अगोदर ज्यांना कुणबी दिलेले आहे त्यांचं जे आरक्षण आहे. तेवढं सोडून बाकीच्यांचं सर्वांचं खोटे दाखले रद्द करावे. त्यांना दाखले देणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा करावी. अशी लोक मागणी करत होते. पत्रक वाटत होते. अन कार्यकर्ते अनेक तालुक्यात पातळीवर, जिल्हा पातळीवर आम्ही अशा प्रकारचे मेळावे घेण्यासाठी आपापल्या पद्धतीने नेते मंडळीला सांगण्याचा प्रयत्न करत होते. लिहिण्यासारखं खूप आहे. कारण 375 जातीचा हा मेळावा लिहायला एक दोन चार पुस्तक लागतील असं मला वाटतं. त्यामुळे आता हे एवढेच. थांबतो.
जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय संविधान जय मंडल जय जय ओबीसी सत्यमेव जयते
दीनबंधू न्यूज , संपादक :- सत्यशोधक शंकरराव लिंगे
मो. नं. 73 87 37 78 01


