शरणगाथा क्रमशा.27

शरणगाथा क्रमशा.27
बोधे ते
संपुट-१: वचन क्रमांक ५८९) त्याचप्रमाणे मार्कंडेय, दुर्वास, अगस्त्य, कश्यप या सर्वकालीन विद्वान मानल्या जाणाऱ्या ऋषींच्या जन्मकथेवर बसवण्णांनी मार्मिकपणे भाष्य केले आहे. त्याच वेळी लोखंड तापवून लोहार झाला, कपडे स्वच्छ करून परीट झाला, या अशा श्रमाधिष्ठित समाजरचनेचा पाया बसवण्णांनी १२ व्या शतकात रचला.
‘इतरांना त्रास देणारा हिंसा करणारा मातंग’ अशा व्यापक अर्थाने बसवण्णांनी हीन शी जातींची व्याख्या केली आहे. महार मांग जन्माने नव्हे तर कृतीने जाती ठरवाव्यात, नसे असा त्यांचा आग्रह होता. अभक्ष-अमंगळ म्हणजे केवळ मांसाहार असे नव्हे तर ज्या अन्नाला श्रमाचा गंध नाही, चोरी लबाडीपासून कमावलेले, अन्न अमंगळ ठरते. अशा हे. अन्नाचे सेवन करणारा कुलहीन ठरतो. यज्ञामध्ये बळी देऊन त्याचे मांस खाणाऱ्यांना त्या बसवण्णांनी कुलहीन म्हटले आहे. समस्त प्राणिमात्रांच्या कल्याणाचा ध्यास घेणारा हाच वेि कुलज अशी सोपी व्याख्या बसवण्णा करतात. धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर, संपत्तीच्या आधारावर नव्हे तर केवळ श्रमाच्या आधारावर कामाच्या स्वरूपावरून त्याला ओळखावे अशा समाजाची निर्मिती करण्याचा बसवण्णांचा ध्यास होता.
भेदाभेद मानवनिर्मित
भेदभाव मानवनिर्मित आहे, शिवाय ते समाजाला कलंकच आहे, अशी बसवण्णांची धारणा होती. मानवानेच जाणीवपूर्वक भेदभाव निर्माण केले. यामागे मूठभर लोकांचा ने स्वार्थ असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. कुडलसंगमदेव बसवण्णांचे आराध्य दैवत. की कुडलसंगमदेवाने म्हणजेच जगन्नियंत्याने निसर्गाने मानवामानवांत कोणतेही भेद केले नाहीत. त्याला स्त्री आणि पुरुषातील लिंगभेदही मान्य नाही. आकाश, जमीन, पाणी, अग्नी, वायू या पंचमहाभूतांनी कोणताच भेद केला नाही. केवळ स्त्री किंवा खालच्या जातीचा म्हणून अग्नीचा दाह कमी अथवा अधिक जाणवत नाही. तो सर्वांना समानच असतो, या संदर्भात बसवण्णा म्हणतात-
दलितवस्तीची काय नि मंदिराची काय, भूमी एकच इथूनतिथून जमीन सारखीच. शौचास न्यायचे पाणी आणि मुखमार्जनाकरिता वापरायचे पाणी एकच. ते सगळीकडेच सारखे. पण थोडे तारतम्य राखणे जमायला हवे.
मग कुल, जात, उच्च-नीच असे काही वाटणार नाही. कुडलसंगमदेवाचे दर्शनही सदासर्वकाळ एकच. त्याच्यात भेदाभेद नाही.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




