बीड जिल्ह्यातील नाथापूर येथे ओबीसी बांधव स्व. गोरख देवडकर यांची आत्महत्या – आरक्षणाच्या धक्क्याने समाजात दु:खाची लाट!

दिनबंधू न्यूज | संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
बीड जिल्ह्यातील नाथापूर येथे ओबीसी बांधव स्व. गोरख देवडकर यांची आत्महत्या – आरक्षणाच्या धक्क्याने समाजात दु:खाची लाट!
बीड | प्रतिनिधी
नाथापूर (जि. बीड) येथे घडलेली हृदयद्रावक घटना ओबीसी समाजासाठी मोठा धक्का ठरली आहे. स्व. गोरख देवडकर या ओबीसी बांधवाने आरक्षण संपुष्टात येईल या धसक्याने जीवन संपवलं. लातूर येथील स्व. भरत कराड यांच्या आत्महत्येनंतर समाज अद्याप सावरलेलाच नसताना पुन्हा एक जीव गेला आहे.
देवडकर यांना आपल्या मुलीच्या भवितव्याची काळजी सतावत होती. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या लेकीला नोकरी मिळेल का, या विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सर्वांनी नमूद केले
घटनास्थळी भेट व सांत्वन
आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ व प्रदेश सरचिटणीस ॲड. सुभाष राऊत यांनी स्व. देवडकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मी स्वतः स्व. देवडकर यांच्या मुलीशी फोनवर संवाद साधून तिची आस्थेने विचारपूस केली. तिला धीर देत स्वतःला व घरच्यांना सावरण्याची विनंती केली. यावेळी कुटुंबाला आर्थिक मदतही सुपूर्द करण्यात आली
उपस्थित मान्यवर
या प्रसंगी रवी सोनवणे, अर्जुन दळे (कुंभार समाज नेते), दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकोन बेल दाबा
#OBCReservation #SocialJustice #EqualOpportunities #SupportOBC #JusticeForOBC
भुजबळ साहेबांचा फोटो टाका




