सत्यशोधकांच्या अंतरंग क्रमशा. 139

सत्यशोधकांच्या अंतरंग क्रमशा. 139
डाके यांनी मुकुंदराव पाटलांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी एक निवासी वसतिगृह सुरू केले होते. हे वसतिगृह त्यांनी अनेक वर्षे चालवले. सत्यशोधक शेवगाव शाखेचे डाके आणि त्यांचे स्नेही सत्यशोधक मारुतराव रघुजी भोई हे इ. स. १९१५ सालच्या दरम्यान सर्वेसर्वा होते. या शाखेच्या वतीने इ.स. १९१५ साली १४ सत्यशोधकविधी संपन्न झाले होते. अशा सत्यशोधक डाके भिकाजी बाबाजी यांचे इ. स. १९४२ मध्ये शेवगाव येथे निधन झाले.
संदर्भ – १. सत्यशोधक समाज परिषद-अ. भा. व कार्यवृत्तांत-संपादक – प्राचार्य गजमल माळी, २. सत्यशोधक ना. धों. शित्रे, औरंगाबाद यांची मुलाखत
डाके
बाबू यमाजी
बाबू यमाजी डाके हे शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील सत्यशोधक असून शेवगाव शाखेचे चालक भिकाजी बाबाजी डाके यांचे चुलत भाऊ होत. भिकाजी बाबाजी डाके यांच्या नेतृत्वाखाली ते शेवगाव सत्यशोधक शाखेत कार्यरत होते.
अहमदनगर येथील गंगाधर बागडे थिएटरात (आजचे छाया सिनेमागृह) दिनांक ११ व १२ मे १९१५ रोजी सत्यशोधक समाजाचे पाचवे अधिवेशन प्रा. अण्णा बाबाजी लड्डे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. या अधिवेशनाच्या वर्गणी फंडास बाबू यमाजी डाके यांनी घसघशीत अशी एक रुपया देणगी दिली होती. या बाबीवरून लक्षात येते की, बाबू यमाजी डाके हे या अधिवेशनाला उपस्थित होते.
शेवगावपासून तीन-चार किलोमीटरवर असलेल्या कुनंठेफळ येथील जमीन बाबू यमाजी यांनी सरकारला १९१६-१८च्या दरम्यान दिली होती. तसेच शेवगाव येथील तहसील कार्यालयाची जागाही बाबू यमाजींच्या मालकीची होती. संदर्भ – १. सत्यशोधक समाज परिषद अध्यक्षीय भाषणे व कार्यवृत्तांत-
संपादक – प्राचार्य गजमल माळी, २. ना. धों. शित्रे यांची मुलाखत.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




