सोशल

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 79

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
79

चतारे महादेव दशरथ (गुरुजी)
(जन्म १३-०७-१९२५
मृत्यू- ७-११-२०१६)

महादेव दशरथ चतारे हे नागपूर जिल्हा सत्यशोधक शाखेचे अध्यक्ष असून, त्यांचा जन्म १३ जुलै १९२५ रोजी मौजे धानोरा येथे शेजमजूर कुटुंबात झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांना वर्धा येथे महात्मा गांधींचे दर्शन झाले. या दर्शनातून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अंतर्बाह्य बदलून गेला. पुढे नागपूर येथे वास्तव्याला आल्यावर सत्यशोधक नागेश चौधरी यांच्या प्रभावाखाली ते सत्यशोधक मताकडे झुकले, वयोवृद्ध चतारे गुरुजी सत्यशोधक साहित्य संमेलन आणि सत्यशोधक अधिवेशनांना आवर्जून उपस्थित राहतात. इयत्ता चौथी शिकलेले चतारे गुरुजी समता परिषदेचे मध्यवर्ती सल्लागारही आहेत. ३ जानेवारी २०१४ रोजी मोझरी, जि. अमरावती येथे पार पडलेल्या नवव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनात त्यांचा ज्येष्ठ सत्यशोधक म्हणून हृद्य सत्कार करण्यात आला होता.

चव्हाण
नारायणराव कृष्णाजी
(१३ मार्च १८८४ २१ जानेवारी १९६०)

सत्यशोधक नारायणराव कृष्णाजी चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १८८४ रोजी मौजे उडतरे (आजोळी), तालुका वाई, जिल्हा सातारा येथे झाला. नारायणराव चव्हाण सत्यशोधक रा. ना. चव्हाणांचे वडील होत. नारायणराव चव्हाण यांचे मूळ गाव नावेचीवाडी (हे गाव आता वाई शहरात समाविष्ट झाले आहे.) तालुका वाई, जिल्हा सातारा हे असून पुढे ते गणपतराव राघोजीराव बाबर यांच्या घराण्यात दत्तक गेले. ते १९१२ सालापर्यंत बाबर घराण्याकडे वास्तव्यास होते. दरम्यान, १९१० सालात त्यांचा रखमाबाईंशी विवाह झाल्यावर ते वाईस वास्तव्यास आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीची संधी असतानाही त्यांनी नोकरी न करता वाई येथे शेती व्यवसाय केला. नारायणराव चव्हाण यांच्याकडे आरंभी इंदुप्रकाश, सयाजीविजय, केसरी आदी पत्रे येत असत, पुढे ‘दीनमित्र’, ‘विजयी मराठा’ ही सत्यशोधकी पत्रे येऊ लागली. पुढे १-४-१९२३ ते ११- ३-१९२६ या कालखंडात नारायणराव चव्हाण हे वाई नगर परिषद शालेय समितीचे १४वे अध्यक्ष होते. त्यांनी पुढे वाई नगर परिषदेचे तीन वर्षे अध्यक्षपदही भूषविले (१-४-१९२६ ते ३१ मार्च १९२९).

इ. स. १९१९ सालात ब्राह्मो समाजाबरोबर सत्यशोधक चळवळीची लाटही वाईतील रविवार पेठेत आली. या सत्यशोधक चळवळीचे पुढारी नारायणराव चव्हाण हेच होते. पुढे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष नामदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूरकर सत्यशोधक अॅड, गणपतराव कदम यांच्या उपस्थितीत १९२० साली कार्तिक शुद्ध प्रतिपदेस (बहुधा ऑक्टोबर १९२०), रविवार पेठ, चावडीसमोरील महर्षी शिंदे चौक, वाई येथे मोठ्या आवेशात वाई सत्यशोधक शाखेची स्थापना करण्यात आली. बाबूराव बळवंतराव पाडळे – वाईकर यांच्याकडे या शाखेचे अध्यक्षपद गेले, तर नारायणराव चव्हाण हे या सत्यशोधक कार्यकारी मंडळातील एक वजनदार सदस्य होते. पुढे १९२५ मध्ये वाई येथील गणपती घाटावर पुणेकर सत्यशोधक दिनकरराव जवळकरांचे एक व्याख्यान वाई सत्यशोधक शाखेने आयोजित केले होते. जवळकरांच्या या सत्यशोधकी व्याख्यानाने वाई सत्यशोधक शाखेला मूठभर बळ दिले होते. असेच एक व्याख्यान कराड येथेही झाले. या व्याख्यानाला महाराष्ट्राचे थोरले साहेब यशवंतराव चव्हाण विद्यार्थिदशेत उपस्थित होते. वाई येथील व्याख्यान कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून नारायणराव चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

दिनांक १४ एप्रिल १९२७ रोजी नारायणराव चव्हाण वाई सत्यशोधक समाज शाखेचे अध्यक्ष झाले. ही नियुक्ती सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष ना. भास्करराव जाधवांनी एका पत्राद्वारे केली. या नियुक्तीपत्रासमवेत वाई सत्यशोधक समाज कार्यकारिणीच्या सदस्यांचीही नियुक्ती केली. या पत्रासोबत सत्यशोधक छापील नियमावलीही जोडलेली होती. या कालखंडात नारायणराव चव्हाण यांनी या शाखेचा प्रचार आणि प्रसारही केला. सत्यशोधक शाहीर रामचंद्रराव घाडगे, भाऊराव पाटोळे, भिलवडीकर, आबासाहेब साबळे, मंडदकर, सोनोपंत कुलकर्णी, संभाजीराव पाटील आदींच्या सत्यशोधकी जलशांचे वारंवार (प्रयोगांचे) आयोजन

***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button