केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून सोलापूरातील आय.टी.संकुल तात्काळ सुरू करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणार – सोलापूर विकास मंच

सोलापूरच्या आय.टी. क्षेत्रात कार्यरत उद्योजकांनी सोलापूर विकास मंचकडे रितसर सादर करावा प्रस्ताव
सोलापूर विकास मंचच्या पुढाकाराने सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने सोलापूरच्या आय.टी. क्षेत्रात कार्यरत उद्योजकांची एम.आय.डि.सी., सांगली विभागीय अधिकारी वसुंधरा जाधव बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सोलापुरातील २३ वर्षांपूर्वी सर्व सोयीसुविधांनी अद्यावत अशी चिंचोळी एम.आय.डि.सी.तील भव्यदिव्य आय.टी. संकुल सोलापूरच्या आय.टी. तथा इतर अलाईंड सर्व्हिस मध्ये कार्यरत असलेल्या उद्योगजकांना माफक सवलतपर दरात उपलब्ध करून घेण्यासाठी तथा इतर महत्त्वपूर्ण मागण्या केंद्र तथा राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी सदर बैठकीत विचार मंथन झाले.
सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी आणि सोलापूरात आय.टी.क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योगजकांच्या मदतीसाठी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनची सदैव आपल्याला साथीला असुन चिंचोळी एम.आय.डि.सी. मध्ये लोडशेडिंग विरहित २४ तास वीज पुरवठा, अद्यावत अग्निशमन व्यवस्था, पोलीस चौकी, चार तारांकित हॉटेल, दोन राष्ट्रीयकृत बँका, इ.एस.आय.सी. दवाखाना, हाय वे कनेक्टिव्हिटी ह्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याची माहिती एस.आय.ए.चे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे यांनी दिली. सोलापूरात सुमारे ७८ लघु व मध्यम आकाराच्या नोंदणीकृत आय.टी. कंपन्यां कार्यरत असुन त्या सगळ्यांना एकत्रित अतिशय भव्यदिव्य तथा सर्व सोयीसुविधांनी अद्यावत चिंचोळी एम.आय.डि.सी.तील आय.टी. भवन मध्ये नाममात्र दरात सर्व सोयीसुविधांनी उपलब्ध झाल्यास सोलापूर हे जागतिक पातळीवर नवीन आय.टी. डेस्टिनेशन होईल असा सकारात्मक विचार सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी त्यांच्या प्रस्ताविकेत व्यक्त केले.
केंद्र तथा राज्य सरकारने सोलापूरच्या आय.टी. क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना सबसिडायाईझ रेट मध्ये अॉफिस स्पेस, सबसिडायाईझ हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन, सात दिवसांत सरकारच्या विविध विभागांचे बिनदिक्कत परवाने आणि परवानग्या, शुन्य ते जास्तीत जास्त ०५% जी.एस.टि. कर सवलत, सबसिडायाईझ वीज पुरवठा, मुकलक पाणी पुरवठा, महिलांसाठी विषेश सुरक्षा व्यवस्था, माफक, किफायतशीर तथा आरामदायी परिवहन कींवा खासगी पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवा ह्या प्रमुख मागण्या सदर बैठकीत करण्यात आल्या. सोलापूरात कार्यरत उद्योजकांनी आजच्या बैठकीत मांडलेल्या सर्व मागण्यांचे रितसर निवेदनपर प्रस्ताव सोलापूर विकास मंचकडे पाठवा सादर करा ते आमच्या हा प्रस्ताव सादर करतील आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाच्या वतीने आपण दिलेल्या प्रस्तावावर योग्य ती कारवाई केली जाईल असा सकारात्मक प्रतिसाद विभागीय अधिकारी वसुंधरा जाधव बिर्जे यांनी व्यक्त केला.
२३ वर्षांपासून प्रलंबित आय.टी.भवन सोलापूरच्या आय.टी. क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना मिळवुन देण्यासाठी राज्य सरकारच्या औद्योगिक विभागाचे उच्च अधिकार्यां तथा उद्योग मंत्र्यां समवेत बैठक घेऊन हा विषय तडिस लावण्यासाठी सोलापूर विकास मंच पाठपुरावा करून सोलापूरातील आय.टी.संकुल तात्काळ सुरू करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणार असल्याची आश्वासन सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या बैठकीत उपस्थित सोलापूरच्या आय.टी. उद्योगजकांना दिले. ह्यावेळी एम.आय.डि.सी.सोलापूरचे अधिकारी गणपत कोळेकर, इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, सोलापूरात आय.टी.क्षेत्रात कार्यरत असलेले सारंग तारे, सुधीर माने, प्रदिप मोरे, अरविंद रंगा, रविंद्र कुलकर्णी, अतुल कोटा, महेश जिंदम, गुरु पलमुर, संगमेश्वर अंडेली, शंकर पाटील, तपन मंगनपल्ली, धनराज बगले, तेजस जक्कल, निखिल मोरे, रमेश वायचळ, मल्लिकार्जुन गिवारे, विजयराज बाहेती, प्रदिप दराडे, संगमेश्वर कांती, विक्रम गिड्डे, राज म्हमाणे, समर्थ अडकी, राजेश कटारे, सुशुत्र म्हेत्रास, समर्थ सरवदे, गंगाधर थळंगे, संतोष मोहोळकर, तेजश्री गायकवाड, श्रीकांत हेडगे, ओंकार मठपती, सोहेल मुजावर, श्रवण पंडुवाले, जयवंत अकेन, रमेश मनगारे, माऊली झांबरे, श्रीकांत अंजुटगी, अमित कामतकार, सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, आनंद पाटील, यशवंत बोधे, महेश हणमे, गणेश शिलेदार, आरती अरगडे, गौरी आमडेकर, जयश्री तासगावकर, इक्बाल हुंडेकरी, परवेझ पिरजादे आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे विनायक दुदगी यांनी केले आणि उपस्थितांचे आभार सोलापूर विकास मंचचे योगिन गुर्जर मानले.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*




