सोशल

मराठा आरक्षण विरुद्ध अॅड मंगेश ससाने ,प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 46

मराठा आरक्षण विरुद्ध अॅड मंगेश ससाने ,प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 46

हा प्रश्न ज्यांना महत्त्वाचा वाटत नसेल त्यांनी शाळेत वेगवेगळ्या जातींचे चार शिपाई असतील तर टॉयलेट साफ करण्याचे, वर्ग झाडण्याचे काम कोणत्या शिपायाला दिले जाते याचा शोध घ्यावा. एकंदर आरक्षणाबाबत ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली असंच म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा… आरक्षण आणि सवलती यात काही घोळ

होतोय का? याबाबत आता जाणत्यांनी खरेच विचार करायची वेळ आली आहे. …. खरे तर आरक्षण वेगळे आणि सवलती वेगळ्या…..! आरक्षणासोबत सवलतींचा (आर्थिक आणि शैक्षणिक आदी पातळींवर…) घोळ घातल्याने एकूण समाजात आरक्षणासंदर्भात प्रचंड गैरसमज निर्माण झाले आहेत. (विशेषतः शैक्षणिक सवलतीमधील भेदभाव हा अनारक्षित वर्गातील विद्यार्थी आणि पालक यांना प्रथमदर्शनी तीव्रतेने जाणवू लागला. या वर्गाने आरक्षणविरोधी भूमिका घेण्याचे मूळ इंगित इथे दडलेले आहे.) आरक्षण… हे ज्या घटकांना मध्यवर्ती व्यवस्थेने सतत डावलले आहे, मुख्य प्रवाहात सत्तास्थानी येऊ दिलेले नाहीः

व येत्या काही काळात येऊ देण्याची शक्यताही दृष्टिक्षेपात नाही, अशा घटकांच्या प्रतिनिधित्वासाठी असते. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रीला सतत दुय्यम स्थान दिले गेले, तिला सतत डावलले गेले. सत्तास्थानी येऊ दिले नाही म्हणून तर स्त्रियांसाठी आरक्षणाची तरतूद केली गेली. स्त्रिया गरीब होत्या म्हणून नव्हे; तर त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नव्हते म्हणून. ही बाब आपण लक्षात घेणार आहोत की नाही? सवलती आर्थिक दुर्बल घटकांना दिल्या जातात…! बरेच लोक बोलताना या दोन्ही बाबींची सरमिसळ करताना दिसतात..! काही काळ मागासवर्गीय समाजाला सक्षमीकरणासाठी आरक्षणासोबत सवलतींचीही आवश्यकता होती,

कारण हा समाज सामाजिक आणि आर्थिक अशा दोन्ही स्तरांवर मागासलेला होता. मात्र काळाच्या ओघात सामाजिक उपेक्षेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्यानंतर (अर्थात अजूनही ही उपेक्षा पूर्णता नष्ट झालेली नाही. तिने वेगळी रूपे धारण केली आहेत इतकेच….. शासनाने वेळीच सवलतींमध्ये समानता आणली असती तर हा प्रश्न इतका चिघळलाच नसता असे वाटते! नेमक्या जागी उपाय व्हायला हवा… अजूनही वेळ गेलेली नाही! सवलती आणि सुविधा यांच्यामध्ये समानता आणली तर वातावरण बरेच निवळू शकते. त्यासाठी शासनाची शिक्षणावरील खर्च वाढविण्याची इच्छाशक्ती मात्र हवी….!

शासन पातळीवर मात्र नेमके उलटे घडते आहे. सगळ्याच बाबींबरोबर शासनाला शिक्षणाचेही खासगीकरण करायचे आहे. सेवक भरती कंत्राटी पद्धतीने करायची आहे. शाळांना, महाविद्यालयांना अनुदान द्यायचे नाहीये. आरोग्यसेवा नीट करायच्या नाहीयेत. ‘आनंदाचा शिधा’ फक्त वाटायचा आहे. खरे तर या शासकीय धोरणांविरुद्ध आंदोलने व्हायला हवीत. पण आमची दिशाच चुकली आहे. ही चुकलेली दिशा घेऊन तरुणाई समाजमाध्यमांवर एकमेकांना धमकावत आहे. काही तथाकथित नेते आणि कीर्तनकारही निखालस चुकीची तरुणांच्या भावना भडकविणारी विधाने करताहेत. ‘आरक्षण’ आणि ‘समान नागरी कायदा या दोन वेगळ्या बाबी आहेत, याचे काहीही सोयरसूतक या लोकांना नाही, बरे आपल्याला ज्या गोष्टीतलं काही कळत नाही त्याबाबत बोलू नये, हेही यांना समजत नाही. तरी बरे संतांनीच सांगून ठेवले आहे ‘अभ्यासोनी प्रकटावे…..

केवळ ‘आर्थिक निकषावर आरक्षणा’ची मागणी करणारांना साहजिकच हे आरक्षण ‘गरीब वर्गासाठी हवे आहे, हे उघड असेल तर ओबीसींप्रमाणे खुल्या गटाला ‘नॉन क्रीमिलेयर’ ची अट लावली तर खुल्या वर्गातील गरिर्वाचा प्रश्न निकाली निघू शकतो की नाही? ‘गरिबी’ हाच निकष असेल तर हे आरक्षण खुल्या गटातील सगळ्याच जातीधर्मांना लागू करावे लागेल. आणि समजा असे झालेच… तर उदाहरणादाखल एक चित्र दाखवतो. सध्या शिक्षणसंस्था (उदाहरणादाखल फक्त) ज्या जातगटांच्या ताब्यात आहेत त्या संस्था खुल्या जागेवर (सर्वच जागा खुल्या झाल्यावर) आपापल्या जातीतील गरिबाला घेतील की अन्य जातीतील?

जरा विचार करून बघा मागासवर्गीयांसाठी आरक्षण नसेल तर काय चित्र दिसेल, मागासवर्गीय औषधालाही दिसणार नाहीत. आज सगळ्या संस्थांमध्ये अजूनही अनुशेष आहे. आरक्षण असताना ही अवस्था… नसताना काय होईल? मग अशा वेळी सर्व आस्थापनांचे आणि संस्थांचे राष्ट्रीयीकरण करावे लागेल. त्यासाठी प्रस्थापित समाज तयार होईल? याचा अर्थ एवढाच आहे की जातनिहाय आरक्षण बंद करून निव्वळ आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याइतपत आपला समाज अजून प्रगल्भ झालेला नाही हेच वास्तव आहे.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button