मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 53

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाणे, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 53
अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियावर पसरत आहेत. सर्व प्रमुख पक्षांचे नेते येऊन दोन्ही बाजूंनी भूमिका घेण्यामागे बेरोजगारीच्या प्रश्नाला जातीच्या चौकटीत अडकवण्याचे राजकारण काम करत आहे. मराठा-कुणबी वा मराठा- ओबीसी या दोन्ही वादांच्या मुळाशी असलेल्या वर्गीय अंतर्विरोधांना जातीय चौकटीत अडकवण्याचे हे राजकारण आहे.
मराठा-कुणबी वाद : वर्गीय अंतर्विरोधांची जातीय अभिव्यक्ती
देशात भांडवली उत्पादन पद्धत निर्माण व कायम होण्याच्या प्रक्रियेत, बदलत्या उत्पादन संबंधांसोबत जातिव्यवस्थेच्या बदललेल्या रूपाचीच अभिव्यक्ती आहे आज समोर आलेला मराठा-कुणबी वाद. महाराष्ट्रात सामंती पद्धतीने शेती उत्पादनात गुंतलेल्या शेतकरी समूहाचाच एक भाग सामंती सैन्य व्यवस्थेचा सुद्धा भाग होता. व्यक्तीची जात बदलत नसली, तरी एखाद्या जातीचे जातीय-उतरंडीतील स्थान मात्र बदलण्याची गतिकी जातिव्यवस्थेत नेहमीच अस्तित्वात होती, आणि याचाच परिणाम म्हणून सैनिकी कौशल्याच्या जोरावर मराठ्यांचा क्षत्रियत्त्वाचा दावा बनला. मराठा शब्दाला जातीवाचक समजावे की प्रदेश वाचक वा व्यवसाय वाचक याबाबत सुद्धा इतिहासकारांमध्ये विविध मते असली, तरी कुणबी म्हणजे शेती करणारे याबाबत मात्र एकवाक्यता सापडते. म्हणूनच कुणबी इतर जातींमध्येही सापडतात. व्यवसायगत विभाजन दिसत असले तरी कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटी-बेटी व्यवहारांच्या स्तरावर ठोस विभाजन नव्हते. ९६ कुळी नावाने स्वतःला अधिक उच्चभ्रू समजणारे आणि ऐतिहासिकरित्या तुलनेने मोठे जमीनमालक असणारे मराठे नेहमीच स्वतःला एक वरची पोटजात समजत आले.
परंतु विशेषतः स्वातंत्र्यानंतर, शेतीमध्ये भांडवली उत्पादन संबंधांची वाढ झाल्यानंतर, आणि देशातील शेतीचे भांडवली शेतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर (म्हणजे अशी शेती जी बाजारासाठी केली जाते, मजुरी देऊन जिथे मजुरांना कामाला लावले जाते, जिथे वाट्याने शेती होत असल्यास वाटा बाजाराच्च्या सरासरी नफ्याच्या दराने निर्धारित होतो, जिचे उद्दिष्ट नफा आहे अशी शेती) मात्र मराठा-कुणबी ही तफावत आता धनिक शेतकरी विरूध्द गरीब शेतकरी व शेतमजूर या स्वरूपात वाढणे अपरिहार्य होते. कुणबींचा ओबीसींमध्ये झालेला समावेश ही सुद्धा त्याचीच पावती होती. महाराष्ट्रातील धनिक भांडवली शेतकरी वर्गाचा मोठा हिस्सा आज ९६ कुळी मराठ्यांमधील उच्च वर्गाचा आहे, सहकारी संस्था, साखर कारखाने, शिक्षण संस्था, विविध पक्षांचे राजकीय नेतृत्व याच गटातून येते. परंतु शेतीच्या विभाजनामुळे
व बाजाराच्या स्पर्धेत टिकाव धरण्याची क्षमता नसल्यामुळे कुणबी-मराठ्यांचा मोठा हिस्सा एकीकडे अल्पभूधारक शेतकरी झाला आहे, तर मोठ्या संख्येने मराठे शेतमजूर सुद्धा बनले आहेत. भांडवली विकासाच्या असमानतेचाच परिणाम आहे की मराठवाड्या सारख्या प्रदेशांचा खूप कमी विकास झाला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रदेशांचा आणि त्यातही पुणे, नाशिकसारख्या शहरांचा जास्त. त्यामुळे भांडवलशाहीत निर्माण होणाऱ्या अत्यल्प रोजगाराच्या संधीसुद्धा स्वाभाविकपणेच मराठवाड्यासारख्या प्रदेशातील, अल्पभूधारक व शेतमजूर कुटुंबातील युवकांच्या वाट्याला फारच कमी येतात. एका अंदाजांनुसार ६५ टक्के मराठे गरीब आहेत, तर फक्त ४ टक्के मराठ्यांकडे २० एकरांपेक्षा जास्त जमीन आहे. अजून एका अंदाजानुसार ६० ते ६५ टक्के मराठे कच्च्या घरात राहतात. हे स्तरीकरण स्पष्टपणे भांडवली व्यवस्थेचा परिणाम आहे. मनोज जरांगे याच वर्गीय व जातीय पार्श्वभूमीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. मनोज जरांगेंचे वडील दुष्काळी परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील गावातून जालन्यातील मोहिते वस्तीत रहायला आले. शिक्षण १२ वी पर्यंत झाल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काम सुरू केले. शेतमजुरी आणि हॉटेल मध्ये काम करण्यापासून ते कॉग्रेस पक्षात काही काळ राहून नंतर शिवबा संघटना स्थापन करत, मनोज जरांगे यांनी जवळपास २०११ पासून या आंदोलनाचे काम केले आहे. गरीब शेतकरी व शेतमजूरांच्या समस्यांचे मूळ भांडवली व्यवस्थेत न बघता, मर्यादित संधीच्या आरक्षणात बघणाऱ्या जरांगेंनी आरक्षणाच्या प्रश्नावर कामाकरिता त्यांनी आपली २ एकर जमीनही विकली. कष्टकरी वर्गातून येणारे जरांगे भांडवलशाहीने निर्माण केलेल्या गरीब कृषक वर्गाचे उदाहरण आहेत.
मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्याच्या विविध भागांमध्ये होत असले, तरी या आंदोलनाचा केंद्रबिंदू मराठवाडा आहे हे स्पष्टपणे दिसून येते आहे. मराठवाड्यातील अल्पभूधारक शेतकरी तसेच शेतमजूर कुटुंबातून येणाऱ्या युवकांना उपलब्ध होत असलेल्या नगण्य संधी हे यामागचे कारण आहे. एकीकडे अत्यंत अल्प प्रमाणात का होईना एस.सी., एस.टी. युवकांना आरक्षणाच्या आधारे मिळणाऱ्या संधी व त्यामुळे स्वतःला उच्च समजणाऱ्यांना सतावणारी ऐतिहासिकरित्या बाळगलेली उच्चभ्रूपणाची मानसिकता, दुसरीकडे ‘प्रस्थापित’ मराठा नेतृत्वाकडून (नेते, कारखानदार, शिक्षणसम्राट, उद्योगपती, बिल्डर, शेठ, इत्यादी) कडून झालेली निराशा यातून एकीकडे जातीअंतर्गत वर्गीय भेदांचे भेडसावणारे वास्तव आणि दुसरीकडे क्षत्रिय असल्याचा वृथा अभिमान यामध्ये फसलेल्या मराठा बेरोजगार युवकांची संधींची अपेक्षा आज मराठा आरक्षणाच्या मागणीच्या रूपात उफाळून
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




