संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे चार आगस्ट 2024 ला भक्ती निवासाचे उद्घाटन भव्य सावता भक्त महामेळावा होणार आहे

संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे चार आगस्ट 2024 ला भक्ती निवासाचे उद्घाटन भव्य सावता भक्त महामेळावा होणार आहे त्या कार्यक्रमाची तयारी कशी आहे याबद्दलची कार्यक्रमाचे संयोजक अमर हजारे यांची सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी शिवक्रांती टीव्हीसाठी घेतलेली मुलाखत
2024 रोजी दुपारी 1 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ,राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, ओबीसी खात्याचे मंत्री अतुलजी मोरेश्वर सावे साहेब महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर उपस्थित राहून यांच्या हस्ते सावता भक्तांसाठी भक्तनिवासाचे उद्घाटन केले जाणार आहे उद्घाटनानंतर विराट सभेचे आयोजन सावता महाराज तीर्थक्षेत्र अरण येथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमात सर्व सावता भक्त मंडळींनी उपस्थित रहावे अशी विनंती अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केले आहे.
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी…*
लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी…
मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी…
सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा… सावता महाराज यांच्या 729 व्या स्मृतिदिनास विनम्र अभिवादन!
या सभेच्या निमित्ताने@ संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन मंदिर देखभालीसाठी शासकीय कमिटी नियुक्त करावी @महाराष्ट्र शासनाने अरण येथील यात्रेकरूंच्या सोयीसाठी भक्ती निवास,सावता महाराज मंदिराचा जिर्णोद्धार सुशोभीकरण करावे, @यात्रेसाठी भव्य पटांगण, नारळ हंडी फोडण्यासाठी स्टेडियम बांधावे (एक लाख लोक क्षमतेचे).
@सावता महाराजांचा नावाने वनौषधी संशोधन केंद्र स्थापन करावे
@ अरण गावाला रस्ते,गटारी,स्वच्छ कायमस्वरूपी पाणीपुरवठा, विजेचे हाय पावर एलईडी बल्ब लावून गावचे सुशोभीकरण करावे.
@ सर्व सुख सोयींनी युक्त दवाखाना, वारकऱ्यांसाठी वारकरी शिक्षण ट्रेनिंग स्कूल ची निर्मिती करावी.
# कारण ते गिड्डेवाडी पालखी मार्ग डांबरीकरण वनीकरण सुशोभीकरण करावे
इत्यादी मागण्या अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केल्या आहेत
.
. या अगोदर गोपीनाथरावजी मुंडे साहेब, पंकजाताई मुंडे विजयसिंह मोहिते पाटील, साहेब अजितदादा पवार साहेब या उपमुख्यमंत्र्यांनी अ वर्ग तीर्थक्षेत्राची घोषणा करून अनेक विकास कामे करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत या आश्वासनांची पूर्तता का झाली नाही हा संशोधनाचा भाग आहे तसा जीआर निघाला नाही.यावेळी येणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्र्यांनी घोषणाही करावी आणि जी.आर ही काढावा. हरण तीर्थक्षेत्राचे पालकत्व माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांनी स्वीकारावे अशी विनंती सत्यशोधक लिंगे यांनी केली आहे. सावता महाराज यांच्या729 सव्या स्मृतिदिनास विनम्र अभिवादन!
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
जय सावता महाराज!


