सोशल

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.36

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.36

पहिली गुलामगिरीविरोधी संस्था स्थापन झाली. त्यानंतर काही महिन्यांनी लिहिले ल्या दुसऱ्या एका लेखात त्यांनी स्त्रीदास्यविमोचनाच्या प्रश्नाला तोंड फोडले आहे. जगातील सर्व भागात स्त्रीला पुरुषांचा जुलमी अहंगंड आणि असूया यांचा जाच शतकानुशतके सहन करावा लागतो आहे. या लेखात त्यांनी अत्यंत परखडपणे स्त्रीची कैफियत दिली आहे. अज्ञानस्थितीत राहून तिने निमुटपणे व निष्ठेने आपले कर्तव्य करीत राहिले पाहिजे. तिने घराबाहेर पडता कामा नये. प्रसिद्धीची व सामाजिक मानमान्यतेची हाव धरता कामा नये. याबाबतीत पाश्चात्य व पौरस्त्य समाजचिंतकांचे एकमत आहे. “The most virtuous woman is she who is least talked of “**

जिच्याबद्दल कमीत कमी बोलले जाते ती सर्वश्रेष्ठ सत्त्वसंपन्न स्त्री होय, असे एका प्रख्यात ग्रीक पंडितबुवांचे मत पेन यांनी या लेखात नमूद केले आहे. आपल्याकडेही जिला चुकूनसुद्धा सूर्यदर्शन घडत नाही अशी’ असूर्यपश्या’ स्त्री ही मोठी साध्वी मानली जात असे. तेच खानदानीपणाचे लक्षण समजण्यात येत होते. सर्व बाजूंनी स्त्रीपुरुषांच्या समतेची आवश्यकता प्रतिपादिली आहे. शुद्रांतिशूद्रांची आर्थिक व सामाजिक गुलामगिरीतून सुटका आणि स्त्रीची सुसंस्कृत समाजातही कशी कुचंबणा होते हे स्पष्ट करून पेन यानी स्त्रीदास्यविमोचन हे दोन्ही प्रश्न जोतीरावांच्या खास जिव्हाळ्याचे होते.

अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती या दोन्ही जगप्रसिद्ध घटनांशी पेन यांचा जवळच संबंध आला होता. अमेरिकेतील स्वातंत्र्यसैनिकांचे नीतिधैर्य खचू लागले होते. अशावेळी पेन यांनी ‘Common Sense’ ही पुस्तिका आणि ‘American Crisis’ ही लेखमाला लिहिली. या युद्धात केवळ अमेरिकेचा प्रश्न गुंतलेला नाही, तर उभ्या मनुष्यजातीचे भवितव्य त्याच्या यशापयशावर अवलंबून आहे. “These are the times that try men’s souls”२४ या देशातील माणसांच्या सत्त्वपरीक्षेची ही वेळ आहे. यावेळी आपण कच खाल्ली, तर जगाच्या इतिहासाला नवे प्रगतिपर वळण लावण्याची संधी आपण गमावली असे होईल. अशाप्रकारे सर्व संबंधितांना आवाहन करून त्यांनी युद्धभूमीवरचे वातावरण बदलून टाकले. पेन यांचे हे लेखन विलक्षण प्रभावी ठरले. ‘कॉमन सेन्स’ या पुस्तिकेच्या पाच लाख प्रती खपल्या; आणि दुसऱ्या लेखमालेलाही फार मोठा प्रतिसाद मिळाला.

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button