राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते
सावित्रीबाई फुले पुरस्कार गेल्या काही वर्षांपासून खंडित झाला होता. तो पुन्हा सुरू व्हावा, यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. अखेर तो आज पुन्हा पूर्ववत सुरू झाला असून पुरस्कार वितरण समारंभ आज मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात पार पडला. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब उपस्थित राहून पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान केले तसेच त्यांचे अभिनंदन केले.
-


महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार गेल्या काही वर्षांपासून खंडित झाला होता. तो पुन्हा सुरू व्हावा, यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. अखेर तो आज पुन्हा पूर्ववत सुरू झाला असून पुरस्कार वितरण समारंभ आज मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात पार पडला. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब उपस्थित राहून पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान केले तसेच त्यांचे अभिनंदन केले.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी जनाबाई सिताराम उगले (पुणे विभाग), डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी (नाशिक विभाग), फुलन ज्योतिराव शिंदे (कोकण विभाग), मीनाक्षी दयानंद बिराजदार (छत्रपती संभाजीनगर विभाग), वनिता रामचंद्र अंभोरे (अमरावती विभाग), शालिनी आनंद सक्सेना (नागपूर विभाग) यांना सन २०२२-२३ साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना हा पुरस्कार पुन्हा सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच हा पुरस्कार आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ३ जानेवारी रोजी नायगाव येथील कार्यक्रमात वितरित करण्यात यावा, अशी मागणी केली.
महाराष्ट्र शासनाने १९८ पासून महाराष्ट्रात क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन, समाजामधे सामाजिक व शैक्षणिक कार्य करणार्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार २०१३ पासून बंद होता. यावर आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांच्या माध्यमातून तसेच मी स्वतः देखील विविध माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याचा लेखाजोखा मांडला. तसेच आज या पुरस्कारांचे वितरण होत आहे याचा मला आनंद आहे, अशा भावना मांडल्या.
यावेळी पुढील वर्षापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार ३ जानेवारीला महिला मुक्ती दिन या शासकीय कार्यक्रमात नायगावला (जि.सातारा) वितरीत करावा, अशी मागणी केली. यानंतर मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील आपली मागणी तात्काळ मान्य करत पुढील वर्षापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार ३ जानेवारीला “महिलामुक्ती दिन” शासकीय कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगावला येथे वितरित करण्याचे जाहीर केले. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे.
यावेळी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही वेणुगोपाल रेड्डी, संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, सहसंचालक विलास नांदवडेकर, प्रकाश बच्छाव आदी उपस्थित होते
.
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात # छगन भुजबळ
#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक
#obc# SC# ST# अल्पसंख्यांक#, गरीब अल्प भुधारक #शेतकरी सोलापूर महानगरपालिका
‘# अब तक यूट्यूब चैनल सादिक शेख
#nashik #SavitribaiPhuleAwards #SavitribhaiPhule #education #maharashtra



