प्रस्तावना प्राध्यापक श्रावण देवरे लिखित ‘मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष
प्रस्तावना
प्राध्यापक श्रावण देवरे लिखित ‘मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष
ह्या पुस्तकास मी प्रस्तावना लिहावी हा मी माझ्यासाठी गौरवच मानतो.
प्रा. श्रावण देवरे यांनी आपलं सर्व आयुष्यच ओबीसी चळवळी साठी बहाल केल. दिवस-रात्र ओबीसी हक्क आणि अधिकारांचा ध्यास हाच जणू त्यांचा श्वास अस जीवन ते जगले आणि जगत आहे .. आणि शेवटल्या श्वासापर्यंत ते जगतील असा पूर्ण विश्वास ओबीसी प्रवर्गात आहे. ओबीसी प्रवर्गाच्या जागृतीसाठी त्यांनी हजारो आषण आणि शेकडो लेख लिहिले आहेत. प्रस्तुत पुस्तक हा अश्याच लेखांचा एक संग्रह आहे. प्रस्तुत पुस्तकातील लेखांचा मूळ गाभा ओबीसी मराठा अंतर्गत संघर्ष आहे.
भारतीय संविधानातील एक प्रमुख तत्व सामाजिक न्याय आहे. सामाजिक न्यायाच्या अनेक अंगातील एक प्रमुख अंग म्हणजे आरक्षण. सामाजिक व्यवस्थेतील विषमता नष्ट करण्यासाठी सामाजिक मागासलेल्या वर्गाला सामाजिक पुढारलेल्या वर्गसोबत आणून बसविण्यासाठी सामाजिक मागासलेल्या वर्गाला आरक्षणाची तरतूद संविधानात करण्यात आली आहे. भारतातील सामाजिक व्यवस्थेत विषमता निर्माण करण्याचे काम जातीव्यवस्थेने केले आणि म्हणून
एखाद्या वर्गाची सामाजिक विषमता ओळखायची झाल्यास जात हाच एक प्रमुख घटक आहे. वर्ण व्यवस्थेनुसार ब्राहमण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र-अतिशूद्र अशी उतरंड आहे. प्रत्येक वर्षात अनेक जाती समाविष्ट आहेत आणि त्यामुळेच हिंदू जातीव्यवस्था हि एकूण ६०००० जातीची उतरंड आहे. जातीच्या उत्तरत्या क्रमात मेव्याचे वाटप समाप्त होते आणि वरच्या जातींची सेवा करणे एवढेच काम खालच्या जातीक्रमाकडे राहते. वरच्यांना मेवा तर खालच्यांना सेवा असे वाटप जातीव्यवस्थेत झाले आहे. वरध्यांचे अति पोषण आणि खालच्या जातींचे अति शोषण अशी हि जातीव्याव्स्तेची उत्तरंड आहे. पवित्रता हि हिंदू धर्माची संकल्पना आहे. यात जो सर्वात वर तो अतीपवित्र आणि क्रमाने पवित्रता कमी होत जाते आणि खालच्या जाती पर्यंत ती पूर्णपणे अपवित्रतेत परावर्तीत होते त्यामुळे खालच्या स्तरातील शुद्र हे स्पृश्य तर अतिशूद्र हे अस्पृश्य आज भारतीय संविधानाने कलम १७ द्वारा एका फटक्यात अस्पृश्यता समाप्त केली अन्यथा आजच्या संवैधानिक परिभाषेत ओबीसी है मुळचे शुद्र तर एससी हे अतिशूद्र हया मुळच्या शुद्र आणि अतिशूद्र हह्यांना मानवीय मूल्य देणारी व्यवस्था निर्माण करायची झाल्यास; राष्ट्रपिता महात्मा फुल्यांनी आखून दिलेली रणनीती म्हणजे शेटजी- भटजी विरुद्ध शुद्र-अतिशूद्र अर्थात वरच्या बेवार्निका विरुद्ध शुद्र-अतिशुद्रांनी संघर्ष करणे आणि सामाजिक विषमता नष्ट करणे. समतेचे हेच सूत्र भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाविष्ट केले आणि सर्वांची मनुवादी व्यवस्थेतील वर्णाधारित ओळख
नष्ट करून सर्वांना भारतीय नागरिक हि ओळख दिली आणि राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी ‘एक नागरिक एक मत’ असे सूत्र अवलंबिले. ह्या सूत्रास अनुसरून तर आज भारतात बलीराज्य स्थापन व्हायला पाहिजे होते; परंतु वस्तुस्थितीत बळीराजा शेतमालास योग्य मूल्य नाही; म्हणून आत्महत्या करतोय.
भारतीय संविधानाच्या कलम १६ (४) नुसार आरक्षणास पात्र नागरिक ठरविताना, अश्या नागरिकांचा समूह कि, ज्यांची ओळख मागासवर्गीय समूह व ज्यांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही हया दोन कसोट्या वर होते ; असे असताना राजकीय लोकशाहीच्या अनुषंगाने सामाजिक पुढारलेला आणि पुरेसे प्रतिनिधित्व असलेला मराठा समाज जेव्हा ओबीसी आरक्षणात समाविष्ठ करण्याची मागणी करतो, तेव्हा एक सामाजिक वाद निर्माण होतो; आणि ह्या संघर्षातून जी आमने सामने ची लढाई लढली जातेः त्यात मला नाही तुला : घाल कुत्र्याला; अशी एकूणच बहुजनाची स्थिती होते; त्यावर मार्ग सुचविण्याकरिता प्रा. श्रावण देवरे यांच्या सूचनेवरून ओबीसी सेवासंघाने मराठा आरक्षणाची दिशा नधिअप्पन रिपोर्ट हे पुस्तक पंधरा वर्षा आधी संपादीत केले होते. त्याही पुस्तकाची प्रस्तावना मीच लिहिली होती; हा योगायोग कि काळाची मागणी, हे सभ्य वाचकांनी ठरवावे. आज ज्या आरक्षणातून मागासवर्गीय समूहाचा विकास व्हावा, त्याच आरक्षणाचे परिवर्तन राजकीय शस्त्र म्हणून व्हावा, हि एकूणच ह्या देशाच्या सामाजिक लोकशाही साठी अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. प्रस्तुत पुस्तकात प्रा. श्रावण देवरे हह्यांनी ह्या संदभौत अतिशय खोलात जाऊन सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्या मुळेच हे पुस्तक एक ऐतिहासिक दस्तावेज ठरेल; ह्या बाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. सत्य कि जय हो जय भारत जय संविधान..
आड. प्रदीप ढोबळे
स्थळ : मुंबई तारीख : जान ३, २०२५ सावित्रीमाई जयंती.



