सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशः भाग पाच

🟡🟡🟡🟡सत्यशोधकाचे अंतरंग
क्रमशः भाग पाच
💐💐💐💐💐💐💐💐
कार्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यांची ग्रंथसंपदा या विद्यमान वंशजांकडे नाही. ते फक्त एवढेच निवेदन करतात की, आमचे आजोबा, पणजोबा जोतिरावांनी सुरू केलेल्या चळवळीत होते! (सन्माननीय अपवाद सोडून)

 



महात्मा फुले समग्र वाङ्मय ग्रंथात सत्यशोधक समाजाचे रिपोर्ट (इ. स. १८७३ ते १८७६) अवलोकनास उपलब्ध आहेत. या तीन वर्षांच्या रिपोर्टवरून पाच-पन्नास सत्यशोधकांचा अतिअल्प त्रोटक परिचय हाती लागतो. हा परिचयही कार्यकर्तृत्वाच्या अंगाने प्रसिद्ध झाल्याने चरित्राच्या अंगाने संगतवार नाही. शास्त्री नारोबाबाजी महाधट पाटील यांचे ‘महात्मा जोतिबा फुले यांचे अमर जीवन’ ही पुस्तिका मौजे ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथून रविवार, १५ नोव्हेंबर १८९१ रोजी प्रकाशित झाली. या चरित्रातून काही सत्यशोधकांची केवळ नावे हाती लागतात. पुढे इ. स. १९११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अनंत एकनाथ गवंडी (पालकर), पुणे यांच्या ‘महाराष्ट्राचा मार्टिन ल्यूथर-महात्मा जोतीराव फुले यांचे त्रोटक चरित्र’ या पुस्तिकेतही केवळ काही सत्यशोधकांच्या नामावलीची जंत्रीच हाती लागते.

याच सुमारास, म्हणजे १७ एप्रिल १९११ रोजी अधिवेशन चळवळीचा प्रारंभ झाला. या अधिवेशनांना मराठी मुलखातील सत्यशोधक उपस्थित राहू लागले. एक प्रकारे अधिवेशनाचे आयोजन म्हणजे सत्यशोधक समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा ठरली. या अधिवेशनांचे प्रारंभीचे काही अहवाल आजमितीला उपलब्ध आहेत. या अहवालातून मराठी मुलखातील सत्यशोधक कार्यकर्त्यांची माहिती हाती लागते. मात्र येथेही सत्यशोधकांच्या संगतवार चरित्र परिचयाची उणीव जशीच्या तशीच राहते. दरम्यान, सत्यशोधक मताचा पुरस्कार करणाऱ्या ‘दीनमित्र’ पत्राचे पुनरुज्जीवन (२३-११-१९१०) याच सुमारास सोमठाणे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथे झाल्याने या नियतकालिकातून सत्यशोधक चळवळीचा मागोवा हाती लागतो. ५७ वर्षे प्रसिद्ध होत असलेल्या या पत्राच्या संचिकांनी फार मोठी रसद प्रस्तुत ग्रंथाला पुरविली आहे. पुढे महात्मा फुले जन्मशताब्दी वर्षात पंढरीनाथ सीताराम पाटील, बुलडाणा यांचे ‘महात्मा जोतिराव फुले (चरित्र)’ प्रसिद्ध झाले. या ग्रंथातील ‘सत्यशोधक समाजाची स्थापना’ या दहाव्या प्रकरणातून ‘दीनमित्र’ पत्रातील मागोवा अधिकच विकसित होत जातो.

पुढे याच प्रकरणात १२४ सत्यशोधकांची एक नामावली प्रसिद्ध केल्याने क्रमशः भाग 5

🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button