सोशल

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाजले बारा, विधान सभेला मतदानाचा टक्का घसरणार ? – श्री. कैलास गोरे पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष)

न्यूज
16-07-2024

राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोशिएशन

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाजले बारा, विधान सभेला मतदानाचा टक्का घसरणार ?

– श्री. कैलास गोरे पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष)

 

महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदेमधील आजी व माजी सर्वपक्षीय सदस्यांना एकत्र घेऊन पक्ष विरहित संघटना कार्य करत आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या राज्य कोर कमिटीच्या निर्णयानुसार खालील मागण्या राज्य सरकार समोर ठेवत आहोत.

१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेणे बाबत..

# विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणे शक्य नसते तरी त्यानंतर मात्र तातडीने या निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्या

दृष्टीने सरकारने भूमिका घ्यावी. #. गेली दोन वर्ष लोकप्रतिनिधी नसल्याने या संस्थांचा कारभार ठप्प आहे. विशेष करून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पंचायत समिती मधील सर्व लोकहिताच्या योजना बंद पडल्या आहेत.

# जनतेची दैनंदिन गरजेची कामे यामुळे रखडली आहेत. # निवडणुका न झाल्याने सरकारच्या विरोधात नकळतपणाने मोठा रोष तयार झालेला आहे. त्यामुळे सरकारने या निवडणुका तातडीने घेणार असल्याची भूमिका घेणे आवश्यक आहे.

२) जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य घेण्यात यावेत.

# महानगरपालिका आणि नगरपरिषदा या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था प्रमाणे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्हा परिषद पंचायत # यातून आरक्षणामुळे संधी न मिळालेल्या अनुभवी लोकप्रतिनिधींचा चा उपयोग करून घेणे शक्य आहे.

समितीमध्ये देखील स्वीकृत सदस्य घेतले जावेत.

# पूर्वी अशा पद्धतीने स्वीकृत सदस्य घेतले जात होते.

३) जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण यांची रचना आणि आरक्षण १० वर्ष कायम ठेवावे.

# जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण यांची रचना दर पाच वर्षांनी बदलली जाते आणि दरवेळी नव्याने आरक्षण टाकले जाते यामुळे या संस्था कायम अस्थिर राहिले आहेत.

# दरवेळी नव्याने 90% पेक्षा अधिक लोकप्रतिनिधी निवडून येत असल्याने त्यांना शिकण्यामध्येच काही वर्ष निघून जातात. याचा कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होत असतो.

# ५ वर्षासाठीच संधी असल्याने लोकप्रतिनिधी तात्पुरता विचार करून काम करतात. पुन्हा आपल्याला संधी मिळू शकते या भावनेने ते अधिक गंभीरपणाने काम करतील.

4. स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या निवडणुकीसाठी उमेदवार मतदार यादीतील असावा.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणारे विधान परिषद सदस्य निवडणुकीमध्ये उमेदवार हा मतदार यादी मध्ये नाव असलेला असला पाहिजे. जेणेकरून या स्थानिक स्वराज्य संस्थेचे योग्य प्रतिनिधित्व सभागृहात करू शकेल.

# # छोट्या नगरपरिषदाचे नगरसेवक मतदार यादीत आहेत मात्र पंचायत समितीचे सदस्य या मतदार यादीत नाहीत त्यामुळे पंचायत समिती सदस्यांचा देखील या मतदार यादी समावेश करावा. दोन दिवसापूर्वी झालेल्या राज्य कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये वरील विषय सरकारच्या समोर प्रकरतेने ठेवण्याचे सर्वानुमते ठरले. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था कोर्टाच्या दारात लटकत ठेवणे हे निश्चितच लोकशाहीला हानिकारक

आहे. येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रत्येक पदाधिकारी परत सक्षमतेने कामाला लागेल. आणि राज्यातील मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल. या दृष्टिकोनातून राज्य सरकारने आमच्या मागण्याचा प्रकरणे विचार करावा, अशी भावना

कमिटीच्या सदस्यांनी व्यक्त केली.

राज्यामध्ये प्रशासकीय कालावधीत काही योजना कागदावर होत आहेत. केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना राष्ट्रीय पेयजल जलजीवन मिशन च्या बाबतीत प्रचंड तक्रारी प्राप्त होत आहेत. इस्टिमेट नुसार काम न करणे, अधिकृत साहित्य न वापरणे, सोर्स बाबत चाचणी न घेणे, जुनीच पाईपलाईन आणि पाण्याची टाकी दाखवणे अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. राज्य कोर कमिटी हा विषय अतिशय गांभीर्याने घेत आहे. लवकरच या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी करण्यात येणार आहे असे देखील ठरले.

राज्यातील परिस्थिती पाहता आणि लोकसभेचा अनुभव पाहता विधानसभेला एका तालुक्यामध्ये किमान 20 उमेदवार विधानसभेसाठी इच्छुक असतील ग्रामपंचायत प्रमाणे 50 ते 100 मतांमध्ये देखील आमदारकी जाऊ शकते किंवा मिळू शकते? ? अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जाणवते. आमचा जिल्हा परिषदेचा एक गट वीस ते पंचवीस हजार मतांचा आहे.. आणि पंचायत समितीचा गण किमान दहा हजार मतांचा आहे. सरकारने याचा गांभीरणे विचार

करावा आजच्या पत्रकार परिषदेला.

श्री. कैलास गोरे पाटील राष्ट्रीय अध्यक्ष, श्री. भारत (आबा) शिंदे राज्य उपाध्यक्ष, श्री. नितीन नकाते सोलापूर जिल्हा अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button