सत्यशोधकांच्या अंतरंग क्रमशा.111

आयोजित केली. गुरुवर्य केशवराव विचारे यांच्या निधनानंतर २५ मे १९५८ रोजी सत्यशोधक समाजाचे सतरावे अधिवेशन पाडळी येथे पार पडले. या अधिवेशनाला दत्ताजीराव जाधव उपस्थित होते. समाजाचे अठरावे अधिवेशन १९६२ साली दत्ताजीराव जाधवांनी भक्तवडी येथे घेतले. या अधिवेशनाचे आयोजन-नियोजन त्यांनीच केले. या अधिवेशनात दत्ताजीराव जाधवांना अ. भा. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९६२ ते १९६६ पर्यंत चार वर्षे त्यांनी समाजाचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी सत्यशोधक ग्रंथाला प्रस्तावनाही लिहिली. दत्ताजीराव जाधवांचे ३ एप्रिल १९९५ रोजी भक्तवडी येथे निधन झाले.
संदर्भ – सत्यशोधक समाज प्रबोधन पत्रिका संपादक – जयवंत गुजर
जाधव भाऊराव रामजी (जन्म १९०० मृत्यू-१७-११-१९८५)
सत्यशोधक शास्त्री नारो बाबाजी महाधट पानसरे पाटील ओतूरकर हे सत्यशोधक समाजाचा प्रचार दौरा करता करता औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सावखेड येथे आले. सावखेड येथील वास्तव्यात महाधटांच्या लक्षात आले की, गंगापूर तालुक्याच्या सरहद्दीवरील आणि पैठण तालुक्यातील शेवटचे गाव असलेले मावसगव्हाण धार्मिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या अतिशय त्रासलेले आहे. त्यामुळे मावसगव्हाण येथील रामजी भगवंतराव पाटील यांना सावखेडा येथे शास्त्री महाधटांनी बोलावून घेतले. तेथील शिबिरात त्यांना शास्त्री महाधटांनी रामजी जाधव, त्यांचा मुलगा भास्करराव जाधव यांना सत्यशोधकी धार्मिक विधी शिकविले. त्याचबरोबर सत्यशोधक मो. तु. वानखडे यांचे (करजगाव, जि. अमरावती) ‘भटांचे थोतांड खंडन’ अथवा ‘सत्पथ प्रदीप’ हा सत्यशोधकी धार्मिक ग्रंथ भेट दिला. या प्रसंगापासून रामजी जाधव आणि त्यांचा मुलगा भाऊराव जाधव सत्यशोधक झाले.
सत्यशोधक भाऊराव रामजी जाधव पाटील यांचा जन्म सुमारे १९०० साली झाला. शास्त्री महाधटांच्या भेटीनंतर भाऊराव जाधव यांनी सर्व सत्यशोधकी धार्मिक
सत्यशोधकांचे अंतरंग /
[24/9, 10:15] LGSushant: महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा:13
जवळचे वाटते. ह्या उलट वरच्या थराला किंवा या ना त्या प्रकारे वरती जाऊन बसलेल्या लोकांना असे गद्य नेहमी नकोसे वाटणारे व भितीदायक वाटते. अशा प्रकारच्या क्रांतितत्त्वात एका बाजूने अपरंपार करुणा असते तर दुसऱ्या बाजूने अमानुष क्रौर्य असते. जगभरच्या मानवी समाजाला आव्हान देणारे असे हे क्रांतितत्त्व नेहमीच वरील दोन विरोधी प्रतिसाद मिळवत रहाते. फुल्यांनी हेही ओळखले होते हे इशारा (१८८५) ह्या निबंधाच्या सुरुवातील त्यांनी उद्धृत केलेल्या अवतरणावरून दिसते –
जिस तन लागे वहि तन जाने । बीजा क्या जाने गव्हारा रे ।।
अशा प्रकारचे अनुभवसिद्ध दुःखाच्या वेदनेतून निर्माण झालेले क्रांतितत्त्व आपल्याच शक्तीवर निर्भर असते. आधुनिक होऊ पहाणाऱ्या मराठी समाजात हे क्रांतीतत्त्व स्वतःची स्वतंत्र मूल्यव्यवस्था निर्माण करणारे होते. वाङ्मयीन पातळीवरही हेच क्रांतितत्त्व फुल्यांनी स्वीकारले आहे. ते म्हणतात, “मुकुंदराज, ज्ञानेश्वर वगैरे रामदासासारखे अनेक पायलीचे पंधरा आणि अधोलीचे सोळा ब्राह्मण ग्रंथकार होऊन व्यर्थ वाया गेले परंतु त्यातून एकानेही आपण शुद्राच्या गळ्यातील दास्यत्वाच्या पट्टयाला बोटसुद्धा लावून दाखविले नाही.”” मराठी साहित्यातील रूढ परंपरेचे हे मूल्यमापन मान्य करणाऱ्या फुल्यांच्या दुसऱ्या परंपरेत श्रमिक, शूद्र, स्त्री व इतर दुर्बल घटकांना महत्त्व देऊन सामाजिकतेला केंद्र मानणारी साहित्यिक परंपरा अभिप्रेत आहे.
आधुनिक भारताची संस्कृती नीचमूल्यीय होऊन बसल्याचे सर्वमान्य आहे. ती उच्चमूल्यीय करण्याचे सामर्थ्य फुलेप्रणीत परंपरेत होते. परंतु फुल्यांच्यानंतर तुरळक अपवाद सोडता पोकळ युगकर्ते दर पिढीत निर्माण करणारी प्रसिद्धीलोलुप वर्तमानपत्री मराठी वाङ्मयीन संस्कृती उच्चमूल्यीय होणे कठीण झाले; कारण ती नीचमूल्यीन आधुनिक संस्कृतीशी संगनमत करून स्वस्थ होणारी आहे. आज शंभर वर्षांनी पुन्हा मराठी साहित्यात, “अनेक पायलीचे पंधरा आणि अधोलीचे सोळा ब्राह्मण व ब्राह्मणेतरही ग्रंथकार व्यर्थ वाया गेले असा थोडा बदल करून फुल्यांचेच वचन पुन्हा मांडावे अशी आधुनिक महाराष्ट्रातील साहित्याची प्रगती आहे.
[24/9, 10:16] LGSushant: शरणा गाथा क्रमशः 13
धर्म (जागो बसवण्णांचा
प्रस्तावना :
धर्म जागो बसवण्णांचा
महात्मा बसवण्णांच्या चरित्रातली एक गोष्ट आहे. कल्याणनगरीत असताना ते एकदा घाईत राजवाड्याकडे चालले होते. पांढऱ्याशुभ्र घोड्यावर महामंत्री शोभत होते. चप्पल विकण्यासाठी रस्त्यावरून चाललेल्या हरळय्यांनी त्यांना पाहिले. बसवण्णांच्या विचारांच्या प्रभावामुळेच ते त्यांच्या मूळ गावाहून कल्याणमध्ये आलेले होते. त्यांना अचानक समोर पाहताच हरळय्यांचे हात जोडले गेले. वाकून ते म्हणाले, शरणू बसवण्णा. हरळय्यांच्या आवाजात इतके प्रेम होते की घाईत असूनही बसवण्णा थांबले. घोड्यावरून उतरले. त्यांनीही हात जोडून नमस्कार केला. शरणू शरणार्थी, असे अभिवादन करून त्यांनी हरळय्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले.
एक ब्राह्मण जातीत जन्मलेला राज्याचा महामंत्री आपल्यासारख्या अस्पृश्याला इतका सन्मान देतो, हे पाहून हरळय्या मोहरून गेले. त्या अतीव प्रेमाची आठवण म्हणून ते आणि त्यांची पत्नी कल्याणम्मा या दोघांनी आपल्या मांडीची कातडी काढून त्याच्या बसवण्णांसाठी चपला बनवल्या. बसवण्णांनी त्या चपला पायात घालण्याऐवजी डोक्यावर ठेवून त्यांना इष्टदेव कुडलसंगमदेवाइतका सन्मान दिला. या
१९ । शरणगाथा……….




