सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः59

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः59
प्रसिद्ध केले आहे. या पुस्तिकेत महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला आहे. या पुस्तिकेत महात्मा फुले यांच्या अनुयायांच्या नावाचा नामनिर्देश करण्यात आला आहे.
इ. स. १९२० साली अनंतराव पालकर यांच्या मातोश्री सावित्रीबाई गवंडी (पालकर) यांचे निधन झाले. सावित्रीबाईंची उत्तरक्रिया अनंतरावांनी सत्यशोधकशास्वी
धर्माजी रामजी डुंबरे यांच्या हस्ते केली. अधिवेशन चळवळ अत्यंत प्रवाही (जोमात) असताना अनंतराव गवंडी अधिवेशनांना उपस्थित नसल्याचे चित्र दिसते.
गटकळ
बाळाभाऊ पाटील
(मृत्यू सुमारे १९६०)
सत्यशोधक बाळाभाऊ पाटील गटकळ हे मौजे मातेरेवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील सत्यशोधक होते. त्यांचे शिक्षण बेताचेच झालेले होते. बाळा पाटील हे पिंपळगाव बसवंत येथील गणपतराव दादा मोरे यांच्या संगीत जलशात काम करीत असत. ते उत्कृष्ट नकलाकार होते. प्रेक्षकांना ते सतत हसत ठेवायचे. खेळ समाप्तीनंतर प्रेक्षक त्यांना आनंदाने ‘चार्ली चॅपलिन’ म्हणून हाक मारायचे. बाळा पाटलांनी स्वतःच्या अभिनयाची पूर्ण ताकद लावून जलशातील मारवाड्याची भूमिका अजरामर केली. अशा या जलशा कलावंताचे सुमारे १९६० साली मातेरेबाडी येथे निधन झाले.
संदर्भ- १. जगदेवराव नामदेवराव शिंदे, मौजे मातेरेवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक यांची मुलाखत. ५-११-२०११
गणोरकार गंगाराम बाळाजी
गणोरकार गंगाराम बाळाजी हे करजगाव, तालुका नवीन चांदूरबाजार, जिल्हा अमरावती येथील चौधरी-वानखडे समकालीन एक बिनीचे सत्यशोधक होते. इ.स.१९०० ला विदर्भातील पहिली सत्यशोधक शाखा करजगावी स्थापन झाल्यावर या शाखेच्या प्रचाराने प्रभावित होऊन गणोरकार सत्यशोधक झाले. त्यांनी पुढे आपल्या सत्यशोधक कार्याचा एवढा झपाटा वाढविला, की सन १९१२ मध्ये विदर्भातील या पहिल्या शाखेचे ते उपाध्यक्ष झाले. पुढे १९१४ साली ते करजगाव शाखेचे अध्यक्ष झाले.
इ. स. १९११ मध्ये सत्यशोधक अधिवेशन आयोजनाला प्रारंभ झाला.
गणोरकार आरंभापासून अधिवेशन चळवळीत सहभागी होताना दिसतात. अधिवेशनात
करजगाव शाखेचा वर्षभराचा रिपोर्ट मांडताना दिसतात किंवा ठराव सत्रात ठराव मांडताना दिसतात. पुणे येथील सत्यशोधक समाजाच्या पहिल्या अधिवेशनात ‘सत्यशोधक समाजाच्या सदस्यांमध्ये ऐक्य-प्रेमभाव वृद्धिंगत करणे आणि समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्यरत राहणे’ हा महत्त्वाचा ठराव त्यांनी मांडला आहे. गणोरकार यांनी सुचविलेल्या प्रस्तुत उरावानुसार आजही सत्यशोधक समाजाची वाटचाल सुरू आहे. सत्यशोधक समाजाचे दुसरे अधिवेशन शुक्रवार, दिनांक ५ एप्रिल १९१२ रोजी नाशिक येथे भरले. या अधिवेशनापूर्वी सत्यशोधक समाजाचे एक अध्यक्ष अय्यावारूंचे मार्च १९१२ मध्ये निधन झाले. गणोरकारांनी अय्यावारूंच्या संदर्भाने नाशिक येथील अधिवेशनात दुखवट्याचा ठराव मांडला आहे. या अधिवेशनात आर्थिक फंडाला दोन रुपये निधी दिला आहे.
गणोरकार यांनी करजगावातील सत्यशोधक समाज पुस्तकमाला प्रकाशनातही हातभार लावला आहे. या ग्रंथमालेच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या मो. तु. वानखडेच्या ‘संगीत शेतकऱ्यांची गोफण’ या १९०३ साली प्रकाशित झालेल्या पुस्तिकेचे ते प्रकाशक आहेत. तसेच करजगावातील आणखी एक सत्यशोधक कृष्णाजी कर्काजी चौधरी यांच्या ‘अज्ञानांजन’ या पुस्तिकेचे ते प्रकाशक आहेत. दिनांक
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




