सोशल

जामीनावर सुटून आल्यावर भर चौकात बलात्कारी आरोपीला झोप देऊन मारणार माजी आमदार राजेंद्र देशमुख!

आटपाडी : सांगली जिल्ह्यातील(Sangli Crime) आटपाडीमध्ये अल्पवयीन मतिमंद मुलीला फुस लावून मुलीवर संग्राम देशमुख या जिमचालक तीस वर्षाच्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली.

 

आज दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजून 45 मिनिटांनी आटपाडीतील बस स्थानक ते अण्णाभाऊ साठे चौका पर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला आटपाडी येथे एका गरीब माळी कुटुंबातील मुलीवर संग्राम देशमुख याने अत्याचार केला त्या अत्याचार विरोधात आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी व हा खटला फास्ट ट्रॅक वर चालवावा मुलीच्या कुटुंबीयांना संरक्षण द्यावे यासाठी आटपाडी तालुका व्यापार पेठा बंद ठेवून सर्व नागरि कांचा हजारोंच्या संख्येने निषेध मोर्चा पोलीस स्टेशनवर नेण्यात आला

[gspeech-button]

उपस्थित जनसमुदायने प्रकरणातील आरोपी संग्राम देशमुखला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याला मदत करणारी महिला आरोपी सुमित्रा लेंगरे वर ही ठोस कारवाई व्हावी तिलाही कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी आज आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला मदत करणाऱ्या महिलेला अटक केली असून सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींने मुलीवरील अत्याचार केलेल्या कृत्याचे चित्रीकरण केल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित संग्राम देशमुखला एक महिला मदत करत होती असेही पोलीस तपासात समोर आले आहे. संग्राम देशमुख हा आटपाडी मध्ये जिम चालवत होता. आरोपींकडून आणखी काही मुली आणि महिलांवर अशा पध्दतीने अत्याचार केल्याचा आरोप होत आहे.

आरोपी देशमुख यांच्यासोबत जी महिला मदत करत आहे यावरून असे दिसते हे एक रॅकेट आहे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे त्याचे व्हिडिओ काढणे आणि ब्ल्यू फिल्म तयार करणे त्याचा व्यापार करणे अशी आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे हा आरोपी ट्रकचा व्यवसाय ही करत आहे अल्पवयीन मुलींना फोर्स लावून त्यांना ड्रग देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचेही दबक्या आवाजात लोक बोलत असल्याचे समजते हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाच्या रॅकेटचीही चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी निषेध मोर्चाला संबंधित करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र आन्ना देशमुख ,

यांनी मी जरी देशमुख असलो तरी गुन्हेगार देशमुख जामिनावर सुटून आल्यावर त्याला भर चौकात झोप देऊन मारले पाहिजे पुन्हा असल्या घटना आपल्या तालुक्यात गावात होऊ नये यासाठी त्याला मी कठोर शासन करेल अशा शब्दात निषेध व्यक्त केला जिल्हा परिषदेचे सभापती ब्रह्मानंद पडळकर,रिपब्लिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, भारत पाटील, शिवसेना अध्यक्ष साहेबराव पाटील, दत्ता पंच पाटील नाभिक समाजाचे नेते प्रवीण क्षीरसागर ,कोष्टी समाजाचे नेते चंद्रकांत दौंडे , रमेश पेंटर याचबरोबर शिक्षक नेते यु.टी जाधव, सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव बालटे, सावंता मामा पुसावळे ,चंद्रकांत काळे ,बजरंग फडतरे ,पंच पिंटू माळी, माजी सरपंच रावसाहेब सागर, याचबरोबर रणजीत आईवळे, विजय देवकर, पृथ्वीराज पाटील , राष्ट्रवादीच्या अनिता पाटील , अशोक लवटे, यावेळी अनेक वेगवेगळ्या समाजातील नेते उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते पोलीस निरीक्षक विनय बहिर ,तसेच तहसीलदार सागर ढवळे यांना निवेदन देण्यात आले ….. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती तसेच उपस्थित आटपाडी तालुक्यातील ग्रामस्थ यांनी जाहीर जाहीर निषेध जाहीर निषेध च्या घोषणा दिल्या निषेध फलक घेऊन महिला विद्यार्थी तरुण सामील झाले होते हजारोंच्या संख्येने सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते⚫⚫⚫⚫◼◾▪▪

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button