” वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा “

▶ ” वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा ”
मा. खा. अजितजी गोपछड़े वीरशैव लिंगायत समाजातील धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, सहकारी क्षेत्रातील सेवाव्रतींचा समक्ष भेटून सन्मान करणार आहेत.
महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत समाज शेकडो वर्षांपासून आपलें सामाजिक योगदान निष्ठेने आणि कर्तव्य भावानेतून देत आला आहे. व्यापार उद्योगात आपला वारसा जपल आता सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या समाजाच्या कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थाना समक्ष सदिच्छा भेट देऊन त्यांचा सन्मान व्हावा म्हणून या यात्रेचे खा. अजित गोपछडे यांनी आयोजन केले आहे.
दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रसंत शिवालिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांच्या समाधीचे अभिवादन करून
त्यांच्या कर्मभूमीतुन या यात्रेस आरंभ होईल.
दि.५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान ही “वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा” श्रीक्षेत्र राजूर (अहमदपूर) – भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ – श्रीक्षेत्र मंगळवेढा अशी सम्पन्न होईल.
दि. ५ सप्टेंबर २०२४. रोजी
मा. खा. अजितजी गोपछडे यांच्या खासदार निधीतून राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळावरील सुशोभीकरण व विविध विकास कामांसाठी भक्तीस्थळ, राजूर (अहमदपूर) येथून ३१ लक्ष रुपये निधी देऊन हजारो विरशैव लिंगायत बांधवाच्या उपस्थितीत आणि प पू शिवाचार्याच्या आशीर्वादाने या सन्मान यात्रेचा शुभारंभ
सम्पन्न झाला.
बुधवार, ११ सप्टेंबर – २०२४
सोलापूर जिल्हा
“सकाळी ०९.०० वा. सिद्धेश्वर देवस्थान दर्शन
• सकाळी ९.३० वा. यशोधरा हॉस्पिटल भेट
सकाळी १०.०० वा. वीर तपस्वी शाळेस भेट विध्यार्थी प्राध्यापक यांच्याशी संवाद
* सकाळी ११.०० वा. AG Engg college भेट विश्वस्त, विध्यार्थी, प्राध्यापक यांच्याशी संवाद
दुपारी ४.०० वा. खा डॉ अजित गोपछडे यांच्या सोलापूर संपर्क कार्यालया चे उदघाट्न
• सायं. ५.०० वा. प्रज्ञावंत मेळावा डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते सत्कार सन्मान
* रात्री ८.०० वा. श्री मल्लिकार्जुन मंदिर दर्शन विश्वस्त सन्मान – चर्चा भेटी
• रात्रौ ८.३० वा. मानाचा कसबा गणपती आरती
आपण सर्व समाज बंधू – भगिनी या सन्मान यात्रेत सहभागी व्हावे. ही विनंती, असे आवाहन संयोजन समिती च्या वतीने प्रा गजानन धरणे, राहुल पावले, राजू विजापूरे, शशिकांत बिराजदार, डॉ प्रवीण पटणे, व समन्वयक डॉ राजेश फडकुले यांनी केले आहे.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




