*सत्यशोधकाचे अंतर १८८९ साली ‘ईश्वरास प्रार्थना’ ही आणखी एक अय्यावारूंची पुस्तिका प्रसिद्ध झाली.*

*सत्यशोधकाचे अंतर १८८९ साली ‘ईश्वरास प्रार्थना’ ही आणखी एक अय्यावारूंची पुस्तिका प्रसिद्ध झाली.*
‘गुलामगिरी’ ग्रंथ विसाव्या शतकाच्या आरंभी दुर्मिळ झाल्याने अय्यावारू यांनी स्वखर्चाने गुलामगिरी ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली. या आवृत्तीला जोतीरावांचे चरित्रही जोडले आणि छोटेखानी प्रस्तावनाही लिहिली. इ. स. १९११ सालात प्रसिद्ध झालेल्या या ग्रंथाने अय्यावारू यांनी त्यांचे मित्र जोतीरावांचे एका अर्थाने वैचारिक स्मारकच उभे केले. अशा या फुले समकालीन मुंबईकर सत्यशोधकाचे वयाच्या ८६ व्या वर्षी ग्रँट रोड, जावजी बिल्डिंग, कामठीपुरा, मुंबई येथे १९१२ सालच्या मार्चअखेरच्या रविवारी (पहाटे ४ वाजता) निधन झाले.
शाखेला १७ रुपयांचा निधी दिला. इतर वेळीही ते सत्यशोधक समाजाला आर्थिक साह्य करीत असत. पुणे सत्यशोधक शाखेला मुंबई शाखेने एक छापखाना दिला होता. १२०० रुपयांच्या छापखान्यात अय्यावारूंचेही आर्थिक योगदान होते.
इ. स. १८७६ ला महात्मा फुले यांना निमंत्रित करून अय्यावारूंनी कामठीपुऱ्यात त्यांचे सत्यशोधक तत्त्वज्ञानावर व्याख्यान आयोजित केले होते. पुढे १८८५ सालच्या गुढीपाडव्याला सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची डौलदार मिरवणूक काढण्यात आली. पुणे शहराच्या मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक गेली. डॉ. सदोबा गोवडे यांच्या वाड्यात नंतर मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले. या जाहीर सभेला अय्यावारूंनी मार्गदर्शन केले.
संदर्भ १. महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक य. दि. फडके, २. ज्ञानोदय आणि महात्मा फुले जी. ए. उगले, ३. सत्यशोधक समाज अधिवेशने – चिंतन आणि चिंता-जी. ए. उगले, ४. महात्मा फुले दुर्मिळ वाङ्मय आणि समकालीन चरित्रे-डॉ. मा. गो. माळी, डॉ. सुभाष सावरकर, ५. मुंबईच्या उभारणीत तेलुगू समाजाचे योगदान-मनोहर कदम, ६. दीनमित्र अंक-३-४-
१९१२
दिनांक १७ एप्रिल १९११ रोजी सत्यशोधक समाजाचे पहिले एकदिवसीय अधिवेशन पुणे येथील भवानी पेठेतील बालीवाला थिएटरात संपन्न झाले. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान अय्यावारू यांनी भूषविले. या प्रथम क्रांतिकारी अधिवेशनाला मराठी मुलखातून निवडक सत्यशोधक उपस्थित राहिले. या अधिवेशनाने विखुरलेला सत्यशोधक संघटित केला. खंडित झालेल्या संघटनेला एकदा नव्याने संविधान दिले. या संविधानाने एका नव्या दमाचे कार्यकारी मंडळ सत्यशोधक समाजाला दिले. या अधिवेशनाने स्वामी अय्यावारूंना अ. भा. सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदी विराजमान केले.
अय्यावारू रत्नम्माबाई
रामय्या व्यंकय्या
अय्यावारू १९१२ पर्यंत सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. याप्रसंगी (१७-४-१९११) अय्यावारू यांनी अध्यक्षीय भाषणात धार्मिक गुलामगिरी, या गुलामगिरीची उत्पत्ती, जातिभेद, जातिभेदाचे दर्शन, अवतार संकल्पना आदी मुद्यांवर भाष्य केले. तसेच समकालीन प्रस्थापित समाजव्यवस्थेवर घणाघाती प्रहार केले. ‘सत्यशोधक समाज’ ऐवजी ‘सत्यसमाज’ असे ‘सत्यशोधक समाज’चे नामांतर करावे म्हणून सुचविले. अय्यावारूंचे प्रस्तुत भाषण करजगावकर सत्यशोधक
मो. तु. वानखेडे यांनी वाचून दाखविले. इ. स. १८८७ ला अय्यावारूंनी ‘ख्रिस्ती बंधुजनास विनंती’ ही धर्मचिकित्सक पुस्तिका प्रसिद्ध केली. एक अखंड लिहून (ज्ञानोदय, मुंबई, ८ सप्टेंबर १८८७) महात्मा फुले यांनी या पुस्तिकेवर वैयक्तिक बोचरी टीका केली. मात्र, २७-१०- १८८७ च्या ‘ज्ञानोदय’च्या अंकात महात्मा फुले यांनी या संदर्भाने दिलगिरी व्यक्त केली. या दिलगिरीमुळे अय्यावारू-फुले यांच्यातील वैमनस्य दूर झाले. पुढे
मुंबईकर सत्यशोधक स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारूंच्या रत्नम्माबाई या पत्नी होत. अय्यावारूंच्या सत्यशोधक प्रबोधनपर कार्यात रत्नम्माबाईंचा सहभाग नेहमी राहत असे. इ. स. १९११ ला महात्मा फुले यांच्या दुर्मिळ झालेल्या ‘गुलामगिरी’ ग्रंथाची दुसरी आवृत्ती स्वामी अय्यावारू यांनी प्रसिद्ध केली. या ग्रंथाची ही दुसरी आवृत्ती दहा महिन्यांत हातोहात संपली. दरम्यान, स्वामींचे १९१२ मध्ये देहावसान झाल्याने गुलामगिरी ग्रंथाची तिसरी आवृत्ती इ. स. १९१२ ला चिखलवाडी, जावजी बिल्डिंग, मुंबई येथून रत्नम्माबाईंनी प्रसिद्ध
*सत्यशोधकांचे अंतरंग* क्रमशः भाग 11
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*




