सोलापूर

शिवस्मारकतर्फे देशभक्तीपर समूहगान स्पर्धेचे आयोजन; शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – पत्रकार परिषदेत आवाहन

🎤 शिवस्मारकतर्फे देशभक्तीपर समूहगान स्पर्धेचे आयोजन; शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – पत्रकार परिषदेत आवाहन

सोलापूर | प्रतिनिधी

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ (शिवस्मारक), सोलापूरतर्फे ११ व १२ ऑगस्ट २०२६ रोजी शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक येथे शालेय देशभक्तीपर समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.

श्रमिक पत्रकार संघ, सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गवसने, संचालक धनंजय कुलकर्णी, पुरुषोत्तम कारकल आणि व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार स्पर्धा इयत्ता १ ली ते ४ थी, ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी अशा तीन गटांत होणार आहे. प्रत्येक संघात वादकांशिवाय किमान ६ व कमाल १० विद्यार्थी असणे आवश्यक आहे. वाद्ये व साथीदारांची व्यवस्था संबंधित शाळांनी करायची असून, मराठी, हिंदी किंवा संस्कृत भाषेत ८ मिनिटांच्या मर्यादेत देशभक्तीपर समूहगान सादर करावे लागेल.

प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली असून प्रथम ₹५,०००, द्वितीय ₹३,०००, तृतीय ₹२,०००, तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असून शाळांनी ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अधिकृत पत्रासह नावनोंदणी करावी. स्पर्धेचे उद्घाटन ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहणार आहे.

🖋️ संपादकीय संदेश

देशभक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी अशा समूहगान स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कला, शिस्त, संघभावना आणि राष्ट्रप्रेम यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमात सर्व शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.

#Hashtags

#शिवस्मारक #देशभक्तीपरसमूहगान #सोलापूर #Shivsmarak #GroupSongCompetition #PatrioticSongs #Education #Students #DinbandhuNews #ShivkrantiTV #ShankarraoLinge

📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01

हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
बातमी लाईक करा • शेअर करा • सबस्क्राईब करा • फॉरवर्ड करा • कमेंट करा • बेल आयकॉन दाबा.
दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल फॉलो करायला विसरू नका.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button