सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 51

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 51
कोठेकर
गोपाळराव नागोजीराव
(जन्म-२८-१२-१८७३ २७-०४-१९४९)
कोल्हापूरकर सत्यशोधक माधवराव बागल यांनी संपादित केलेला ‘सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ-१९३३’ आणि नागपूरकर सत्यशोधक बाबूराव तात्याजीराव भोसले संपादित ‘वन्हाड मध्यप्रांत सत्यशोधक हीरक महोत्सव ज्युबली ग्रंथ- १९३३’ या दोन्ही सत्यशोधकी ग्रंथांत सत्यशोधक गोपाळराव नागोजीराव कोठेकरांचा ठळक उल्लेख आढळून येतो. यवतमाळ जिल्ह्यातील सत्यशोधकांच्या नामावलीत प्रस्तुत उल्लेख उठून दिसतो. मात्र कोठेकरांच्या सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर कार्यकर्तृत्वाची फारशी सुसंगत माहिती उपलब्ध नाही.
सत्यशोधक गोपाळराव कोठेकरांचा जन्म मौजे कोठा (वेणी-कोठा), तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ येथे २८ डिसेंबर १८७३ रोजी झाला. १८८५ साली कोठेकर मराठी इयत्ता पाचवी पास झाले. १८८७ साली यवतमाळच्या मिडल हायस्कूलमध्ये त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. १८९५ साली ते मॅट्रिक झाले. पुढे १९०४ साली एलएल.बी. झाले. १९०५ सालापासून यवतमाळ येथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान, विदर्भात होऊ घातलेल्या पाटील -पटवारीविरुद्धच्या बिगारी आंदोलनात त्यांनी बिगाऱ्यांची बाजू लावून धरली. अनेक विगाऱ्यांच्या केसेस न्यायालयात त्यांनी मोफत चालविल्या. या आंदोलनातील सहभागामुळे काही वर्षे त्यांची सरकारने सनदही रद्द केली होती. १९२२ पर्यंत ते ब्राह्मणेतर पक्षात सक्रिय होते. पुढे १९३६ साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर हयातभर ते काँग्रेस पक्षातच राहिले. दरम्यान, १९३० साली कोठेकरांनी जंगल सत्याग्रहात सहभागही नोंदविला होता.
इ. स. १९११ नंतर कोठकर अ. भा. माळी शिक्षण परिषदेच्या अधिवेशनांना उपस्थित राहू लागले. माळी शिक्षण परिषदेचे अनेक वर्षे जनरल सेक्रेटरी होते. अ. भा.
माळी शिक्षण परिषदेचे पंधरावे अधिवेशन १९२६ साली पुणे येथे भरले. या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोठेकर यांनी भूषविले. दरम्यान, विदर्भात ७ नोव्हेंबर १९१६ रोजी स्थापन झालेल्या माळी परिषदेचे सचिवपद कोठेकर यांच्याकडे चालून आले. महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यापासून प्रेरणा घेऊन कोठेकरांनी अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या. तसेच अमरावती येथील माळी शिक्षण संस्थेला कोठेकरांनी ९ एकर ५ गुंठे जमीन दान दिली. अशा या सत्यशोधकाचे वयाच्या ७६ व्या वर्षी (२७-४-१९४९) निधन झाले. संदर्भ – १. अ. भा. माळी शिक्षण परिषद कार्य – सतीश जामोदकर, २. ज्योतिप्रकाश अंक – १९४३, १९४९, अमरावती
कोरबू
बिबन चाँद
(जन्म सुमारे १८८०- मृत्यू १९५५)
सत्यशोधक कोरबू बिबन चाँद हे मौजे कसबे तडवळे, ता. जिल्हा उस्मानाबाद येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म सुमारे १८८० सालचा असावा. प्रामुख्याने सत्यशोधक समाजतत्त्वाची अंमलबजावणी करणे हे त्यांनी आपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानले हाते. त्याचबरोबर कसबे तडवळे पंचक्रोशीत होणाऱ्या जलशांच्या खेळांना उपस्थित राहून आपल्यापरीने संरक्षण देत असत. त्यासाठी जलशांसमवेत ते भटकंती करत असत. कोरबू बिबन चाँद यांनी पुढे जलसा उभा केल्याची हकिकत आहे; परंतु या बाबीला दुजोरा मिळत नाही. अशा या सत्यशोधकाचे १९५५ साली निधन झाले. संदर्भ – सत्यशोधक ज्ञानेश्वर ढावरे, उस्मानाबाद यांच्या टिपणावरून
कोरडे
मारोतराव पुंजाजी
(जन्म १८९६-मृत्यू १९५३)
मो. तु. वानखडे आणि कृष्णाजी चौधरी यांच्या नंतरच्या तरुण सत्यशोधक फळीतील कोरडे मारोतराव हे एक करजगावकर सत्यशोधक होत. त्यांचा जन्म १८९६ साली झाला. ते करजगाव सत्यशोधक शाखेचे कार्य करत असताना अधिवेशनांना त्यांची उपस्थिती नसल्याचे चित्र दिसते. त्यांनी आपल्या मुलांना विद्याविभूषित केले. विनायकराव नावाच्या त्यांच्या मुलाने पुढे महाराष्ट्र राज्याचे मंत्रिपदही भूषविले. अशा या कर्तृत्ववान सत्यशोधकाचे २३ जून १९५३ रोजी वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी निधन झाले. संदर्भ – करजगावातील सत्यशोधक चळवळ-सतीश जामोदकर
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


