अखिल भारतीय माळी महासंघाचे मुख्यमंत्री यांना निवेदन! निवेदनाची प्रत छगनरावजी भुजबळ साहेब जयकुमार गोरे साहेब अतुलजी सावे साहेब यांना दिली

♦
अखिल भारतीय माळी महासंघाचे मुख्यमंत्री यांना निवेदन! निवेदनाची प्रत छगनरावजी भुजबळ साहेब जयकुमार गोरे साहेब अतुलजी सावेसाहेब
माननीय आमदार उमेश उर्फ चंदू भाऊ यांना दिली♦
निवेदन
दिनांक 4 जुलै 2025
माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री,
मध्यवर्ती टफल केंद्र मुख्यमंत्री सचिवालय महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई 32.
सप्रेम नमस्कार विनंती विशेष सप्रेम जय जोती!! जय क्रांती!! जय सावता!!!
शंकरराव लिंगे, आपणास विनंती करण्यात येत आहे की, येत्या “पावसाळी अधिवेशनामध्ये” विषय मांडण्यात यावेत तसे ठराव करण्यात यावेत.
1. विशेष बाब म्हणून संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला मंदिर अधिग्रहण कायदा लागू करावा. ज्याप्रमाणे पंढरपूर, शिर्डी, सिद्धिविनायक मंदिरास कायदा केलेला आहे त्याप्रमाणे सोबत पंढरपूर मंदिर अधिग्रहण करणारा जो कायदा आहे त्या कायद्याचे प्रत या सोबत जोडत आहे. मंदिर अधिग्रहण करून शासकीय कमिटी त्वरित नेमणूक करावी. त्यामध्ये मी (सत्यशोधक शंकरराव लिंगे) कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिली, ती स्वीकारण्यास तयार आहे.
2. नाममात्र शुल्कात जमीन मोजणी करून द्यावी. जमीन मोजणीनंतर कमी जास्त क्षेत्र ज्याचे त्याला परत दद्यावे. तशी नोंद दप्तरी, तलाठी, सर्कल, संबंधित अधिकारी यांच्याकडून करावी.
3. जात निहाय जनगणना झालीच पाहिजे
4. जस्टीस सुक्रे कमिटी, जस्टिस भोसले, जस्टीस शिंदे यांच्या शिफारशी कमिटी रद्द करावी यांनी केलेल्या शिफारशी किंवा त्यांनी दिलेली कुणबी मराठा, मराठा कुणबी, तसेच 2004 पासून दिलेली सर्व सर्टिफिकेट रद्द करावेत. कारण तसा निकाल औरंगाबाद हायकोर्ट मध्ये लागलेला आहे. 2007 साली थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि 5 मे 2021 ला सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल लागलेला आहे…. कुणबी मराठा …..मराठा कुणबी है मागासवर्गीय नाहीत. त्यामुळे त्यांना सोशिअली आणि बॅकवर्ड सर्टिफिकेट देऊ नये. 2004 नंतरची सर्व सर्टिफिकेट रद्द करण्यात यावीत.
5. मराठा कुणबी… कुणबी मराठा एकत्र जी लोकसंख्या 1931 आली होती, त्या प्रमाणात त्यांना निधी द्यावा. म्हणजे सारथी बार्टी आणि महाज्योती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा. लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त अण्णासाहेब पाटील, महामंडळाला सर्वात जास्त निधी मिळतो. त्याच नियमाने * ओबीसींच्या व भटक्या विमक्तांच्या व्हिजेएनटी, एसबीसीच्या सर्व महामंडळाला मिळून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा.
6. हिंदी आषेची सक्ती नसावी. तामिळनाडूमध्ये तसा कायदा आहे. त्यामुळेच तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय पक्ष शिरकाव करू शकत नाहीत किंवा दक्षिणेत आंध्र, तेलंगणा, केरळ, ओरिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षांचा सहभाग मोठ्या प्रमाणात नाही.
7. शेतकऱ्यांना वीज, पाणी, खते, बी बियाणे मोफत द्यावे.
8. शेतकऱ्यांना नाममात्र दोन टक्के व्याजाने कर्ज पुरवठा करावा. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे.
9. एससी, एसटी, एनटी, ओबीसी, अल्पसंख्यांक मधीलच जास्त करून सैन्य भरती होत असते. म्हणून… अग्निवीर सैन्य भरती…. बंद करून नेहमीप्रमाणे सैन्य भरती जुन्या पद्धतीने करावी.
10. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित केला आहे त्याची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्ट किंवा 28 नोव्हेंबर 2025 पूर्वी करावी.
11. पुणे विद्यापीठातील लोगो शनिवारवाडा बदलून त्या ठिकाणी फुले वाडा करावा
12. पुणे रेल्वे स्टेशनचे नाव “महात्मा ज्योतिराव फुले” असे करावे.
13. साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या बोगद्याना सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले यांचे नाव द्यावे
14 खडकवासला धरणास महात्मा ज्योतिराव फुले जलाशय असे नाव द्यावे इत्यादी मागण्याचे ठराव येत्या अधिवेशनामध्ये मांडावेत ही नम्र विनंती
15. महाराष्ट्रात भडगाव पाचोरा चाळीसगाव या तालुक्यात व अनेक ठिकाणी शेतात बिबट्या वाघाने मनुष्य , व पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार करीत आहेत. म्हणून सरकारी यंत्रणेमार्फत तात्काळ बिबट्या व इतर वाघांचा बंदोबस्त करावा.
प्रतिलिपी :
१) मा.ना. श्री. छगनजी भुजबळ साहेब,
अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई.
२) मा.ना.श्री. अतुलजी सावे साहेब,
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, म.रा. मुंबई. ३) मा.ना.श्री. जयकुमार गोरे साहेब,
ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई.32
आपला विनीत
सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01
राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारती माळी महासंघ
जय ज्योती जय क्रांती जय सावता
मध्यवर्ती टपाल केंद्र
मंत्रालय
अनुमांक:-१४,१५,१६
दिनांक:- ४-७-२५
दिन बंधूंनी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा


