सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.84

सत्यशोधकाचे अंतरंग
क्रमशा.84

चव्हाण प्रमोद

प्रा. डॉ. प्रमोद चव्हाण हे मौजे वझर सरकटे, ता. बदनापूर, जिल्हा जालना येथील सत्यशोधक असून, ते जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात लोकप्रशासन या विषयाचे प्राध्यापक आहेत. ते जालना जिल्हा सत्यशोधक समाज शाखेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. तसेच जालना येथील ख्यातनाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे ते भूतपूर्व सचिवही आहेत.

दिनांक २५ व २६ डिसेंबर २००४ रोजी, जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात दुसरे सत्यशोधकी साहित्य संमेलन प्राचार्य गजमल माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. हे संमेलन यशस्वी करण्यात प्रा. डॉ. प्रमोद चव्हाण यांचा सहभाग मोलाचा होता. तसेच १० व ११ जानेवारी २०१५ रोजी जालना येथे पार पडलेल्या ३७ व्या सत्यशोधकी अधिवेशन आयोजनात त्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा राहिला.

चव्हाण विठोजी सोनाजी

विठोजी सोनाजी चव्हाण हे फुले समकालीन सत्यशोधक असून, ते मुंबईकर सत्यशोधक आहेत. मुंबईतील शिवडी भागात स्थापन झालेल्या सत्यशोधक शाखेचे ते अध्यक्ष होते. शिवडी परिसरातील कामगार वस्तीत स्थापन झालेल्या या सत्यशोधक शाखेचे उपाध्यक्ष भागोजी बापूजी अंगणे हे होते. बिनीचे सत्यशोधक विचारवंत दाजीसाहेब तुकाराम यादव पाटील गोपाळे या शाखेचे सन्माननीय सदस्य होते. या शाखेचे अध्यक्ष विठोजी चव्हाण यांनी आपल्या सत्यशोधक सहकाऱ्यांच्या मदतीने या परिसरात सत्यशोधक विचार पोहोचवला. संदर्भ – म. जोतीराव फुले आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर प्राचार्य गजमल माळी,
सत्यशोधकांचे अंतरंग /१५3

निर्मूलनात सत्यशोधक समाजाची प्रगती सामावली असल्याचेही या निबंधात म्हटले आहे. या पुस्तिकेला डॉ. पंजाबराव देशमुखांची केवळ एक परिच्छेदाची (सात-आठ ओळी) प्रस्तावना लाभली आहे. तसेच सत्यशोधक ‘गुलाबराव वसू’ यांचे चरित्र बाबूराव भोसले यांनी लिहिले. या अल्पचरित्राला दलपतसिंह चव्हाण यांची चार पानी प्रस्तावना लाभली आहे.

प्रस्तुत प्रस्तावनेवरून लक्षात येते की, त्यांचा जन्म १९०४ सालचा असून १९२१ साली जर्मनीतील बर्लिनला ते उच्चविद्याभ्यासासाठी गेले होते. या कालखंडात विलायतेत डॉ. पंजाबराव देशमुखांशी त्यांचा स्नेह वृद्धिंगत झाला. पुढे १९२७ साली डॉ. पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह झाला. या सत्याग्रह समितीचे दलपतसिंह एक सक्रिय सदस्य होते.

संदर्भ – १. ज्योति – दलपतसिंह चव्हाण, २. जागतिक कृषक क्रांतीचा विधाता – लोकनेता डॉ. पंजाबराव देशमुख वीर उत्तमराव मोहिते.

चव्हाण

हि. ए.

सत्यशोधक प्रा. हि. ए. चव्हाण यांनी महात्मा फुले यांचे एक चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील यांचे चरित्र १९६८ साली खामगाव, जिल्हा बुलडाणा येथून प्रसिद्ध केले. पंढरीनाथ सीताराम पाटील यांचे चरित्र चरित्रबद्ध करीत असताना रंजक शैलीत पंढरीनाथ पाटलांचे व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यचळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, सत्यशोधक चळवळ, शैक्षणिक चळवळ, अस्पृश्योद्धार, राजकीय चळवळ आदींच्या अनुषंगाने लेखकाने पंढरीनाथ पाटलांचे चरित्र शब्दबद्ध केले आहे.

शिवक्रांती टीवी दिनबंधूंनी व संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 0 1 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button