संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी सत्यशोधक शंकराव लिंगे यांचा चाळीस वर्षाचा संघर्ष l !

- संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 730 व्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! . – संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी सत्यशोधक शंकराव लिंगे यांचा चाळीस वर्षाचा संघर्ष l
- !
1 1
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा
संत सावतामाळी प्रतिष्ठान अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ अध्यक्ष महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था दिल्ली संस्थापक अध्यक्ष अ भा महात्मा फुले समता परिषद उपाध्यक्ष सत्यशोधक उद्योगपती# कर्मयोगी शंकरराव लिंगे
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी गेल्या 40 वर्षापासून सावता महाराजांचे जन्मगाव कर्मभूमी संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा म्हणून अनेक आंदोलन केली सभा मेळाव्या घेतले उपोषण केले सावता महाराज यांच्या समाधीसमोर आठ सामुदायिक विवाह घेऊन सावता महाराजांना घराघरात पोहोचविण्याचे काम महाराष्ट्रात देशात आणि जगभर अमेरिकेत सुद्धा केलेला आहे त्यांनी अनेक मुख्यमंत्री मंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन आणि माहिती दिलेली आहे त्यामध्ये प्रथम लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब मुख्यमंत्री राणे साहेब मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन दिलेला आहे गाठीभेटी घेतलेले आहेत आणि वारंवार विनंती केलेली आहे याचाच परिणाम म्हणून अरण येथे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी मोठ्या प्रमाणात मिळावा घेतले त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना मेळावा झाला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मेळावा घेतला गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी 11 फेब्रुवारी 1999 अकलूज येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त होत असलेला शेतकरी मेळाव्यात कैलासवासी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून अरण तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा म्हणून मागणी केली त्यावेळेला मुंडे साहेब यांनी अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला असे घोषित केले परंतु 1999 मध्यावती निवडणुका लागल्या त्यामध्ये युतीचे सरकार पडले त्यानंतर सलग पंधरा वर्षे आघाडीचे सरकार होते या आघाडीच्या सरकारने कोणीही अरणतीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला नाही त्यानंतर 2014 ला बीजेपी चे सरकार आले परंतु मुंडे साहेब स्वर्गवासी झाले पंकजाताई मुंडे यांनी अनेक मेळाव्या घेतले अनेक विकासाच्या कामासाठी पैसे मंजूर केले परंतु अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला नाही गेल्या वर्षी 4 ऑगस्ट 2024 रोजी माननीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी विकास मंत्री अतुलजी सावे साहेब विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार साहेब यांच्या माध्यमातून अरण येथे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि त्यांनी अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा केली थोड्या दिवसात निवडणुका लागल्या आचारसंहिता लागली निवडणुकीमध्ये देवेंद्रजी फडणवीस मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्यांचे सरकार आले सरकार आल्यानंतर त्यांनी अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्याचा अध्यादेश काढला 150 कोटीचा निधी मंजूर केला आणि आरणमध्ये अनेक विकास कामे सुरुवात करण्याची सुरुवात झाली अद्याप जमीन अधिग्रहणाचे काम चालू आहे आराखडा बनवण्याचे काम चालू आहे त्यानंतर मंदिर जीर्णोद्धार नवीन मंदिर यात्रेसाठी पटांगण भक्तनिवास मंगल कार्यालय अनेक प्रकारच्या सोयी सुविधा नारळ हंडीसाठी स्टेडियम इत्यादीचा समावेश असलेला आराखडा बनत आहे त्यासाठी दीडशे कोटी रुपयांचे बजेट माननीय ग्रामविकास मंत्री सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार जी गोरे साहेब माननीय छगनरावजी भुजबळ साहेब माननीय अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे थोड्याच दिवसात अरब मध्ये येऊन विकास आराखड्याचा पाया भरणीचा कार्यक्रम भव्य प्रमाणात घेणार आहेत अशी खात्रीलायक बातमी आहे त्याबद्दल ह्या युती सरकारचे आणि सर्व मंत्री गणाचे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे सर्वांचे अखिल भारतीय माळी महासंघ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन या सर्वांचे मनःपूर्वक आभार सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ उपाध्यक्ष अभा महात्मा फुले समता परिषद यांच्यावतीने अरण नगरीमध्ये सावता महाराजांच्या 730 व्या स्मृतिदिनानिमित्त दर्शनास येणाऱ्या सर्व सावता भक्तांचे मंत्री गणांचे मान्यवरांचे हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन ! हार्दिक अभिनंदन!!: जय संत शिरोमणी सावता महाराज !
शिवक्रांती टीव्ही दिन बंधूंनी व संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 शून्य एक हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल ददाबा।

















