🔥 ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई निर्णायक टप्प्यावर! बुलढाणा जिल्हाभर १४ ते १५ जून रोजी महासंघाचा विराट जनजागृती दौरा; गावागावांत ठराव करा, सह्या गोळा करा, मुख्यमंत्री यांना निवेदने धाडा! 🔥

🔥 ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई निर्णायक टप्प्यावर! बुलढाणा जिल्हाभर १४ ते १५ जून रोजी महासंघाचा विराट जनजागृती दौरा; गावागावांत ठराव करा, सह्या गोळा करा, मुख्यमंत्री यांना निवेदने धाडा! 🔥
बुलढाणा जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी, आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने दि. १४ व १५ जून २०२६ रोजी भव्य जनजागृती दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रमेशभाऊ हिरळकार, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मा. अभयजी तायडे, जिल्हाध्यक्ष मा. विजयजी खरात तसेच सरपंच मा. विष्णुभाऊ इंगळे (जिल्हाध्यक्ष, घाटाखालील विभाग) यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा पार पडणार आहे.
📍 दौऱ्याचा कार्यक्रम
दि. १४ जून २०२६
मोताळा, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव व खामगाव तालुक्यात जनजागृती दौरा.
dि. १५ जून २०२६
अमडापूर, पिंपरखेड, जानेफळ, मेहकर, डोणगाव, सुलतानपूर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा व चिखली तालुक्यात जनजागृती दौरा.
📢 मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणाऱ्या निवेदनातील प्रमुख मागण्या
✅ जातनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यात यावे.
✅ बेकायदेशीर न्यायमूर्ती शुक्रे, न्यायमूर्ती शिंदे व न्यायमूर्ती भोसले समिती रद्द करायांच्या शिफारशींचा पुनर्विचार करून त्या रद्द कराव्यात. मागासवर्गीयांच्या शिफारशी सवलती ओपनवर्गांना देऊ नका
✅ सन २००४ मधील “कुणबी-मराठा / मराठा-कुणबी” संदर्भातील शासन निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा.
✅ हैदराबाद गॅझेट रद्द करून त्या आधारे दिलेले कुणबी-मराठा व मराठा-कुणबी दाखले रद्द करण्यात यावेत.
✅ ओबीसी समाजाच्या सर्व महामंडळांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्यात यावा.
✅ महाज्योती संस्थेला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, विभागीय कार्यालयांसाठी जागा व इमारतींसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी.
✅ ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, फेलोशिप व शैक्षणिक योजनांचा निधी वेळेवर वितरित करण्यात यावा.
✅ परीक्षा रद्द होणे किंवा विलंब होणे यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विशेष योजना राबविण्यात यावी.
✅ शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा धरून हमीभाव देण्यात यावा.
✅ शेतीसाठी वीज, पाणी, खते व बियाणे यावर विशेष सवलती देण्यात याव्यात.
✅ शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यात यावा.
✅ अग्निवीर योजना रद्द करून पूर्वीप्रमाणे नियमित सैन्य भरती सुरू करण्यात यावी.
✅ जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी.
✅ सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा किमान १० हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात यावा.
✅ सर्वांना KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण देण्यात यावे.
✅ सर्वांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
⚠️ आता शांत बसून चालणार नाही!
ओबीसी समाजाच्या आरक्षणावर, शिक्षणावर, रोजगारावर, शेतकऱ्यांच्या हक्कांवर आणि सामाजिक न्यायावर सातत्याने घाला घातला जात असताना प्रत्येक गाव, प्रत्येक ग्रामपंचायत, प्रत्येक संघटना आणि प्रत्येक ओबीसी बांधवाने या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे.
✊ गावागावांत ठराव करा!
✊ ग्रामपंचायतींचे ठराव शासनाकडे पाठवा!
✊ मुख्यमंत्री यांना निवेदने द्या!
✊ लाखोंच्या सह्या संकलित करा!
✊ ओबीसी एकजूट दाखवा!
✊ हक्कांसाठी संघर्ष तीव्र करा!
“जातनिहाय जनगणना करा – ओबीसी आरक्षण वाचवा!”
“ओबीसी हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही!”
“सामाजिक न्यायासाठी एकच निर्धार – ओबीसींचा बुलंद आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार!”
📲 आपला व्हॉट्सअॅप ग्रुप मजबूत करण्यासाठी : 7387737801 हा नंबर आपल्या ग्रुपमध्ये जोडा.
📰 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 शून्य एक हा नंबर तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जोडा बा
👍 बातमी लाईक करा
🔄 शेअर करा
📩 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा
📺 शिवक्रांती टीव्ही सबस्क्राईब करा
#OBC
#जातनिहाय_जनगणना
#OBCआरक्षण
#OBCएकजूट
#अखिलभारतीयमाळीमहासंघ
#रमेशभाऊहिरळकार
#अभयतायडे
#विजयखरात
#विष्णुभाऊइंगळे
#बुलढाणाजनजागृतीदौरा
#हैदराबादगॅझेटरद्दकरा
#महाज्योती
#शेतकरीहक्क
#जुनीपेन्शन
#अग्निवीररद्दकरा
#मोफतशिक्षण
#मोफतआरोग्य
#सामाजिकन्याय
#दिनबंधून्यूज
#शिवक्रांतीटीव्ही
#सत्यशोधकशंकररावलिंगे
#OBCUnity
#SocialJustice
#CasteCensus
#SaveOBCReservationही






