सोलापूर

महात्मा जोतिबा फुले मंडळ, पिंपरी-चिंचवडची नवी कार्यकारिणी जाहीर

महात्मा जोतिबा फुले मंडळ, पिंपरी-चिंचवडची नवी कार्यकारिणी जाहीर

महात्मा जोतिबा फुले मंडळावर समाजाने दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आज रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. एकूण ४१ नुतन पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण करून आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. हा सोहळा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सी. एस. सुहासजी गार्डी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

या कार्यक्रमास मा. विलासराव गव्हाणे, मा. नरहरी शेवते, उद्योजक प्रशांतदादा डोके, उद्योजक आण्णा कुदळे, ओबीसी संघर्ष समितीचे मा. आनंदराव कुदळे, शिवसेना नेते उद्योजक विजय दर्शले, मा. निलेशदादा डोके, मा. चंद्रकांत दर्शले यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

माळी समाजासाठी राजकारण विरहित आणि विकासाभिमुख कार्य करणारे मंडळ म्हणून संस्थेची शहरात विशेष ओळख आहे. भविष्यातील कार्याचा वेग वाढवण्यासाठी या नूतन कार्यकारिणीत ८० टक्के तरुणांना संधी देण्यात आली आहे. तसेच मोशी, चिखली, डूडूळगाव, शाहूनगर, तळवडे, आकुर्डी, चिंचवड, वाकड, पुनवळे, किवळे आदी भागांतील कार्यकर्त्यांचा समावेश करून सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करण्यात आली आहे.

समाज एकसंध करण्यासाठी मंडळाचे विविध उपक्रम समाजापर्यंत पोहोचावेत, यासाठी सर्व समाज बांधवांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

— श्री. हणमंत किसन माळी–यादव
अध्यक्ष, महात्मा जोतिबा फुले मंडळ, पिंपरी-चिंचड

दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387 7378 01 हा क्रमांक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नोंद करा.
बातमी लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉरवर्ड आणि कमेंट करून सहकार्य करावे.
बेल आयकॉन दाबा — विसरू नका.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button