🟥 “हरीभाऊंची अस्वस्थता की पंकजा ताईंचा संयम? – वंजारी समाजावर ‘राजकीय’ वारांचा सिलसिला सुरूच!”

दिनबंधू न्यूज | संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
(🖋 दिनेश मुंडे – दिनबंधू न्यूज, शिवक्रांती टीव्ही)
🔸 भूमिका :
खरं म्हणजे हरीभाऊ राठोड यांनी आता हरिद्वारला जाऊन ‘हरी हरी’ करत बसावं!
कारण राजकारणातील त्यांचं वर्ण गंगेत वाहत वाहत आलं, आणि आता गंगासागरमार्गे परत जावं अशी लोकांत चर्चा आहे.
हरीभाऊंना आमदारकी-खासदारकी हा जणू “उंटाचा वट” वाटतो. दिवसभर कोल्ह्याच्या पिलाप्रमाणे उंटाभोवती फिरून नमस्कार करतात, पण शेवटी त्या उंटाच्या जिभेवर झडप मारण्याच्या नादात दमून जातात.
आता तरी त्यांनी मराठा समाजाची चाटुगिरी थांबवून बीसी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी आणि सर्व आरक्षणधारक समाजांच्या हक्कांसाठी काम करावं, अन्यथा “जिथं खोड मेल्याशिवाय जात नाही” तसं काही होऊ नये, असा लोकांचा सूर आहे.
🔹 सारांश :
राजकारणात पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या विरोधात टिकांची लाट उसळली आहे.
हरीभाऊ आणि जरांगे यांच्या वक्तव्यांमुळे पंकजा ताईंवर होत असलेल्या वैयक्तिक टिकांबद्दल जनतेत तीव्र संताप आहे.
ताई मात्र संयम आणि शालीनतेचा मार्ग स्वीकारत, आपल्या कार्यात व्यस्त आहेत.
🔸 मुख्य मुद्दे :
1️⃣ लोकसभा पराभव आणि जातीवादाची पार्श्वभूमी
पंकजा ताईंना झालेला पराभव हा जातीवादामुळे झाल्याचं सर्वश्रुत आहे.
युतीतीलच काही मराठा नेते रात्री उशिरा ‘कॉर्नर मीटिंग’ घेऊन त्यांच्या विरोधात काम करत होते.
तरीही ताईंनी संयम राखला आणि कोणावरही आरोप केले नाहीत.
2️⃣ जरांगे पाटलांविरुद्ध एक शब्द नाही!
ज्यांच्या आंदोलनामुळे ताईंना पराभव स्विकारावा लागला, त्या जरांगे यांच्या विरोधात पंकजा ताईंनी आजवर एक शब्दही बोललेला नाही.
3️⃣ मराठा आरक्षणाला नेहमी पाठिंबा
ताईंनी नेहमीच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. तरीही जरांगे आणि त्यांच्या समर्थकांकडून एका महिलेला उद्देशून केलेली वैयक्तिक टीका सुरूच आहे.
4️⃣ संतोष देशमुख प्रकरण आणि न्यायाची भूमिका
देशमुख प्रकरणात पंकजा ताईंनी “न्याय व्हावा” अशीच भूमिका घेतली.
तरीही काहींनी त्यांना या विषयात चुकीच्या पद्धतीने ओढण्याचा प्रयत्न केला.
5️⃣ संयमाचे प्रतीक – ताईंचा शांततेचा मार्ग
ओबीसी समाजात आज चर्चेत प्रश्न आहे की, “ताई प्रत्युत्तर का देत नाहीत?”
पण ताईंनी संस्कार आणि संयम ढळू दिलेला नाही.
त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत – आणि त्यांच्याकडून टिकेची अपेक्षा ठेवायची असेल, तर प्रथम लायकी दाखवावी लागते.
6️⃣ जरांगेचं लक्ष्य आरक्षण नव्हे, मुंडे घराणं!
सामान्य मतप्रवाह स्पष्ट आहे – जरांगे यांचं उद्दिष्ट आरक्षण मिळवणं नाही, तर मुंडे घराण्याला राजकारणातून बाहेर ठेवणं आहे.
7️⃣ वानजारी समाजावर हल्ला – शिक्षणावर आधारित यशाचा त्रास?
वानजारी समाजाला टार्गेट करण्याचं कारण एकच –
शिक्षण, परिश्रम आणि उद्योगाच्या जोरावर हा समाज प्रत्येक क्षेत्रात पुढे गेला आहे.
तेच काहींना अस्वस्थ करत आहे.
8️⃣ हरीभाऊंना इशारा – ‘काळकुटे’ म्हणतो तसे, क्रियेवर प्रतिक्रिया येणारच!
जर तोंडावर ताबा ठेवला नाही, तर यावर समाजाची प्रतिक्रिया अटळ आहे, असा लोकांचा इशारा आहे.
🔹 परिणाम :
➡ मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता.
➡ पंकजा ताईंच्या संयमामुळे समर्थकांमध्ये आदर अधिक वाढला.
➡ जरांगे यांच्या भूमिकेबाबत जनतेत संभ्रम आणि विरोध दोन्ही वाढत आहेत.
➡ वंजारी समाजामध्ये “संघटित होण्याची” भावना अधिक दृढ होत आहे.
📢 🖋 दिनेश मुंडे | दिनबंधू न्यूज – शिवक्रांती टीव्ही
📞 संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे – 7387737801
👉 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा नंबर अॅड करा
👍 लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कॉमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबा विसरू नका!






