ओबीसी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी रस्त्यावरची लढाई निकराने लढू!

♦ओबीसी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी रस्त्यावरची लढाई निकराने लढू! 
1 l
1- दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01चंद्रपूर येथे आज सकल ओबीसी महामोर्चा (१० ऑक्टोबर नागपूर) संदर्भात भव्य नियोजन बैठक शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडली.बैठकीत वक्त्यांनी सांगितले की, आज आपण अस्तित्व, हक्क, अधिकार आणि न्यायासाठी रस्त्यावर लढत आहोत. पण ही वेळ कोणामुळे आली, याचाही समाजाने विचार करावा लागेल. एका बाजूला सरकार म्हणते “आमचा DNA ओबीसी आहे”, मात्र कृतीत तसे काहीच दिसत नाही. सरकारच्या एका GR मुळे ओबीसींचे अस्तित्व धोक्यात आले असून, समाजाचे भविष्य उध्वस्त झाले आहे.ओबीसी समाजाच्या वाट्याचे आरक्षण सरकारने धोरणीपणे कापले आहे. हिश्श्याच्या आरक्षणात इतरांना प्रवेश देऊन विश्वासघात झाला आहे. त्यामुळे ओबीसींना आता रस्त्यावर उतरून ही लढाई निकराने लढावी लागेल.
एका वक्त्याने ठामपणे म्हटले की, कदाचित राजकारणातून माझे नाव मिटेल, पण ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या लढाईत माझे नाव कायम राहील. या बैठकीमुळे समाजात जनजागृती होत असून मोठ्या संख्येने समाज बांधव सकल ओबीसी महामोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज होत आहेत.
आजच्या बैठकीनंतर विदर्भ तेली समाज महासंघ, संत गाडगेबाबा धोबी समाज, वरठी समाज, मुस्लिम ओबीसी (पिंजारा) समाज, म्याटमज सुतार समाज, विश्वब्राह्मण पांचाळ समाज, लोहार समाज, माळी समाज, बेलदार समाज, वंचित बहुजन आघाडी, कुणबी समाज, ओबीसी सेवा संघ, नाभिक समाज, बारी समाज, शिंपी समाज, सोनार समाज, भोई समाज मंडळ या सर्व संघटनांनी सकल ओबीसी महामोर्चाला जाहीर पाठींबा दिला.
आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये नंबर जोडा – 73 87 37 78 01
बातमी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, कॉमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा!



