पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनामहात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण आकृती पुतळा सोलापुरात बसविण्याची मागणी!

पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनामहात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण आकृती पुतळा सोलापुरात बसविण्याची मागणी!

आ भा माळ
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे अभा महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांनी फुले प्रेमीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय नियोजन विभागात निवेदन देऊन केले मंत्री महोदय आणि आनंदाने निवेदन स्वीकारून पत्रावर सकारात्मक शहरांवरून त्वरित नियोजन करण्याच्या सूचना केल्या
निवेदन
दिनांक : 25 ऑगस्ट 2025
माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री
निवेदन देणाऱ्याचे नाव :
सत्यशोधक शंकरराव लिंगे
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ
मो. 9422068771
महोदय,
वरील विषयास, अनुसरून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी साहेब यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी प्राचीन लाल किल्ल्यावरून भाषण करताना महात्मा ज्योतिराव फुले यांची 220 वी जयंती देशभर साजरी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्याबद्दल त्यांचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे मंत्रिमंडळाचे तसेच आपले हार्दिक अभिनंदन!
आपणास विनंती करण्यात येते की या आनंदोत्सवामध्ये आपणही भर घालावी. पुरोगामी सोलापूर शहरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नाही, तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा अर्धाकृती असून अडगळीत पडलेला आहे.
महात्मा फुले यांचे खरे वारसदार म्हणून आपल्या हातून हे कार्य होऊ शकते याची आम्हाला खात्री आहे. नीतीने हे पवित्र कार्य आपल्या हातून व्हावे, म्हणूनच ही ऐतिहासिक संधी साधून आपण पुढाकार घ्यावा, ही आमची नम्र विनंती .
सोलापूर शहराच्या सन्मानासाbठी खालील ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून सुशोभिकरण करावे :
1. जुना पुना नाका, छत्रपती संभाजी चौकासमोरील रिकामा सर्कल
2. नवीन कलेक्टर ऑफिस समोर
3. कलेक्टर ऑफिस जवळील विजापूर रोड, रेल्वे ब्रिजपूर्वीचा चौक
या पुतळ्यांमुळे आपले व आपल्या सरकारचे महात्मा फुलेप्रेम तसेच सोलापूरची शान उंचावेल, असा विश्वास आहे.
आपला विनीत,
सत्यशोधक शंकरराव लिंगे
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ



